Skip to main content

पँथर गेला !

लेखक मारकुटे यांनी बुधवार, 15/01/2014 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गुरुर्बह्मा आणि संशोधनक्षेत्रातील निगरगट्टपणा

लेखक Atul Thakur यांनी मंगळवार, 14/01/2014 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे आपल्या पुर्वजांनी गुरुचं माहात्म्य सांगताना कसल्याही मर्यादा पाळलेल्या नाहीत त्यामुळे गुरु हा प्रकार सोकावलेला असुन त्याची फळं आपल्याला भोगावी लागत आहेत. अगदी पुर्वापारपासुन कुणी आपल्या आवडत्या शिष्यापेक्षा दुसरा पुढे जाऊ नये म्हणुन अंगठा कापुन घेतं, तर कुणी मुलाला जास्त विद्या मिळावी म्हणुन कपट करतं. गुरुची झोपमोड होऊ नये म्हणुन शिष्याने भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली तर त्याला काय फळ मिळाले? विद्या वापरायच्या ऐनवेळी विसरशील हा गुरुचा शाप. आणि अशा गुरुंच्या नावे गळे काढणारी, त्यांच्या नावाने पारितोषिके देणारी मंडळी नंतर अवतरली.

मराठीतील समर्पक शब्द हवे आहेत. ( प्लेसमेंट क्षेत्रामधील).

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 14/01/2014 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्लेसमेंट क्षेत्रात इंग्रजी भाषेचा प्रभाव बर्‍यापैकी दिसतो.कृपया मराठीमधील समर्पक शब्दांचा वापर सुचवावा. कॅम्पस रिक्रूटमेन्ट करिअरच्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही टर्निग पॉइंट इंटरव्ह्य़ूसाठी टिअर वन, टू, थ्री कंपन्या कोअर इंजिनीअरिंग कंपन्या बेसिक संकल्पना कट् ऑफ मार्केटिंग टीममध्ये स्ट्रेटेजी विद्यार्थ्यांची पॅशन पॅनेलला अ‍ॅप्टिटय़ूड ऑफर परदेशात पोस्टिंग प्रोजेक्ट वरील सर्व शब्द आजच्या लोकसत्ताच्या करीयर पुरवणीत आढळले.

मुहुर्त बघणे ,हे शास्त्र आहे कि थोतांड?

लेखक टॉपगिअर्ड फिलोसॉफर यांनी मंगळवार, 14/01/2014 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
मुहुर्त बघणे हा भारतीय लोकांचे एक आवडता विषय आहे. साडेतीन मुहुर्त ,गोरज मुहुर्त असे मुहुर्ताचे अनेक प्रकार असतात म्हणे, काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राच्या दुकानाचे उद्घाटन होते, त्याने मुहुर्त वगैरे बघितला नसल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते. यावरुन मला काही प्रश्न पडले आहेत. जाणकारांनी प्रकाश टाकावा. 1.मुहुर्तावर कार्यारंभ करण्याची सुरवात कधी झाली असावी? 2.मुहुर्तावर आरंभलेली कार्ये तडीस जातात म्हणे, याचा काही विदा आहे काय ? 3.भारतीय सोडले तर इतर जग मुहुर्ताच्या फंदात पडत नाही ,तरीही ते भारतापेक्षा प्रगत कसे? 4.पेशवाईचा पराभव मुहुर्त बघण्याच्या नादापायी झाला होता.

सण म्हटलं की निसर्गाला त्रास द्यायलाच हवा का?

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 14/01/2014 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
याविषयावर खूप आधीपासून लिहायची इच्छा होती, पण आज मकर संक्रांतीचं निमित्त मिळालं. आपण वर्षभरात एवढे छोटे-मोठे सण साजरे करतो, पण त्यातल्या देशाभरात मोठ्या प्रमाणावर साज-या होणा-या जवळ जवळ प्रत्येक सणामध्ये आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात निसर्गाचं नुकसान करत असतो. लेखनामागचा आशय शीर्षकावरून स्पष्ट होत नसेल तर - 'आक्षेप सण साजरे करण्याला नसून साजरे करण्याच्या पद्धतीला आहे.' असा आहे. सुरुवात मकर संक्रातीपासून करूया. हल्ली चायनीज नायलॉनचा मांजा मिळतो जो धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असतो. आकाशात खेळल्या जाणा-या चढाओढीमध्ये आपला पतंग काटला जाऊ नये म्हणून हल्ली बरेच जण हा नायलॉनचा मांजा वापरतात.

माझे पंतप्रधान[पदाच्या मुख्य इछुकां(भाग: ३/३)]वरील आक्षेप

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 14/01/2014 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीच्या दोन भागांत आपण मावळते पंतप्रधान श्री मनमोहन सिंग (भाग १), भाजपा/एन्डीएचे पंतप्रधानपदाचे अधिकृत उमेदवार श्री नरेंद्र मोदी व काँग्रेस उपाध्यक्ष व त्या पक्षाचे संभाव्य उमेदवार श्री राहुल गांधी (भाग २) यांच्यावरील माझ्या आक्षेपांचे विवेचन वाचले. या शेवटच्या भागात पंतप्रधानपदाच्या उर्वरित इच्छुक व काही प्रमाणात संभाव्यता असणार्‍या पक्षनेत्यांवरील माझे आक्षेप विशद करणार आहे.

प्रिय विद्या बालन हिस

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 14/01/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय विद्या बालन हिस, काल तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले. तुला ‘देड’ या शब्दाचा नेमका अर्थ ठाऊक होता का गं? बंबैय्या भाषेत ‘देड’ ह्या शब्दाच्या अर्थाला एक वेगळीच छटा आहे, ती ही तुला माहिती होती का गं? असावीच, नक्की माहिती असावी कारण तसे नसते तर तू ‘देड इश्किया’ मध्येही दिसली असतीस. पडद्यामागच्या खबरी काही मला माहिती नाहीत; त्यामुळे तू देड इश्किया नाकारलास की तुला देड इश्कियासाठी नाकारले गेले ते काही नेमके माहिती नाही, पण ‘जो होता है वो अच्छे के लिये होता है’ असे म्हणतात ते एकदम सत्यात उतरले आहे.

भिगवण....

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 14/01/2014 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
भिगवण ला पक्षी येऊ घातले आहेत....तरी हौशी पर्यटकांनी जाऊन यावे . Spoon copy Moorhen1 copy

किती बार बोला मत पी, मत पी.. ऐकताइच नई ये...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 14/01/2014 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
किती बार बोला - मत पी, मत पी.. ऐकताइच नई है... "खाना खाना के बाद आधा घंटा रुकने को बोला बुढ्ढा लोगने... बादमें पानी पीने का... ये सुनताईच नहीं।" "पेट में बैठा लोग को तकलीप होता भाय... हररोज नया हाटेल में मेनू कार्ड पकडकर साला उलटा सीधा खाता है... हज़म कैसा करायेंगे हम लोक... दो घास के बाद पानी पीता, कोक मूं लगाता, फिर पिझा के टुकडे मूं में ढकलताए... ठीकसे चबाता भी नही...फिर पीता ए... अपनके साथ अब नही जमता... जूस बनाना फिर मिक्स मार के डायजष्ट कराना पडता .. डॉक्टर के पास भी भेजा, हार्टभाई को भी मंजूर नही पडेला है...

आनंद मरते नहीं . . .

लेखक मन यांनी मंगळवार, 14/01/2014 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
"मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने ..." हे गाणं आवडतं? "जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये .... कभी ये रुलाये...." हे गाणं ऐकलत? "कहीं दूर जब दिन ढल जाये...." ह्यातलं भावपूर्ण वातावरण भिडतं मनाला? मग तुम्हाला "आनंद " माहिती नसणं कठीण आहे. मुळात तुमच्यापैकी कुणी आनंद पाहिलेला नसणं हेच मुळी अवघड आहे. माझ्यासारखा एक ना एक आनंद प्रेमी तुमच्या परिचयाचा असेलच. त्यानं आग्रहानं आनंद दाखवला असेलच. . . राजेश खन्नाचा "आनंद" माझा अत्यंत आवडता. खरं तर त्यात राजेश खन्ना नाहिच. त्यात "आनंद"च आहे.