Skip to main content

शिवाजी महाराजांचे राजकारण

लेखक महायोग यांनी रविवार, 05/01/2014 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजि महाराजानि अतिशय चालाखिने स्वराज्याच्या शत्रुन्शी सामना केला. परन्तु मिर्झा राजे जयसिंगाने केलेल्या आक्रमणंनंतर महाराजांनी एकदम तहाची बोलणी सुरू केली व तेवीस किल्ले व सोळा लक्ष रुपये वसुलीचा मुलुख देवून तह केला. या प्रसंगी केवळ पुरंदर किल्ल्यावर मिर्झा राजे जयसिंगने आक्रमण केले होते. महाराज मिर्झा राजे जयसिंगसोबत एकदम तहास का तयार झाले यामागील महाराजांचे काय डावपेच होते हे मात्र कळत नाही. यापूर्वी अफजल खानने संपूर्ण ताकदिनिशी स्वराज्यावर आक्रमण केले, मुलुख बेचिराख केला परंतु महाराजांनी त्यास योग्य ठिकाणी आणून त्याचा वध केला.

छोटीसी मुलाकात प्यार बन गयी... २

लेखक वडापाव यांनी रविवार, 05/01/2014 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
छोटीसी मुलाकात प्यार बन गयी... योगायोगांबद्दल माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. संमिश्र म्हणजे, मला ते आवडतात सुद्धा, आणि त्यांचा रागही येतो. जेव्हा मी एखाद्या व्यक्तिचा सतत विचार करत असतो, ती व्यक्ती भेटत राहावी, समोर यावी अशी मनातल्या मनात प्रार्थना करत असतो, ती मुलगी समोर आल्यावर तिच्याशी मी कसा बोलेन, तिला कसा सामोरा जाईन वगैरे कल्पना रंगवत असतो, तेव्हा ती व्यक्ती कधीच समोर येत नाही.

क्षण

लेखक चाणक्य यांनी रविवार, 05/01/2014 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
सोनेरी किरणं अंगावर पडली तशी त्याची चुळबुळ सुरु झाली किणकिण्या डोळ्याने पाहिले त्याने आजूबाजूला आज नेहेमीपेक्षा जरा जास्त लख्ख वाटत होतं काय की... थोडं जास्त दिसतही होतं पण तरी अजून काही पहावं असंही वाटत होतं त्याला धडपडत ऊठलं ते आपल्या चिमुकल्या पायांवर तोल सांभाळत आजूबाजूच्या अनुभवी जीवांना कळलं आता काय होणार आहे ते त्यांना एकीकडे आनंदही होत होता आणि थोडं दु:खही कारण आज 'तो' दिवस होता... कुठुनशी एक आदिम ऊर्जा अंगात भरून झोकून दिलं त्याने स्वतःला आसमंतात त्याने....त्या पक्ष्याच्या ईवल्याश्या पिल्लाने आणि ऐकू आली ईतर अनुभवी पक्ष्यांना ती चितपरीचित फडफड पंखांची 'मी उडालो आई' 'हो रे पिला, तू उडा

सावळ्या तुझ्याविना...

लेखक आनंदमयी यांनी रविवार, 05/01/2014 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
सख्या कधीच लोपली मधाळ धुंद बासरी तरी अजून गुंजते मुकुंद नाम अंतरी अबोलशी पहाट ही उदास रे तुझ्याविना अजून सांज सावळ्या, शोधते तुझ्या खुणा सुनी सुनीच वाहते सुनी नदी सुन्या तिरी अजून माय साठवी घटा घटात क्षीर रे अधीरता मनात त्या लोचनांत नीर रे अशांत ती पुकारते फिरून ये पुन्हा घरी पूर्णतः प्रसन्न मी उदास गोकुळात या मनात हर्ष-शोक ना, पल्याड मी हरीप्रिया! कशास शोधु रे वृथा, मनात या वसे हरी... अदिती

नाना ची मनी ( सनी)

लेखक नानीचा नाना यांनी रविवार, 05/01/2014 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नाना ची मनी ( सनी) आम्ही सनी घेतली तेव्हा ती आमच्या सोसायटीतील ४८ सभासदांपैकी ३ री स्कूटर होती . यथासांग पूजा करून आम्ही आमच्या सनीचे स्वागत केले . त्यावेळी माझी मुलगी ७ - ८ वर्षांची असेल . तिला आमच्या सनी बद्दल अतिशय अभिमान होता . दर शनिवारी तिला मी स्नीवरून शाळेत सोडत असे. तेव्हा इतर मुलांसमोर स्वतः च्या सनी वरून चढण्या - उतरण्याचा तिचा रुबाब काही औरच होता . यथावकाश मला मुलगा झाला . तो तर सनीच्या मधल्या भागात धरून हरून उभा राहायला शिकला आणि इयत्ता ६ वीत जाईपर्यंत तो सनी चालवू लागला आमची सनी म्हणजे ' मूर्ती लहान पण कीर्ती महान ' अशी होती .

महाभारतातील “चलाख” महापुरुष - अंतिम

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 05/01/2014 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
mahabharat तिसरी घटना भीम दुर्योधन गदायुद्धाची आहे. यात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच लागल्यासारखी दिसते. परंपरेने सांगितलेल्या कथा लक्षात घेतल्या तर असं दिसुन येतं कि दुर्योधनाला कुठेतरी ही जाणीव होती कि शेवटी आपला सामना भीमाशी होणारच आहे. त्यामुळे त्याने अनेक वर्षे लोखंडी पुतळ्यावर गदायुद्धाचा सराव केला होता. गदायुद्धाचं शिक्षण प्रत्यक्ष बलरामाकडुन मिळवलं होतं. गदायुद्धात भीम वगळता दुर्योधनाच्या तोडीचा वीर त्याकाळी जवळपास नव्हताच म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.

हिंदी चित्रपटांचा "जॉय"

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी रविवार, 05/01/2014 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्‍या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने एप्रिल-जून २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे. ----------------------------------------------------------------------------------- जुन्या हिंदी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी २०११ हे साल दु:खद आठवणी ठेऊन गेलं. आधी शम्मी कपूर आणि मग देव आनंद यांना आपल्यातून हिरावून नेत त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का दिला.

माझी मिठि अद्याप खुली आहे..........

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी रविवार, 05/01/2014 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
कानी पडला आवाज पैंजणांचा झपकन नजर मागे गेली मनास झाला भास पावलांचा मला तर वाटले तुच आली असे कित्येकदा होत असते तुच सगळीकडे दिसत असते वार्याची एखादी झुळुकही तुझ्या येण्याची चाहुल भासते तु दूर जातेस जेव्हा परतीची मी वाट बघतो ज्या वाटेने गेलीस तु त्याच वाटेवर उभा राहतो तुझे निघुन जाणे नेहमीचेच माझेही वाट पाहणे नेहमीचेच जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे आपले भांडण होणे नेहमीचेच तु परत येण्याची खात्री आहे तरी अजुन रात्र भित्री आहे लवकर परत येशील का तु? माझी मिठि अद्याप खुली आहे.......... - कवि म.ना.दे.

पंजा माझा

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी रविवार, 05/01/2014 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा खूप भिववतो वर्षानुवर्ष विश्वासलो ज्यावर तोच हल्ली घाबरवतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वत:चाच पंजा खिसा कापतो दोन भा़ज्या जास्त खातोस रे हावरटा असे म्हणून धमकावतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा चिडवतो गाडी घेतलीस काय रे साल्या म्हणून हळुच इंधनाचे दर वाढवतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा हिणवतो ९५ टक्के मिळाले का रे तुझ्या पोरांना म्हणत ५०% वाल्याला डोक्यावर बसवतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा गंध पुसू पाहतो नार

....................... पोटदुखी...........

लेखक आशु जोग यांनी रविवार, 05/01/2014 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझा एक वैयक्तिक प्रॉब्लेम घेऊन इथे आलो आहे. कृपया मार्गदर्शन करावे... . ;). परवा मी माझा ट्रक घेऊन दिल्लीला चाललो होतो, माझ्या मागे आणखी एक ट्रक होता, ज्याचा ड्रायवर नवशिका होता. वाटेत घाटातून जाताना त्या नवशिक्या ड्रायवरने मला मागे टाकले. त्या ट्रकवर मागच्या बाजूला मोठ्ठ्या अक्षरात लिहीलेले होते. -- .. -- "बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं !" :) तेव्हापासून मला 'पोटदुखी'चा प्रचंड त्रास सुरु झाला आहे.