Skip to main content

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 10/01/2014 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली. जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!! "एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.

शतशब्द कथा (वृद्धाश्रम)

लेखक योगी९०० यांनी शुक्रवार, 10/01/2014 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
अतिवास आणि खेडूत यांच्या लिखाणामुळे प्रेरीत होऊन एक शतशब्द कथा लिहायचा प्रयत्न करतोय...कोठेतरी वाचलेल्या एका संवादाचे हे एक छोटे रुपांतर आहे... चु.भू.द्या.घ्या. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "बाबा लवकर उशीर होतोय मला..." सातव्यांदा गुणेश खेकसला..”च्यायला रिक्षा/टॅक्सीचा आजच संप असावा आणि आजच बॉसने लवकर ऑफिसला बोलवावे.?” अरे बाबा, तुला उशीर होतोय तर मी एकटाच जातो. आता जवळच आहे.. नको नको, जड बॅग घेऊन या उन्हात तुम्हाला चालवेल? जमेल रे, हळू हळू जातो….

माया

लेखक नानीचा नाना यांनी गुरुवार, 09/01/2014 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
माया एक दिवस गेलारीत उभा राहून बाहेर होतो . तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला मनुष्य एका लहान मुलाला घेऊन पुढील रस्त्यावर बसला . त्यानंतर त्याने त्याच्या पोतडीतून एक तेलाची बाटली काढली व तो मुलाच्या हाता / पायांना लावू लगला .ते पाहून मला वाटले कि तो मनुष्य त्या लहानग्याची किती काळजी घेतो आहे क़दाचित त्या मुलाने व्यवस्थित मोठे होऊन आपल्या म्हातारपणी आपली काळजी घ्यावी असा रेखिला त्याचा हेतू असेल . तो मनुष्य बर्याच आपुलकीने त्याला तेल लावत होता व तो मुलगा देखील शहाण्यासारखा तेल लावून घेत होता .

काळजातली धग विझु देउ नकोस.......

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी गुरुवार, 09/01/2014 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रश्न विचारावासा वाटतो देवा तुला असा कसा संसाराचा गाडा तु उभा केला कुणी न जिंकती कुणी न हारती कुणी न हसती कुणी न रडती सारेच अभिमन्यु इथे नशिबाच्या चक्रव्युहात अडकती पैजांचा असतो डाव तीन पत्त्यांत रंगतो खेळ इथे कुणाचे कुणीच नसती फक्त असतो हाता-तोंडाचा मेळ क्षितीजाच्या वाटेवरती डोळे सारेच लावुन बसतात तोच सूर्योदय पुन्हा सूर्यास्त मनातल्या मनात हसत राहतात ठिणग्यांची कमतरता इथे अगदीच आहे असे नाही पण सारे रानच पेटुन उठावे असे काही घडतच नाही अद्याप घंटानाद होतोय गाभारी देवा तुझ्या अद्याप आस लावुन बसलोय पायरीशी देवा तुझ्या तुच आता ओढुन आण लाट वादळांची एखादी मुठी वळु दे नसा तापु दे होउन जाउ

टि टाईम स्नॅक्स प्रकार २ - तिरंगी पराठा

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 09/01/2014 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
Paratha साहित्य: १. गव्हाचे पीठ २. १ कप गाजराची पेस्ट ३. १ कप पालकाची पेस्ट ४. १ कप बिटाची पेस्ट ५. आलं-मिरची पेस्ट १ चमचा प्रत्येकि ६. ओवा/जिरेपुड - पाव चमचा प्रत्येकि ७. चवीनुसार मीठ ८. तेल कणिक भीजवण्यासाठि ९. बटर किंवा साजुक तुप पराठे भाजण्यासाठि कृती: १. गाजर, बीट वेगवेगळे वाफवून त्याची पेस्ट तयार करा. पालक ब्लांच करुन (उकळत्या पाण्यात एक १० मि. घालुन) त्याचीहि पेस्ट करुन घ्या २.

अर्थक्षेत्र भाग - ७ - "ट्रेंड" ते "ट्रेड" (अ)

लेखक ज्ञानव यांनी गुरुवार, 09/01/2014 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
कालच, बच्चे कंपनीला हॉटेलात हादडायची हुक्की आली आणि सौ पण त्यात सामील झाल्या. पुढच्या २० व्या मिनिटाला अस्मादिक हॉटेलातल्या एका कोपर्यात बापुडवाणे मेन्यू कार्ड न्याहाळत बसले होते. एरवी "यवनांना" (यौवंनांना ना ऽ ऽ ही. ) कितीही नावे ठेवली तरी हॉटेलात मेन्यू कार्ड यवन तत्वानेच वाचावे लागते. मग ४०-६५-१३५-१४५-१८५-२२५-२८५-६५-१३५-१४५-१३५-१३५ असे सुरु होते. मग उजव्याबाजूला सौ. किमतीचे वाचन आणि डाव्याबाजूला मुलांचा पदार्थ वाचन असा कल्ला सुरु असतो.

माझे पंतप्रधान[पदाच्या उमेदवारां(भाग: २/३)]वरील आक्षेप

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 09/01/2014 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या भागात (भाग १) सद्य/मावळत्या पंतप्रधानांवरील आक्षेप बघितले. या व यापुढील भागात आपण पंतप्रधानपदाचे एकमेव अधिकृतरीत्या घोषित उमेदवार श्री.नरेंद्र मोदी तसेच इतर संभाव्य शक्यता/इच्छुक जसे सर्वश्री राहुल गांधी, मुलायमसिंह यादव, शरद पवार, जयललिता, नितीश कुमार व अरविंद केजरीवाल यांच्यावरील माझ्या आक्षेपांची चर्चा करणार आहोत.

गेटींग (पेड) न्यूज, गेटींग पेड (न्यूज) लेख कसा वाचला (कसे वाचता) ?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 09/01/2014 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
फर्स्टपोस्टडॉटकॉमवर पेड न्यूज या विषयावरील लेखाचा हा दुवा तो लेख आणि वाचकांच्या प्रतिक्रीया दोन्ही वाचनीय वाटल्या. काथ्याकूटाचा विषय आहे : गेटींग (पेड) न्यूज, गेटींग पेड (न्यूज) लेख कसा वाचला (कसे वाचता) ?

कु.सुमार केतकर

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/01/2014 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
कु. सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व रजनीकांथ आलोकनाथ इतके उंच आहे.

पाऊस असा रुणझुणता...

लेखक चावटमेला यांनी बुधवार, 08/01/2014 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस कधीचा कोसळतो अंतरात काहूर अनामिक एक, दाटते स्पंदनांत... 'पाऊस' ह्या निसर्गाच्या अविष्कारातच जणू मला एक प्रकारची गूढरम्यता वाटते. परीक्षेत निबंध लेखनासाठी माझा आवडता ऋतू असा विषय असला की पावसाळा सोडून दुसरं काही खरडल्याचं स्मरणात नाही.