Skip to main content

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग ४ अणूपासून ऊर्जा

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 27/12/2013 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान ऊर्जास्त्रोतांच्या शोधात- भाग ३ विजेची निर्मिती मागील भागावरून पुढे चालू ... एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीला मादाम मेरी क्यूरीने रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लावला आणि पदार्थविज्ञानात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली.

कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 27/12/2013 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail) पार्श्वभूमी: Crabby ह्या शब्दाचा Crabbie असा अपभ्रंश करून, मात्र त्याचा अर्थ तोच घेऊन, हे कॉकटेल बनले आहे. खरेतर मी घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून Mixology मधला काहीतरी प्रयोग करायला गेलो आणि त्या प्रयोगाचे कॉकटेल ऑलरेडी अस्तित्वात होते हे आंजावर शोध घेता कळले, तेच हे क्रॅबी कॉकटेल. मालिबू रम हा ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे 'एक मखमली' टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच 'उंची' देऊन जाते.

धाव्वीची परीक्षा

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 27/12/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्याकाळी उदगीरला किमान मध्यमवर्गीयांमधे धाव्वीच्या परिक्षेचे महत्त्व लग्न, मुंज, मूल होणे आणि निर्वाण यांच्यापेक्षा जास्त नसले तरी कमी तरी नव्हते. मुल दहावीला असणे आणि नसणे यामुळे गृहजीवनावर फार व्यापक परिणाम पडे. मनोरंजनाचे स्रोत आणि कर्मे, इतर कुटुंबीयांची देखिल, पूर्णतः बाजूला ठेवली जायची. सातवीच्या मुलाने टीव्ही पाहायचा नाही, कारण दहावीतला मुलगा डिस्टर्ब होईल. तेव्हा माझी नववीची परीक्षा झाली होती आणि त्या महत्त्वाच्या दिव्यासाठी मनाची तयारी करत होतो.

तेंव्हा

लेखक psajid यांनी शुक्रवार, 27/12/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा स्वप्नांसाठी , जागणारी ‘तळमळ’ वेगळी होती ऊरी भीती हुरहूर , आवडणारी ‘हळहळ’ वेगळी होती ! जीव गहाण खळीसाठी , पैंजनास कान दिला कुंतलात मुख , मन वेधणारी ‘सळसळ’ वेगळी होती ! वीण जोडून वर्तमानी , दाविले भविष्य त्यांनी घेऊन प्राक्तन हाती, वाहणारी ‘कळकळ’ वेगळी होती ! भोवतीचं भान नाही , क्षण एकेक माजलेला बोचलं सुख ज्यांना , वाटणारी ‘खळखळ’ वेगळी होती ! दोष त्यांचाच होता , ज्यांच्या सदाचारी वल्गना पडदा घेऊन द्वेषाचा , भेदणारी ‘मळमळ’ वेगळी होती ! हिरावला मस्तकमोती , "साजीद" घायाळ अश्वत्थामा चौघांसारखी जखम , सलणारी ‘भळभळ’ वेगळी होती ! - साजीद यासीन पठाण
काव्यरस

अस्वस्थ.....

लेखक ज्ञानव यांनी शुक्रवार, 27/12/2013 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
१९९२ - ९३ च्या दरम्यान एक पोस्ट मोर्टेम पाहण्याचा योग आला. वय २५-२६ पूर्ण बेदरकार, प्रगल्भता शून्य.(माझ्याबाबतीत तरी....शेंडेफळ नेहमी उशिरा प्रगल्भ होत असावे.) पूर्वी म्हणजे १९७५-१९८० ह्या दरम्यान जेव्हा एखादा माणूस गाडी खाली आला कि त्याला तसेच फलाटावर आणून ठेवत. त्यामुळे तो पांढर्या कपड्यातला लाल ठीपक्यातला देह भेसूर दिसे पण हंड्ल न देतील तर ते मित्र कसले त्यांनी अरे शाळेत नाहीका बेडूक कापला होता तसेच त्यात काय भ्यायचे! असे म्हणून भरीस घातले आणि बेडकाची एवढीच काय ती धैर्याची शिदोरी घेऊन केलेलं ते धाडस! आम्ही ३ "वीर " निघालो.

बिटकॉईन

लेखक मारकुटे यांनी शुक्रवार, 27/12/2013 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी बिटकॉईन काय आहे असा धागा काढला होता आणि काही विचारणा केली होती. बहुधा धागा टाकतांना काही चूक झाली असावी म्हणून धागा प्रकाशित झाल्यावर काही काळाने तो अप्रकाशित करण्यात आला. असा धागा गायब झाल्यावर का गायब झाला, अप्रकाशित झाला याची कारणे समजली नाहीत. कूणाला विचारवे ते कळाले नाही. नशीबाचे भोग असे मानून स्वस्थ बसलो. दुसर्‍या कूणीतरी बिटकॉईनवर लेखन सुरु केले होते. ते सुद्धा मनसेच्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे थंडावलेले दिसते. बिटकॉईनवर इंग्रजीत बरंच काहीतरी लेखन सापडते पण नक्की मुद्दे क्लिअर होत नाहीत. असो. हे सर्व सांगायचं कारण 'बिटकॉइन' चलनापासून सावध रहा!

कथा :- मी जिंकलो, मी हरलो (३) - अंतिम

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 27/12/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
कथा :- मी जिंकलो, मी हरलो (१) कथा :- मी जिंकलो, मी हरलो (२) तुरुंगाचा दरवाजा उघडला आणि मी बाहेर पडलो. बरोबर १३ वर्षे आत होतो. अजूनही आठवतोय मला तो दिवस. अगदी काल परवा घडलेल्या घटने सारखा. पोलीसांनी अटक केली होती तेव्हाच मी माझा गुन्हा काबुल केला होता. त्यामुळे जास्त काही तपासणीची गरजच न्हवती. सक्त मजुरीची शिक्षा, कशासाठी? पत्नीच्या खुनासाठी , सदोष मनुष्यवधाच्या आरोप.खरं तर १४ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. पण चांगल्या वागणुकीमुळे १ वर्ष माफ केलं म्हणे.

असा(गेलो) मी आसामी.

लेखक बॅटमॅन यांनी शुक्रवार, 27/12/2013 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच कामरूप देशातील प्राग्ज्योतिषपूर ऊर्फ गुवाहाटी येथे जाणे झाले. नरकासुराच्या राजधानीत चारपाच दिवस होतो पण मोकळा वेळ दीडेक दिवस असेल नसेल. तस्मात बघावयास कमी वेळ मिळाला. तरी तेवढ्यात काही गोष्टी पाहता आल्या. कामाख्या मंदिर अन वसिष्ठ मंदिर पाहता आले नाही :( कारण वेळही मिळाला नै अन शिवाय कामाख्या मंदिरात गर्दी सोडूनही बळी देणे खुंदल खुंदल के चालू असते असे तेव्हाच तिकडे गेलेल्या एका प्राण्याकडून कळाले. मग म्हटले मरो तेच्यायला. एरवी एशी हाटलात बसून समोर मस्त सजवलेले, मसालेदार गिरवीत न्हालेले मांसाचे तुकडे चापावयास काही वाटत नाही पण ते प्राणी मारताना पाहून नै म्ह्टले तरी पोटात अंमळ ढवळतेच.

राजकीय चेटकीशोध अर्थात पॉलीटीकल विच हंटींग

लेखक विकास यांनी शुक्रवार, 27/12/2013 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
​आज मोदींच्या विरोधात पुन्हा चालू केला गेलेला खटला झकीया जाफरी आणि त्यांच्या बोलवित्या धनी मोदी विरोधक टिस्टा सेटलवाड (आणि पार्टी) परत एकदा हरल्या... अर्थात त्यांनी परत जाहीर केले आहे की आम्ही हा लढा चालूच ठेवू. जे झकीया जाफरींच्या बरोबर वैयक्तीक आयुष्यात झाले ते दुर्दैवी होते, अक्षम्य कृत्य होते. पण त्यांच्या आणि तशाच इतरांच्या भावनांशी खेळ करत जे काही टिस्टा सेटलवाड आणि त्यांच्या समाजवादी/डाव्या/स्युडोसेक्यूलर्सनी गेले १०+ वर्षे चालवले ते त्याहूनही अक्षम्य आहे असे वाटते. यात मोदी बरोबर का चूक, आदर्श का अजून काही हे माझ्या दृष्टीने अत्यंत मामूली आहे.

मला जेवायला बोलावले तर बायको, बोलावणर्‍याच्या ग्रुहीणीस खास फोन करून सांगते

लेखक विदेशी वचाळ यांनी शुक्रवार, 27/12/2013 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस माझ्या इंजिनियरिंग च्या शिक्षणाचे होते. ९१ किंवा ९२ सालचे. मी नांदेड ला होतो. हे दिवस तसे मजेचेच असतात. "आम्ही काय कोणाचे खातो रे? तो राम आम्हाला देतो रे" असे म्हणत घरून आलेल्या ६०० रु च्या पत पुरवठ्यावर, नाक वर करून जगण्याचे दिवस. ह्या वयातले पाप्याचे पितर पण पहिलवनला लालकरात फिरत असते. तर ते दिवस होते. नांदेड चे गवर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेज हे सरकारने ग्रामीण उत थॅना साठी सुरू केले होते. पण मुळे सगळी वेग वेगळ्या यूनिवर्सिटी मधून यायची. त्यामुळे खुद्द नांदेड ची मुले बोटा वर मोजली तरी काही बोटे तशीच उरायाची. बर वय म्हणाल तर "भलतेच बूभुक्षीत" वय असायचे. जेवणावळ दोन वेळचे जेवण द्यायची.