Skip to main content

पत्रिका एक बघणे....

लेखक ज्ञानव यांनी गुरुवार, 28/11/2013 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
खालील विषयावर तज्ञांकडून माहिती हवी आहे. जर जन्मवेळ, ठिकाण, जन्म तारीख दिली तर पत्रिका मांडून भविष्य कथन करता येते (हा ढोबळ भाग आहे खोलात शिरून वाद विवाद अपेक्षित नाही) म्हणजे विद्या, संतती, धन-संपत्ती, गंडांतर येईल नाही येईल वगैरे वगैरे. पण जर मृत्यू समय, मृत्यू तारीख, मृत्यू ठिकाण दिले तर त्या माणसाचा पुनर्जन्म होईल का?, केव्हा होइल?, कि होणारच नाही वगैरे सांगता येते का ? तसेच, दि : १/११/१९६७ वेळ: : ९.४५ सायंकाळी स्थळ : mumbai वरील माहिती वरून मृत्यूची दिनांक, वेळ, स्थळ, प्रकार (नैसर्गिक, अपघात, आत्महत्या वगैरे )कुणी सांगू शकेल का? इथे तज्ञांनी सकारण, सोदाहरण आणि मला पामराला

ही पुरवणी ईशान्य भारत दर्शनासाठी

लेखक देशपांडे विनायक यांनी गुरुवार, 28/11/2013 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुरवणी ईशान्य भारत दर्शनासाठी श्री तिमा यांनी शिलॉंग येथील DON BOSCO MUSEUM चा उल्लेख केला आहे त्याचे दोन वर्षापूर्वी काढलेले फोटो DON BOSCO MUSIUM SHILLONG DON BOSCO MUSIUM SHILLONG DON BOSCO MUSIUM SHILLONG

'आधारा' ची रात्र

लेखक विशाल चंदाले यांनी बुधवार, 27/11/2013 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्याच्याला आपल्या गावात आंधाराची रात हाये हो... ओ ओ ओ..." "तरी समद्यांनी उद्या सांच्याला ७ वाज्त्ता चावडीवर हजर राहंच हाये हो ...ओ ओ ओ..." "येताना समद्यांनी विलेक्शन कारड आनाचं हाये हो.... ओ ओ ओ..." म्हादूनं हलगी वाजवत दवंडी द्यायला सुरुवात केली तसं चावडी जवळ खेळणारी पोरं सगळी खेळ थांबवून एकमेकाकडे बघून हसायला लागली. त्याचं कारण हि तसच होतं, त्यांनी त्यांच्या उभ्या जन्मात दवंडी कधी ऐकली नव्हती. जवळ जवळ सगळ्याच पोरांना हि गोष्ट नवीन होती. म्हादू जसा चावडीकडून पुढ निघाला तसं सगळे पोरं एखादी नं बघितलेली गाडी गावात आल्यावर कसं मागे जातात. तसं त्याच्या मागे जायला लागली.

मडकी

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 27/11/2013 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळाच्या सावलीत जमिनीच्या पोटातून झरणारी माया पित शांत पहुडली होती सगळी कुणा दोन अनोळखी हातांनी ओंजळीत मावतील तेव्हढी उचलून नेली कच्ची बच्ची एकमेकांची ओळख घट्ट धरून मुठीत एका अनोळखी वर्तुळावर जावून पडली सारी सुरु झाला खेळ तशी, कधी भिजत, कधी थिजत शोधत राहिली हरवलेली जमिन फिरत राहिली काळचक्रावर भोवळ येईस्तोवर काही घडली,काही मोडली दोन हात तिम्बत राहिले त्यांना मनाजोगता आकार येईपर्यंत भाजून काढताना, हात कुणालातरी सांगत होते 'तावून सुलाखून निघाल्यावरच पक्की होतात मनं… वाजवून बघावीत एकदा , आणि नेभळट वाटली तर मांडूच नयेत बाजारात.' ऐकता ऐकता शोधत राहिली आपल आभाळ आपल्याच आतल्या अंध-या पोकळीत पुन्ह

जगात खरंच भुते आहेत काय?

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 27/11/2013 17:07 या दिवशी प्रकाशित केले.

आगावू टीप :- या धाग्याला मीपा.भूत मंडळींनी उगीचीच फाटे फोडू नयेत. नाही तर अतृप्त आत्मा त्यांच्या मानगुटीवर बसेल .

हे इकडचे भैये ते तिकडचे भैये.

लेखक सचीन यांनी बुधवार, 27/11/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १ "काय,जोशी साहेब कसे आहात थकलेले वाटताय "ऑफिस वरून येणाऱ्या जोशींना सानेनी विचारले.'अहो ,काय करणार साने साहेब ,मध्यावरच छोटस स्टेशन आपले.सकाळी गाडीत चढायचे वांधे तर संध्याकाळी उतरायचे. 'अहो चालायचच शहरे म्हटली कि अस व्हायचच'साने उतरले. 'अहो साने साहेब, गर्दी किती वाढलीय. फक्त मुंबईच नव्हे तर पुणे नाशिक ह्या ठिकाणाची गर्दीही बरीच वाढली आहे. ह्याला कारणीभूत ' भैये' युपी बिहारचे' जोशी म्हणाले. अहो हे भैये आपल्या इथे मोठ्या संख्येने येतात साऱ्या शहराची वाट लावून टाकलीय यांनी.ह्यांच्यामुळे आपले तरुण बेकार राहतात. अहो मिळेल त्या पैशावर काम करतात सोळा सोळा तास राबतात.

लेख, प्रतिसाद नि अवांतर.

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 27/11/2013 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसापासून पडलेला प्रश्न. हल्लीच नाही तर खूप आधीपासूनच मिसळपाववर अवांतर खूप खूप सुरु अस्तं. कधी विषयाला अनुसरुन, कधी अगदीच्च अवांतर. अनेकदा चर्चा देखील झाल्या असाव्यात. मला नक्की आठवत नाही. लेखन सकस असेल तर त्याला किती प्रतिसाद आले वगैरे गौण ठरतं. एकही प्रतिसाद न मिळता अथवा फार कमी प्रतिसाद मिळणारा एखादा लेख भिडणारा असू शकतो. कारण ते इतकं आतवर भिडलं जातं की त्यावर काय बोलायचं ते समजत नाही.

अन्नाची नासाडी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 27/11/2013 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर हा विषय बरेच दिवस मला छळत आहे पण कसा मांडावा समजत नाहिये. मी एका मोठ्या आय.टी. कंपनीत काम करतो जिथे साधारण २०-२५ हजार लोक कामाला येतात. कँपसमध्ये २-३ फूड कोर्ट आहेत आणि खायला प्यायला चंगळ आहे. तुमची जेवढा खर्च करायची तयारी असेल तसे अगदी २५ रुपयापासुन ५०० रुपयापर्यंत सर्व काही मिळते. खाउन झाले की लोक आपापल्या प्लेट घेउन खरकटे टाकायच्या खिड्क्यांजवळ नेउन ठेवतात.तिकडचे चित्र न बघवण्यासारखे असते. बर्‍याच डिशमध्ये अन्न तसेच वाया गेलेले /राहीलेले दिसते. चव न आवडणे, भूक नसणे, जास्त वाढलेले असणे कारण काहीही असो .शेवटी ते वायाच जाते.

ब्रम्हदेवाची पृथ्वी

लेखक सचीन यांनी बुधवार, 27/11/2013 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आपली हजारो वर्षाची झोप पूर्ण करून ब्रह्मदेव नुकतेच उठले होते.ब्रह्मदेव जागे झाल्याची बातमी जशी त्रिलोकात पसरली, तसे त्यांना भेटायला देवगण हे ब्रह्मलोकात जमा झाले.जग बनवण्याच्या कामात अत्यंत श्रम पडल्याने त्यांनी हि हजारो वर्ष झोप घेतली होती. सर्व देवांचे ब्रह्मलोकात स्वागत करून ब्रह्मदेवाने विचारले,”अरे शक्तिशाली देवानो तुम्ही चिंतेत दिसताय, त्याचे कारण काय?” यावर नारदमुनी म्हणाले, “ ब्रह्माजी, तुम्ही तुमचीं सुंदर रचना पृथ्वी बनवली आणि झोपायला गेलात .इथे त्रास मात्र आम्ही भोगतोय. यावर ब्रह्मदेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले ‘कसला त्रास, मला काही कळेल का ?इतके झालय तरी काय.

THANK YOU शेतकरी दादा!

लेखक रामबाण यांनी बुधवार, 27/11/2013 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी नेटवर असंच भटकत असताना Thank a farmer (TAF) बद्दल वाचनात आलं. अमेरिकेतला एक शेतकरी १५५ लोकांची भूक भागेल एवढं अन्न पिकवतो म्हणे; त्या शेतकऱ्यांचे मोठे ऋण आपल्यावर आहे, त्यांचे आभार मानायलाच हवे; असं अगदी लहानपणापासून तिथे बिंबवलं जातं. यासाठी thank a farmer day सारख्या संकल्पना पुढं येतात. त्याला शाळेपासून ते कार्पोरेट जगतापर्यंत, समाजाच्या प्रत्येक घटकाचा चांगला प्रतिसादही मिळतो. Have u thanked a farmer today? असं तिथं विचारलं जातं.