Skip to main content

अमिताभ बच्चन आणि “दिवार” (१९७५) चित्रपटातील संतप्त अंगार

लेखक Atul Thakur यांनी बुधवार, 08/01/2014 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
bachchan सर्वसाधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे कि अमिताभचा “अँग्री यंग मॅन” हा “जंजीर” या सुपरहिट चित्रपटातुन जन्मला. या समजात तथ्य आहे. मात्र याचा अर्थ असा नाही कि “जंजीर” पूर्वी अमिताभने त्याच्यातली आग पडद्यावर दाखवलीच नाही. “जंजीर” पूर्वी फार अगोदर अमिताभने “परवाना” चित्रपटात खलनायक साकारला होता. मदनमोहनचं संगीत लाभलेल्या या चित्रपटात “सिमटी सी शरमायी सी” हे किशोरचं आणि “यू ना शरमा फैलादे अपनी गोरी गोरी बाहें” हे रफी-किशोरचं द्वंद्व गीत होतं.

अविस्मरणीय...

लेखक वडापाव यांनी बुधवार, 08/01/2014 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
हुकूमानुसार मी क्लासला बुट्टी मारून ऑन हर मॅजेस्टी'च्या सिक्रेट मोहीमेवर निघालो होतो(म्हणजे तिच्या घरी निघालो होतो). याआधी इतक्या मोहीमा झाल्या होत्या, पण तरीही 'कधीना कधी तरी आपण पकडले जाणारच' या भितीपोटी नेहमी गडाच्या पायथ्याशी (म्हणजे तिच्या सोसायटीच्या मेनगेटजवळ) आल्यावर छातीत धडधड सुरू व्हायची. तशी ती आजही सुरू झाली. पण 'डर के आगे जीत है, घर के अंदर अकेली मेरी प्रीत है' असं मनातल्या मनात म्हणत मी निधड्या छातीनं जीन्स सच्चिन-स्टाईलमध्ये अ‍ॅड्जस्ट करत सोसायटीत शिरायचो. सोसायटीचा विस्तार तसा ब-यापैकी मोठा होता.

जे का रंजले गांजले

लेखक Rahul Bhuskute यांनी बुधवार, 08/01/2014 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमटे हे कुटुंब हे खरोखर आदरणीय आहे. बाबा आमटेंची मुले (डॉ. प्रकाश आमटे) हेच त्या आदिवासींच्या शाळेत शिकले व कुठलही आधुनिक सोविसुविधा नसताना डॉक्टर बनवून दाखवले. जिथे कुष्टरोग म्हटले तर आपल्या अंगावर काटा येतो व त्यांच्या जवळ पण जायची भीती वाटते. अश्या लोकांना आपले म्हणून जवळ केले व ते समाज कार्य केले ते खरोखर वंदनीय आहे. "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा." जेंव्हा सरकारांनी ९ वरील gas सिलेंडर वरील अनुदान रद्द केले तेंव्हा डॉ. प्रकाश आमटेनी असे सांगितले कि आम्हाला गस सिलेंडर भरपूर लागतात व सिलेंडर मध्ये आमचे खूप पैसे खर्च होतील.

एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे

लेखक विद्युत् बालक यांनी मंगळवार, 07/01/2014 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे २०१४ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या साहित्यिक व त्यांच्या लेखना ऐवजी एका जेष्ठ संपादकांच्या वादग्रस्त मुलाखती वरूनच जास्त गाजत आहे . ह्या महाशयांनी उधळलेली मुक्ताफळे इथे व इथे पाहायला मिळतील . आणि विशेष म्हणजे ह्याचा महाराष्ट्रातील तथाकथित सामाजिक विचारवंतानी निषेध पण व्यक्त केलेला नाही उलटे ह्यांच्या सुरात सूर मिसळलेला आहे .

भगवान जब लेता है छप्पर फाड के लेता है

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 07/01/2014 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
'आरं ते रम्या आलंय नव्हं,' 'आणि आलं का?,' 'म्हणजे लग्नाला मुलगी बघतोय माहीत नाय काय?,' 'लाय गावडळं हाय बघ,कोण देणार त्याला मुलगी,' 'आरं मुलगा कसला का आसना काम करणार पाहिजे,आणि हा तर शहरात वाँचमनी करतोय की,' 'ते बरोबर हाय पण याचं नशिब कसं फळणार,याच्या बरोबरची लगीन होऊन दोन दोन पोरं झाल्याती, आणि हा बसलाय हात हालवत,' आसे शिरर्क्या म्हणताना सर्व जण हासु लागले, या महिन्यात रम्यानं कारण नसताना चांगली पंधरा दिवसाची रजा काढुन गावी आला होता,पहिल्या पाच दिवसात त्यानं दोन मुली शेजारच्या गावात पाहिल्या,पण काही जुळले नाही.नेहमीप्रमाणे तो बाबाला हातबार लावण्यासाठी पिठाच्या चक्कीवर काम करी,मग वसंतराव ही रम

ट्रोजन युद्ध भाग २.४- अकीऽऽलिस! अकीऽऽलिस!! अकीऽऽलिस!!!

लेखक बॅटमॅन यांनी मंगळवार, 07/01/2014 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ भाग २.३ पॅट्रोक्लसच्या प्रेताभोवती तुंबळ कापाकापी होते. मागच्या भागात अकिलीसचा भाऊ पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरण पावला त्याचा वृत्तांत आलेला आहे. तो मेल्यावर माशा घोंगावाव्यात तसे त्याच्या प्रेताभोवती ट्रोजन घोंगावू लागले.

योगी पावन मनाचा

लेखक धन्या यांनी मंगळवार, 07/01/2014 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्ता, नावाप्रमाणेच मुक्त असलेली निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपानाची ही सर्वात धाकटी बहिण. वयाने धाकटी असली तरी मोठमोठयांचा नक्षा आपल्या ज्ञानाच्या अधिकारावर क्षणात उतरवून टाकणारी ती तेजस्वी मूर्ती होती. अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१ साली शुक्रवारी म्हणजेच इ. स. १२७९ ला जणू काही आदिशक्ती मुक्तेच्या रुपाने इंद्रायणीतिरी सिद्धबेटावर जन्माला आली. ज्ञानाने लखलख करणारी आकाशीची वीजच जणू चांदण्यांचा शीतल साज लेवून आपल्या ज्ञानी भावंडांना साथ देण्यासाठी भूतलावर अवतरली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या चार भावंडांमध्ये मुक्ता सर्वात धाकटी.

माझे [मावळत्या (भागः१/३)] पंतप्रधानांवरील आक्षेप

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 07/01/2014 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
या ठिकाणी कोणत्याही व्यक्ती अथवा पक्षाबद्दल लिहिण्याआधी या लेखमालिकेबद्दल प्रस्तावना म्हणा उद्देश म्हणा लिहिणे गरजेचे ठरते. सदर लेखमालिका राजकीय विषयावर असली तरी ती मी 'जनातले मनातले' विभागात टाकतो आहे कारण या लेखमालिकेत व्यक्त केलेली मते ही निव्वळ वैयक्तिक आहेत. ही मते माझ्या भोवती घडणार्‍या घटना, माझ्या वाचनात येणार्‍या बातम्या, मला जाणवणारी/दिसणारी वस्तुस्थिती यांच्यामुळे तयार झालेले माझे पर्सेप्शन आहे.

बीट पुलाव

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 07/01/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पाव कि. तांदूळ, एक टोमॅटो, दोन कांदे, १०-१२ फरसबी शेंगा, अर्धी वाटी मटार, पाव वाटी काजूगर, एक गाजर, ५-६ लसूण पाकळ्या, आलं एक छोटा तुकडा, लाल तिखट १ चमचा, एक चमचा गरम मसाला, दोन मध्यम बीट, तूप, जिरे, ५-६ काळी मिरी, मीठ. कृती: तांदूळ धूऊन निथळत ठेवावेत. बीट शिजवून घ्यावीत. साले काढून बीट मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यावी. काजूगर पाण्यात भिजत घालावेत. तांदूळ थोड्या तूपावर परतून मीठ, थोडे वाटलेले बीट घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. कांदे चिरून घ्यावे. गाजराचे पेरभर लांबीचे पातळ चपटे तुकडे करावे. फरसबीच्या शेंगांचे पेरभर लांबीचे तिरके तुकडे करावे.