Skip to main content

रानपाखरं.......!

लेखक psajid यांनी मंगळवार, 28/01/2014 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
बांधलं मचाण वर गाण्यात गळा, मधुरता मंधी दुमला शेतमळा !! येऊन चोर जोंधळ्यात दडं, शिवार टिपीत चाललीत पुढं !! भिरभिरली गोफण सुटला दगड, चोर जोंधळ्यात त्येनं केलं उघड !! का म्हून सतावता सुखानं जगू द्यावं, किती सोसलं पिकासाठी तुम्हा ते नाय ठावं !! घरी तान्हं ठिवून आलिया राखणीला, सोनं ठिवलं तरच वरीसभर पीठ भाकरीला !! - साजीद यासीन पठाण दह्यारी (पलूस, सांगली, महाराष्ट्र)
काव्यरस

उत्तरायण २०१४ - काsssssssssssssयपो छेssss (भाग ३)

लेखक मोदक यांनी मंगळवार, 28/01/2014 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १) उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २) रात्री ११ नंतर पतंग बाजार कसा असेल (आणि असेल का?) अशा शंका होत्याच, मात्र एकदम... . वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे, प्रकारचे (कागदाचे, प्लॅस्टीकचे पतंग) आणि त्यातही पुन्हा वैविध्य होतेच!!

<<<< उपकृमी वाढे खात्यात >>>

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 28/01/2014 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
कृमी हा शब्द जाणुन बजुन लिहिला आहे .. कच्चा माल : ओळखा पाहु ;) उपकृमी वाढे खात्यात जिलेब्या काथ्या कुटात कधी नवे, कधी जुने विकार जंत ताटात , उपकृमी वाढे खात्यात ।। १ ।। वाश्या : मी तुला सांगतो , इतकी वैचारिक कळवळ मी आयुष्यात बघीतलेली नाही. सई : आणि तु ? मघाशी धागा आला तेव्हा तुझा चेहरा का पडला ? वाश्या : माझा चेहरा कशाला पडेल ? माझा चेहरा पडायला मी शतकी धागे लेखकु आहे का ?

अराजकता

लेखक प्रसाद जवळे यांनी मंगळवार, 28/01/2014 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
राजसाहेब आपली वक्तृत्वशैली असो वा जीवनशैली त्याचे प्रचंड आकर्षण आजच्या तरुणाईला आहे, तर इतरांना कौतुक. मग तो विरोधी पक्षातील असो वा अमराठी!!! अर्थात आम्हीही त्यास अपवाद नाही आहोत. पण ते वैचारिक साम्यतेमुळे. साहेब कोणत्या विषयावर काय बोलतील, कोणावर टीका करतील, कोणाचे कौतुक करतील याचे अचूक अंदाज आम्ही बांधत असू, ते इतके अचूक असत की काही मित्रांना मी भाषणे लिहून देतो की काय अशी शंका येते. पण आता साहेबांची मोहिनी ओसरत चालली आहे, आमचे अंदाजही चुकू लागलेत.

रसिका

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 28/01/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतती खुणा गाठती रेशमी धागे हृदयात रुधिर रसिकाचे जेंव्हा जागे चांदणे टिपुर आवसेचे निर्मळ अवघे चंद्रास न माहित पण; ते पडद्यामागे श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया जन्मास सोबती गोत; खेळ खेळाया शोधण्या किनारा लाट हवी उसवाया प्रेरणा कामना उचंबळाचे कारण ऋतु गंध रंग रस चैतन्याचे सारण अभिसरण नसे ते; रुक्ष पोरके अंगण दशदिशा चराचर अस्वादास्तव आंदण ………………… अज्ञात
काव्यरस

ढोकळा

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 27/01/2014 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
ढोकळ्याच्या अनेक रेसिप्या यापूर्वी येऊन गेल्या आहेत, पण ही एका गुज्जु मैतरिणीची बिनताकाची ही रेसिपी थोडी वेगळी वाटली म्हणून तुम्हा सर्वांसाठी- साहित्य- नेहमीचेच.. डाळीचे पीठ(बेसन) साधारण कपभर, २ चहाचे चमचे रवा, पाऊण ते १ चमचा खायचा सोडा, १/२ चमचा धणे खरगटून, १-२ हिरव्या मिरच्या + पेरभर आलं भरड वाटून्, साखर,लिंबू,मीठ,तेल,मोहरी,हिंग,खोबरे,कोथिंबिर कृती- अर्ध्या लिंबाचे २ चमचे साखर घालून पेलाभर सरबत बनवून घ्या. त्यात मावेल एवढे बेसन घाला आणि ढोकळ्याच्या पीठाला भिजवतो तितपर सरसरीत कालवा.साधारण कपभर पीठ लागते. त्यात २चमचे रवा, खरगटलेले धने १/२ चमचा, १ चमचा तेल,१चमचा आलं मिरचीचे वाटण घाला.

अवकाशाचा वेध १ : सप्तर्षी व कृष्ण विवर

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 27/01/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :
  1. अंगिरस (Epsilon of Ursa Major)
  2. अत्रि (Delta Ursae Majoris)
  3. क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
  4. पुलस्त्य (Gamma Ursae Majoris)
  5. पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
  6. मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
  7. वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris).

प्रजासत्ता की प्रजा’सट्टा’

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 27/01/2014 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारी. एक असा दिवस, ज्या दिवशी १९५० साली भारत, एक प्रजासत्ता म्हणून उदयास आला. एक असा दिवस ज्या दिवशी भारताची आपली अशी घटना, आपलं संविधान लागू झालं, आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळाले. मतदानाचा हक्क मिळाला. प्रत्येक भारतीय नागरिकावर एक जबाबदारी आली. राष्ट्र घडवण्याची, राष्ट्राचा उद्धार करण्याची. आज २६ जानेवारी हा दिवस खिशावर, गाडीत, स्कूटर वर झेंडे लावण्याचा, आणि त्या दिवसापुरता राष्ट्राभिमान दाखविण्याचा दिवस म्हणून उरला आहे, असं चित्र दिसतं. येत्या २६ जानेवारीला भारताच्या प्रजासत्ता होण्याला ६४ वर्ष पूर्ण होत आहेत.

अठरा श्लोकी मराठी गीता

लेखक खेडूत यांनी रविवार, 26/01/2014 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत असणे आणि अर्थ सुद्धा समजत असणे हे फारच विशेष आहे. कांही जणांना ती पूर्ण पाठ असते. तसेच माझ्या आईला पण संपूर्ण गीता पाठ आहे. तेही साठ वर्षांपासून! मला संस्कृत येत नाही याचे नेहमी वाईट वाटते. पुढे कधी तरी नक्की करायच्या गोष्टीत संस्कृत शिकणे सर्वांत पहिले आहे. आमच्या गावातल्या शाळेत संस्कृत हा विषय माझ्या ब्याच पासून बंद झाला, कारण म्हणे संस्कृत शिक्षकांचा तुटवडा. हे खरे नसावे असे वाटते कारण आमच्या शाळेतल्या तांबोळी नावाच्या मुस्लिम बाई संस्कृत मध्ये एम ए होत्या आणि त्याना हिंदी शिकवावे लागे म्हणून त्याना वाईट वाटे!

ट्रोजन युद्ध भाग ३.१- अकिलीसचे शेवटचे पराक्रम व मृत्यू.

लेखक बॅटमॅन यांनी रविवार, 26/01/2014 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ भाग २.३ भाग २.४ भाग २.५ ग्रीक एपिक सायकल- पार्श्वभूमी. मागील भागात पाहिल्याप्रमाणे हेक्टरच्या मरणानिशी इलियड संपते, तर ट्रॉयचा पाडाव झाल्यानंतर ओडीसिअस त्याच्या घरी इथाका येथे १० वर्षांनंतर पोहोचतो तो १० कालखंड ओडिसीमध्ये आलेला आहे.