आंध्रप्रदेशातील मंदिर
आंध्र प्रदेशात सोनिया गांधी ह्यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे त्यात सोनियाजींचा फोटो लावून दररोज नियमित पूजा केली जाते. सोनियाजींमुळेच तेलंगाना राज्याचे स्वप्न साकार झाल्यामुळे तेलंगणातील जनतेला त्यांच्या बद्दल खूपच आदर वाटतो व ते सोनिया गांधीना यांना देवी मानतात.
तर अखंड आंध्रच्या समर्थकांनी स्व इंदिराजींचे स्मारक उभारले आहे. या मंदिराचे करीम नगर येथील तेलंगाना चौकात उद्घाटन झाले .या मंदिराच्या शेजारीच इंदिराजींचा पूर्णाकृती पुतळा आहे..
एखाद्या व्यक्तीचे मंदिर बांधणे हि तसे पाहिले विचित्रच गोष्ट आहे.
मिसळपाव
दुसरी घटना इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये सांगितली आहे. मात्र या घटनेकडे लोकांनी द्यावं तसं लक्ष दिलेलं दिसत नाही. “परधर्मो भयावहः” या लेखात त्यांनी द्रोणवधाचा प्रसंग वर्णिताना द्रोण आपला पुत्र अश्वत्थामा मेला हे ऐकुन देखिल शस्त्र खाली ठेवीत नाही हे मुद्दाम नमुद केलं आहे. मात्र जेव्हा भीम त्वेषाने त्याला ही जाणीव करुन देतो कि तो ब्राह्मण असुन लढणे हा त्याचा धर्म नाही. तेव्हा त्याचे धैर्य गळते. या घटनेचा थोड्या तपशीलाने विचार आवश्यक आहे.