Skip to main content

पँथर गेला !

लेखक मारकुटे यांनी बुधवार, 15/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Namdeo-dhasal… दलित चळवळीतील आक्रमक नेतृत्वाला भावपूर्ण श्रध्दांजली!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3959
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

आदरांजली. चेपुवर सतिश तांबेंनी लिहीलेलं. ग्रेस, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर नि आता नामदेव ढसाळ सगळे कॅन्सरचे बळी ठरलेत. :(

In reply to by पैसा

श्रद्धांजली. एका वादळाची अखेर. गेलेल्या बद्दल वाईट लिहु नये. मात्र त्यांच्या पत्नीने( मल्लीका अमर शेख) यानी ढसाळांच्याबद्दल एक कविता लिहीली आहे त्यात त्या म्हणतात " आता मी कुठल्याही वादळाला भुलणार नाही कारन मला कळून चुकलय सगळी वादळे शेवटी जमिनीवरच विसावतात). तेंडुलकरानी "कन्यादान " या नाटकात ढसाळांच्या व्यक्तीरेखीचे कम्गोरे चांगले टिपलेत

शेवटच्या दोन वर्षात त्यांना ऐकायचं भाग्य लाभलं होतं. त्यावरुन त्याकाळात त्यांची भाषणे आणि ते स्वतः किती लोकप्रिय असतील याचा अंदाज आला. ओघवती शैली आणि अधुनमधुन राजकारणावर मिस्कील शेरे. ते लोकांना अक्षरश: खिळवुन ठेवीत.

'आक्रंदतो आहे माझा जीव' म्हणून सामान्यांना साद घालणारे प्रस्थापितांना हादरा देणारे ''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...'' सम्यकाचे संदेश देणारे 'आकाशाचे झुंबर तुटून पडले' विनम्र आदरांजली

'आक्रंदतो आहे माझा जीव' म्हणून सामान्यांना साद घालणारे प्रस्थापितांना हादरा देणारे ''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...'' सम्यकाचे संदेश देणारे 'आकाशाचे झुंबर तुटून पडले' विनम्र आदरांजली

दलीतांच्या सामाजीक आणि राजकीय एकजुटीला बुद्धींचं आणि वास्तवाचं अधिष्ठान देण्याची क्षमता असणारा विचारवंत गेला :(

.