Skip to main content

संक्रांति ऋतू परिवर्तन

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 18/01/2014 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक: १८.१.२०१४. संक्रांति दरवर्षी जनवरीच्या १४ किंवा १५ तारखेला येते. त्या पूर्वी दिल्लीच्या कुडकुडत्या हिवाळ्यात माणूस काय लेखणी ही जमून जाते. जवळपास महिन्याभरा पासून बिछ्यान्यात दडून बसलो होतो.संक्रांति पासून मोठा होणारा दिवस जाणवू लागतो. सकाळी थंड वर आणि दुपारी सूर्याच्या उन्हात थोडी उष्णता जाणवते. पर्वतांवर बर्फ वितळू लागते. उत्तरेकडून येणारे वारे सुरु होतात ते शिवरात्री पर्यंत ४० दिवस राहतात याला ‘चिल्ला जाडा’असे म्हणतात. धुक्याचा परदा दूर होतो. शेतांत सरसोंला(मोहरी) फुले येतात. दूरपर्यंत पिवळा गालीचा पसरलेला सहज दिसतो.

काकस्पर्ष

लेखक दिवटा कारटा यांनी शनिवार, 18/01/2014 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक सिनेमा पाहिला इन्विजिबल या नावाचा. आत्मा मरणासन्न अवस्थेतलं शरीर शोधतो अशी साधारण कथा असलेला चित्रपट. आयएमडीबीवर रीव्हिव्यू वाचताना ट्रिवियामध्ये एक गोष्ट वाचली. "The shirt that Nick is wearing at the end of the movie bears a crow on the chest.

मनसुखसेट्ची चाय ! - २

लेखक पहाटवारा यांनी शनिवार, 18/01/2014 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनसुखसेट्ची चाय ! ... मनसुखसेठ्च्या अजब युक्तीवादावर प्रत्युत्तर न सापडून देशपांड्यांनी ऊगाचच गल्ल्याशी चाळा सुरु केला अन गावी गेल्यावर काय बोलायचे याची मनोमन तयारी सुरु केली. ***************************************** "रात्रीच्या जेवणापर्यंत परत यायला जमेल ना?" दुपारच्या जेवणाचा डबा ऊघडत सौ.देशपांड्यांनी विचारले.

एक कप चहा...!

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 17/01/2014 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक कप चहा..! अगदी मनापासून सांगतो चहाच्या "या" कपाने मी नेहमी भारावतो. परत परत हरवतो. कितीदा तरी पिऊन "हा " चहाचा घोट मला पुन्हा पुन्हा वेडावतो. आज बाहेर पाऊस तुफान "पेटलाय", अगदी माझ्यासारखा..! रागरंग बघून लवकर "विझेल" असं वाटत नाही...जुनीच सवय दोघांची.! भर दुपारीच दाटलाय मिट्ट काळोख डोळ्यांसमोर.! मी उभा असतो बाल्कनीमध्ये, भिंतीवर अंग रेलून...ध्यानमग्न योग्याप्रमाणे "त्याच्यावर" त्राटक जमवून.! मधेच चमकते लख्ख सय तुझी, एखादी वीज बनून माझ्या चेह-यावर.! आवेगाचे तुषार बघ हा कसा उडवतो उनाड वारा, अन् "फुलवतोय" काटा देहावर एक एक फटकारा..! एक, दोन, तीन....अगणित अगणित फटक्यांची शिक्षा.

तुम आगये हो...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 17/01/2014 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
Suchitra Sen   Suchutra-Sanjeev मुन्नी आणि शीलाच्या आधीच्या काळात, म्हणलं तर सरळसाधे आणि तरी देखील भारदस्त वाटावी अशी अभिनेत्री म्हणजे सुचित्रा सेन.

मनास गंध स्पर्शता...

लेखक आनंदमयी यांनी शुक्रवार, 17/01/2014 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
ओंजळीत या रित्या कुणी सुगंध पेरले मनास गंध स्पर्शता, शब्द शब्द जाहले .. भरून अंतरात या कुठून येइ चांदवा अचूक हेरल्या कुणी खुळ्या अबोल जाणिवा कुठून रंग पेरती मनी अगम्य कुंचले रहायचे मनात जे दडून आर्त काहिसे समूर्त आज जाहले भाव ते खुळे पिसे मनातले तरंग हे कुणी अचूक झेलले कशास जीव जाळतो भास पूर्णतः नवा अनोळखी, तरी कसा स्पर्श वाटतो हवा? ना कळे कधी कसे जिवात जीव गुंतले... © अदिती जोशी

पारा

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 17/01/2014 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
...पारा तुझ्या पावलांची इथे खुण अजुनी पडे पावलांना तुझी भुल अजुनी नभी कल्पनेच्या उन्हाचा धुराळा तुझ्या सावलीला उरे प्राण थोडा दिशांच्या उरी वादळाची कहाणी उरे जन्म आता दिव्याच्या ठिकाणी फुटे प्राण उल्केसम वेदनेला फुलांच्या उरी दाटतो घाव ऒला तुझा शब्द प्राणातुनी साद देतो जुन्या मैफिलीची जुनी य़ाद देतो तुझे ऒठ हळव्या मदाच्या मशाली रुधीरातुनी वाहते तप्त लाली उङो सप्तरंगी निशेचा धुराळा असा चंद्र श्वासातुनी माळ थोडा तुझे गात्र॑ गात्र लपेटून घेतो तुझे भास श्वासात माळून घेतो मिठीने सरावा युगांचा दुरावा इथे ज्न्म अवघा फुलांचा उरावा फिरे कालचक्रावरी उष्ण पारा .. उरे फक्त थोडा मिठीचा किनारा ड

कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २)

लेखक पिलीयन रायडर यांनी शुक्रवार, 17/01/2014 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १) ट्रिप प्लान करायला सुरु केलं तेव्हाच "ट्रीप अॅड्व्हायझर" ला शरण गेले होते. खुप शोधाशोध केल्यावर एक निश्चित समजलं, ते म्हणजे आपलं भयंकर कन्फ्युजन झालेलं आहे. ३ गेट्स पैकी कोणतं गेट निवडावं? कोणता झोन चांगला? सफारी म्हणजे काय? एका गेट हुन दुसर्‍या गेटला जायला म्हणे १ तास लागतो, मग हॉटेलमधुन एका गेट्वरुन दुसर्‍या भलत्याच गेटवर सकाळी ६ ला पोहचायचं कसं? असे एक ना दोन, हजार प्रश्न पडले.. म्हणलं मारो गोली.. जे हॉटेल बेस्ट,त्याच्या जवळचा झोन बेस्ट..म्हणुन चांगल्या हॉटेलवर लक्ष केंद्रित केलं.

मन अंतर्मन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 17/01/2014 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
उगवतीस क्षितिजावर हसते दिसते लोभस मोठे मावळतीला पुन्हाहि हसते पण ते खोटे खोटे दोन ध्रुवांची विलग अंतरे सलग न वाटे कोठे दिशा चुम्बकांच्या ऐशा अंतरात साटे लोटे कुणास ना ठाऊक कसे हे काळिज धडधडते क्षण एका भेटीस्तव मन अंतर्मन धडपडते ……………………… अज्ञात
काव्यरस

चॉकलेट चीझ केक (नो बेक )

लेखक wrushali kulkarni यांनी शुक्रवार, 17/01/2014 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- २ पुडे oreo बिस्किटं किंवा कोणतेही चॉकलेट बिस्किटं, १/४ कप बटर, १ कप क्रीम चीझ, १/२ कप चॉकलेट, १/४ कप सावर क्रीम( optional), साखर ( optional) कृती :-बिस्किटंाचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्या. त्या मध्ये बटर घालून नीट मिक्स करा . एका बाउल मध्ये क्रीम चीझ फेटून घ्या ( हॅण्ड मिक्सर ने केलेले उत्तम). दुसर्या बाउल मध्ये चॉकलेट वितळवून घ्या. वितळलेले चॉकलेट आणि सावर क्रीम ,क्रीम चीझ मध्ये घालून एकत्र करा. हवी असल्यास थोडी साखर घाला. एका मोठया भांड्याला foil लावा. त्यात आधी बिस्किटं आणि बटर चे मिश्रण घाला. आणि वरुन क्रीम चीज़चे मिश्रण घाला. हवे तसे सजवा.