Skip to main content

आदर्श पत्नी

लेखक सरिता बांदेकर यांनी रविवार, 18/12/2022 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आदर्श पत्नी “मॅम,आज सकाळी दोन मिटींग आहेत.एक ११.३० वा.शेळकेंबरोबर आणि १२ वा.

आयटीआरबाबत अरजंट मदत हवी आहे.

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 18/12/2022 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेच्या आभावी त्या एररचा स्क्रीन्शॉट, फोटो ईथे अपलोड केला आहे. https://postimg.cc/bG2WRTY4 असा एरर कोणी सॉल्व्ह केला आहे का (प्रश्न चिन्ह काम करत नाहीये). हा एरर सोल्व्ह होतो एक चलन तयार करुन १४०ब मध्ये त्या डिटेल्स टाकयाच्या. अगदी दहा रुपयांचे चलनही चालते.मी मेथड वापरुन बघितले आहे पण नाही झाला प्रोब्लम सॉल्व्ह. प्लीज ईथले कोणी ह्या बाबतीत काही मदत करु शकता काय (प्रश्न चिन्ह काम करत नाहीये).

पुन्हा

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 17/12/2022 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
कालचक्र उलटे फिरले अन् पुन्हा जन्मलो जुन्या चुका विसरून नव्याने करून बसलो काचपात्र भंगले तरीही जोडत बसलो मुखवट्यांस समजलो चेहरे तिथेच फसलो अढळपदी उल्का बघताना जरी कोसळलो डोळे कितिदा आले भरूनी तरीही हसलो बेचिराख होता होता मग पुनश्च रुजलो

हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा परिसर :भाग ३: कांगडा किल्ला व लोअर धर्मशाळा

लेखक गोरगावलेकर यांनी गुरुवार, 15/12/2022 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग येथे वाचा आज सहलीचा दुसरा दिवस. पहाटे लवकरच जागआली. बाल्कनीतून पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य दिसत होते. इमारतीच्या गच्चीतून अजून सुंदर नजारा दिसणार होता म्हणून वर आलो. आमच्या आधीच उठलेले काही जण दूरवर सूर्योदय पॉइंटला पोहचले होते. सूर्य पाठीमागच्या डोंगरातून वर येत होता त्याची किरणे समोरच्या शिखरांवर पडून उजळायला सुरुवात झाली होती.

दे दवांचे प्याले

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 14/12/2022 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
कितीदा ओठांवरती अव्यक्त राहिलेले शब्द ते तुझ्या मी, डोळ्यांत वाचलेले जायचे कुठेशी, मी चाललोय कोठे? तुझ्या रूपाने, रूपाली, मला भारलेले माळून दे म्हणालीस, माला तारकांची केशी तुझ्या टपोरे, चंद्रफूल माळलेले भेटता तुला उराशी, श्वासात आग येते क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले घनगर्द भावनांचा कल्लोळ माजतो ग दे दवांचे प्याले, पाकळ्यांत साठलेले - संदीप चांदणे
काव्यरस

वर्ल्ड टुर इन जस्ट वन अवर....

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 14/12/2022 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
@सहित्य सम्पदक भट्कन्ती दालन उघडत नाही म्हणून लेख इथे डकवला आहे. Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात ! @अनिंद्य, यांनी एका वेगळ्याच विषयाला हात घातला.संवेदनशील वाचकांचे विचारांना चालना देणारे प्रतिसाद आले. विषयाच्या अनुरूप जगायचा,वागायचा प्रयत्न करतोय. बाकी सर्व सोपे वाटले पण पहिल्या व तिसर्‍या पिढीतला गुंता कसा सोडवायचा हे लक्षात येत नाही.

मंदिराबाहेर भेटलेली देवी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी मंगळवार, 13/12/2022 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो ऑफिसमधून घाई गडबडीत परतला. आल्याआल्या कॅमेराची बॅग भरली. घडयाळ बघितलं सहा वाजले होते. मंदिराचा वार्षिक उत्सव चालू व्हायला अर्धा तास होता अजून. प्रसादाचं जेवण असलं तरी सगळे फोटो काढून जेवायला उशीर होणारच . थोडा चहा पोटात गेला तर उत्साह टिकून राहील शेवटपर्यन्त असा विचार करून शेजारच्या हॉटेलात जाऊन चहा घेतला. चहा पिता पिता फोटो कसे काढता येतील ह्याचा विचार केला . चहा पिऊन थेट ममंदिराकडे चालू लागला. जाता जाता नेहमीचे नियम स्वतःला पुन्हा एकदा बजावले - " मन आणि कॅमेरा कुठेही भरकटू द्यायचा नाही.

बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 13/12/2022 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक कित्येक वर्षांपासून बदामीला जायचं होतं पण योग काही येत नव्हता, तो ह्याच महिन्याच्या सुरुवातीस आला. झालं असं की ऑफिसमधल्या कामांमुळे सुट्ट्यांचं जुगाड काही जमवता येत नव्हतं, नोव्हेंबर महिन्यातले तर सर्व शनिवार, रविवार ऑफिसातच गेले होते, मित्रांनाही वेळेअभावी ठोस काही जमवता येत नव्हतं. तो योग अचानक जुळून आला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हा तिघांनाही शनिवार रविवार जोडून एकूण ५ दिवस सुट्टी काढता येत होती मग ठिकाणे शॉर्टलिस्ट करायला लागलो. एकंदरीत ४ ठिकाणे निवडली आणि त्यातून एक ठिकाण निवडण्याचं पक्कं केलं.

सिंहगड!

लेखक Bhakti यांनी सोमवार, 12/12/2022 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
"गड आला पण सिंह गेला","आधी लगीन कोंढाण्याच,मग माझ्या रायबाचं"ह्या ऐतिहासिक सिंहगर्जना लहानपणापासून ऐकून स्फुरण चढत.गड किल्ल्यांचा इतिहास केवळ वाचून नाही तर इथल्या पावन भूमीला स्पर्शून अनुभवला पाहिजे हे समजायला जरा उशीर झाला.पण ठीक आहे एक मुलीला इतिहास आवडतो,तर मुलीला हे लहानपणापासून समजलं तर खुप छान बदल घडेल.त्यामुळे जसे जमेल तसे गड दर्शनकरावं असं ठरवलं.सर्वात सोपा सिंहगड आहे , असं ऐकलं. पुणे दरवाज्यातून चढाई सुरु केली ,तिथेच शरभ चिन्ह आणि तानाजी मालुसरे,नावजी बलकवडे यांनी हा किल्ला शत्रुंकडून जिंकल्याचा उल्लेख आढळला.बलकवडे यांचा उल्लेख पहिल्यांदाच लक्षात आला.पुढे घोड्यांचे टाके,दारू टाके पा