Skip to main content

मनास गंध स्पर्शता...

लेखक आनंदमयी यांनी शुक्रवार, 17/01/2014 19:19 या दिवशी प्रकाशित केले.

ओंजळीत या रित्या कुणी सुगंध पेरले
मनास गंध स्पर्शता, शब्द शब्द जाहले ..

भरून अंतरात या कुठून येइ चांदवा
अचूक हेरल्या कुणी खुळ्या अबोल जाणिवा
कुठून रंग पेरती मनी अगम्य कुंचले

रहायचे मनात जे दडून आर्त काहिसे
समूर्त आज जाहले भाव ते खुळे पिसे
मनातले तरंग हे कुणी अचूक झेलले

कशास जीव जाळतो भास पूर्णतः नवा
अनोळखी, तरी कसा स्पर्श वाटतो हवा?
ना कळे कधी कसे जिवात जीव गुंतले...

© अदिती जोशी

लेखनविषय:

वाचने 2617
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया