जिमी (पूर्वार्ध)
नव्या नोकरीचा पहिला दिवस नेहेमीच जरा भीतीदायक असतो. काम जमेल का? सहकारी कसे असतील? हजार प्रश्न. त्या नोकरीच्या वेळी तर धोपटमार्गा सोडून मुद्दाम बिकट वाटेची वहिवाट करायला घेतली होती. आमच्या सत्तावन पिढ्यांत कोणी हॉटेलात नोकरी केली नव्हती. मीही तसा कारकुनी पेशात असल्यामुळे करण्याची शक्यता नव्हतीच, पण या हॉटेलाने नोकरी देऊ केली, म्हटलं बघूया तरी कसं असतंय.
मध्य मुंबईतल्या जागेचे भाव प्रचंड. त्यामुळे हॉटेलातली जास्तीत जास्त जागा गेस्ट एरिया म्हणून वापरायला ठेवलेली. त्याखालोखाल किचन, बेकरी वगैरेचा नंबर. त्याखालोखाल हाऊसकीपिंगचा.
मिसळपाव