Skip to main content

भरारी

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 03/01/2014 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
घेत भरारी गगन विहारी विहंग मन प्रतिमा कोरी वेध दिशांचे युगे युगे जन्मो जन्मी विस्मयकारी अशक्य कोटी असंख्य नाती गुंता अनुनय गाभारी अन्वय शोध बिचारे अगणित चुकार भाषा व्यभिचारी गाळिवशा रिपुकांच्या भिंती रोप पेरती अविचारी किती करावे थोडे ते तृप्ती न कधीच महाद्वारी द्यावे घ्यावे विसरावे परतून न यावे माघारी निववेल कुणी इच्छा वांच्छा थांबेल कधी का ही वारी ?? ………………………. अज्ञात
काव्यरस

मध्य प्रदेश सहल - ४ दिवस फिरण्याचे !

लेखक आनंदराव यांनी गुरुवार, 02/01/2014 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
कुठेतरी जायचयं,कुठेतरी जायचयं, असं आम्हां उभयतांना बरेच दिवस चालले होते. अनेक लोकांशी चर्चा झाल्या, अनेकांनी अनेक ठीकाणे सुचवली. काही तर परदेशातली होती.पण तिकडे जायचे नव्हते. मग मिपा च्या सदस्यांकडून मदत मागितली.http://www.misalpav.com/node/26383 जरा सांगा कुठे जाऊ ! हक्काची विनंती केली. मिपा सदस्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. खूप ठिकाणे सांगितली. पण परत प्रोब्लेम ! एवढी ठिकाणांची लिस्ट बघुन आम्ही कनफ्युज ! कारण सगलीच ठिकाणे बघण्यासारखी होती. मग आम्ही उभयतांनी फायनल चर्चा करुन मध्य प्रदेशात जायचे ठरवले.

नमिताचा क्लास (शतशब्दकथा)

लेखक आदूबाळ यांनी गुरुवार, 02/01/2014 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
कॉमर्सच्या बारावीला मार्कांचं एवढं काही कौतुक नसतं. तरी बोर्डात येणं भारीच! दहा मित्र-मैत्रिणींच्या ग्रूपमध्ये नमिताच बोर्डात आली होती. "माहेश्वरी आहे." कुळ्या म्हणाला. "कॉमर्सच्या बोर्डात नाही आली तर उपयोग काय मारवाडी असण्याचा?" सगळे जोरजोरात हसले. नमितासुद्धा, पण डोळ्यांत थोडी उदासी होती. बाकीच्यांना बरे मार्क होते तसे, भारी काही नाही. सीए करायचं. "झावरे" लावायचा, का "जोशी", का "अग्रवाल" हे ठरंत होती. नमिता एकटीच बसली होती, कडेला. क्लासचं विचारल्यावर म्हणाली, "काय पप्पा म्हणतील तसं..." आठवड्यातच तिची लग्नपत्रिका सगळ्यांना पोस्टाने आली. लातूरचा तेलाचा व्यापारी होता.

कान गुंतले बोंड्यांमध्ये!!

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 02/01/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजोबांसाठी बाबांनी एकदा वॉकमन आणून दिला होता. आजोबा रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यातून गाणी ऐकत बसायचे. तो वॉकमन आणून आता दहा-बारा वर्षं झाली असावीत. किंवा जास्तच... आज तो घरातल्या कपाटात इतर अडगळीच्या गोष्टींसमवेत पडलेला आहे. त्याच्यावर असं धूळ खात पडण्याची वेळ आणली मोबाईलच्या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने!! नवनवीन मोबाईल्स, आणि त्यांच्याबरोबर येणारे विविध रंगांचे, आकारमानांचे, कमी-जास्त ताकदीचे(ऐकवण्याची आणि टिकण्याची ताकद) हेडसेट्स. त्यांना कोणी हेडफोन्स म्हणतं, कोणी कॉड्स म्हणतं. आमच्या घरी, त्यांना 'बोंडं' म्हणतात.

चैतन्य -चूर्ण

लेखक Rahul Bhuskute यांनी गुरुवार, 02/01/2014 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मंडळी माझा पेशा अध्यापन असला तरी मी समाजाच्या कष्टकरी वर्गातूनच आलेलो आहे . हा मिसळपाव . कॉम वर लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे तर आजचा मुद्दां असा आहे की तंबाखू च्या सेवना वर नानाविध पद्धतीने बंदी आणून सरकार असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहे ,की त्याना देशातील जनतेच्या आरोग्याची फारच काळजी आहे …। इत्यादी . परंतु ग्यानबाची मेख अशी की सिगारेट व दारू महाग आणि कथित उच्चभ्रू व्यसनांवर कोणी बंदीची कुर्हाड आणू इच्छित नाही .

जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर

लेखक सुज्ञ माणुस यांनी गुरुवार, 02/01/2014 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरापैकी एक. अखंड दगडात केलेलं अप्रतिम असे कोरीवकाम आणि स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे मंदिर तसे फारसे प्रसिद्ध नाही. दुर्लक्षित अश्या या पांडवकालीन मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे ज्यामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे. इतिहास : शिलाहार वंशातील/ घराण्यातील असंख्य राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले.

हार्दीक शुभेच्छा . . .

लेखक अनंतसुत यांनी गुरुवार, 02/01/2014 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
आदरनीय व्यासपीठ ( फ़ बी ची टाईमलाईन ), कार्यक्रमास उपस्थीत प्रमुख पाहुणे (अपेक्षीत न्यु यीअर पार्टीचा पास कींवा पार्टनर न मिळाल्या मुळे नाईलाजास्तव घरी असणारी मंडळी) आणि माझ्या बंधु आणि भगिणीनो आज आपण इथे नेमके कशासाठी जमलो आहोत ह्याची तुम्हाला कल्पना आहेच (व्हॉट्स-ऍप, आणि एस एम एस ह्यांनी काल रात्रीपासुनच तसा धुमाकुळ घातलेला असेलच). तर आज ३१ डिसेंबर, म्हणजे आज नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा देण्याचा दिवस (खरं पाहिलंतर रात्र).

छायागीत २ - है कली कली के लब पर, तेरे हुस्न का फसाना…

लेखक Atul Thakur यांनी गुरुवार, 02/01/2014 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दी चित्रपट संगीतात खय्यामचा बाजच वेगळा. “आप यूं फासलोंसे”, “कहीं एक मासूम नाजुकसी लडकी” पासुन ते “दिखायी दिये यूं” पर्यंत कुठलीही गाणी घेतली तरी त्यावर खय्यामची स्वतःची अशी ठसठशीत छाप जाणवते असं म्हटल्यास वावगं होणार नाही. आकर्षक माधुर्य असलेली संथ चालीची गाणी तर खय्यामच देउ जाणे. मग ते “ऐ दिले नादां” असो की “अपने आप रातोंमे”. खय्यामच्या प्रत्येक गाण्यावर लिहीण्यासारखं खुप आहे. मात्र येथे मी “है कली कली के लबपर” ची निवड केली आहे.

भ्रामक मायाजाल

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 02/01/2014 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच दोन बातम्या आल्या साध्वी प्रज्ञा यांच्या वरचे आरोप NIA मागे घेणार http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-28/india/45651589_1… 2009 मडगाव स्फोट खटल्यातून सनातन साधकांची निर्दोष मुक्तता http://www.deccanherald.com/content/377725/court-acquits-sanatan-sansth… काही महिन्यापूर्वी झालेल्या दाभोळकर हत्येबाबतही सनातन वर भरपूर गरळ मीडियातून ओकण्यात

मिपाकरलक्षणे समास द्वितीय

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 01/01/2014 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरलक्षणे समास प्रथम | | श्री मिसळ पाव || | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय | मागा सांगितली लक्ष णे | मिपाकरांअंगी बाणे | आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ | तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी | खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२| घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या | अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३| बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर | प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४| वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा | निर्लज्ज ढोंग
काव्यरस