Skip to main content

बेताल भाषणबाजी!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 09/02/2014 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
http://abpmajha.abplive.in/incoming/2014/02/09/article259627.ece/%E0%A4… पवार घराण्यात जन्माला येणे ही एकमेव पात्रता असणार्‍या सुप्रियाताईसाहेब सुळे यांनी असा सल्ला दिला की आंदोलन करताना सामान्य लोकांच्या एस टीची जाळपोळ न करता नेत्यांच्या गाड्या जाळा!

अचानक कट्टा करू या का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 09/02/2014 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मिळालेल्या बातमी नुसार ठिकाण : सी.के.पी. हॉल, ठाणे वेळ : सगळ्यांच्या विचारांती नक्की करू या. कशासाठी : सीकेपी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी तारीख : १६ फेब्रुवारी. मला १५ पण चालेल.तसेही १५ ता. मी ठाण्यातच आहे.पण दर कट्टा शनिवारीच कशाला? असा योग्य आक्षेप कुणी घेवू नये म्हणून. बाकी... दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे ते गुरुवारी आणि मासे खावेत ते रविवारी सकाळीच असे माझे मत आहे

नोकरित होणारा अन्याय

लेखक Prajakta२१ यांनी रविवार, 09/02/2014 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरित होणारा अन्याय मी एका सहकारी बँकेत नोकरी करते माझा विभाग हा kind ऑफ back office आहे आणि २४*७ असल्यामुळे शिफ्ट्स मध्ये काम करावे लागते मी आणि माझी एक सहकारी अशा दोघीच यासाठी आहोत पण तिने तिचे संध्याकाळचे कॉलेज असते असे सांगून morning शिफ्ट मिळवली आहे आमच्या senior authority कडून (३ महिन्यांसाठी ) त्या senior बॉस ने पण दोन्ही बाजू समजून न घेता एकदम मलाच सेकंड शिफ्ट करायला लावली आहे( ३ महिन्यांसाठी ह्यात लेखी काही नाही हे सगळे फक्त तोंडी एका आमच्या तिघींच्या मीटिंग मध्ये ठरले आहे मी मला continuously सेकंद शिफ्ट जमणार नाही असे सांगून सुद्धा ) ठीक आहे असे समजून मी ते करायला तयार पण झाले पण

भविष्य दर्शन

लेखक उडन खटोला यांनी रविवार, 09/02/2014 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकांना दिवसा डुलक्या काढायची सवय असते . कामावर असताना अशा डुलक्या काढताना बॉस ने पाहिले तर महागात पडू शकते . इतकेच नव्हे तर गाडी चालवत असताना येणाऱ्या डुलक्या प्राणघातक अपघातास निमंत्रण देवू शकतात . पण हीच डुलकी तुम्हाला भविष्यात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब देखील दाखवू शकते . नुकत्याच अमेरिकेतील एका संशोधनात सुमारे ८०,००० लोकांचे अनुभव नोंदवण्यात आले। त्यापैकी सुमारे ६०% लोकांनी डुलकी म्हणजेच microsleep च्या काही सेकंदात पुढे काही दिवसात घडणार्या घटनातील काही अंश पाहिल्याचे सांगितले .

वासकसज्जा

लेखक रामदास यांनी रविवार, 09/02/2014 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी एका संध्याकाळी एका पत्रकार मित्राचा फोन आला. "रात्री साडेआठ वाजता आमच्या पाणवठ्यावर येणे." (माझा पाणवठा वेगळा आहे.).वेळेवर पोहचलो. मित्रासोबत आणखी दोघं तिघं बसले होते.पुनराचम्य... वगैरे झाल्यावर चर्चा मुद्द्यावर आली." रामदास, एका चित्रपटाचे संवाद लिहायचे आहेत." मी नकारार्थी मान हलवली.मग बराच आग्रह झाल्यावर मला पटलं की माझ्यात काहीही काम करण्याचे सामर्थ्य आहे.

"वल्लीं" बरोबर....घारापुरी कट्टा....दि. १ मार्च किंवा ८ मार्च..२०१४

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 09/02/2014 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, कालचा आमचा फोर्ट कट्टा छान पार पडला.काय काय बघीतले आणि कोण-कोण आले होते, ह्याचा व्रुत्तांत येईलच.फिरता-बोलता-पहाता आणि खाता कट्टा असल्याने, पुढील कट्टा पण लगेच ठरला. वल्लींना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने ते "घारापुरी" लेणी दाखवायला तयार झाले.मार्च मधली १ली तारीख किंवा ८वी तारीख. साल २०१४....

असे करु शकतो का ?

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 09/02/2014 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतल्या एका प्रथित यश महिला मंडळाचे इंटरनल ऑडीट सध्या करतो आहे. त्यात एक गोष्ट निदर्शनास आली कि ह्या विश्वस्थ संस्थेचे २५ लाखाचे (रुपये १०००० ते १०००००)फिक्स्ड डीपोझीट एका बँकेत आहेत. त्या बँकेने रुपये २५००० चे एक मूळ एफ.डी. टी डी एस च्या नावाखाली खाऊन टाकले आहे. बरे त्याचे सर्टिफिकेट विश्वस्थ संस्थेकडे तसेच आहेत. ह्यावर मी त्यांचा सीए आणि बँक व्यवस्थापक ह्यांना काही विचारले असता त्यांनी ते बरोबरच आहे असे सांगितले आहे.

अकबराचा मोबाईल हरवतो

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/02/2014 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
अकबराचा मोबाईल हरवतो नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्‍यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती. बिरबलाचे बादशाह अकबराकडे बारकाईचे लक्ष होते.

आय लव्ह यू........

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 09/02/2014 02:16 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : http://misalpav.com/comment/551311#comment-551311 ( पिवळा डांबीस काकाने प्रेरीत केलं त्यामुळे लिहायला घेतलं) फेब्रुवारी असूनही आज आकाश ढगाळलंय. कुंद म्हणता येणार नाही पण प्रफुल्लीत एकदम उत्साही. असं वातावरण असलं की कसं भाग्य फिदा असतं अशावेळेला दुधात साखर म्हणजे ऑफिसमध्ये क्लायंट ने मीटींगची डेट पोस्टपोन केलेली असावी.