Skip to main content

खिचडी बिघडली - विडंबन

लेखक नेत्रा वैद्य यांनी सोमवार, 03/03/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
भोंडल्याचं एक गाणं हरीच्या नैवेज्ञाला केली जिलबी बिघडली त्यातलं घेतलं एवढंसं पीठ त्याचं केलं थालीपीठ नेऊन वाढलं पंगतीत, जिलबी बिघडली त्यातला घेतला थोडासा पाक त्याचा केला साखरभात नेऊन वाढला पंगतीत, जिलबी बिघडली ह्या गाण्याचं विडंबन : आषाढी एकादशीला केली खिचडी बिघडली त्यातला घेतला एवढासा गोळा त्याचे केले वडे सोळा तळून काढले तुपात, खिचडी बिघडली त्यातलं घेतलं एवढंसं पीठ त्याचं केलं थालीपीठ खरपूस भाजले तव्यावर , खिचडी बिघडली त्यातली घेतली एवढीशी खिचडी त्याची केली कुर्डई-पापडी तळून काढली तेलात, खिचडी बिघडली

आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (पुणे)

लेखक अजय जोशी यांनी सोमवार, 03/03/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com नमस्कार, कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ५वे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास २०० कवींनी यात सहभाग घेतला आहे.

सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे .

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 03/03/2014 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकर हो, सज्ज व्हा ‘पेन्थिसीलिया’ सोनाक्षी सह आपल्या ‘महाकट्टया’ साठी. हा महाकट्टा लवकरच होऊ घातला आहे, तोही खुद्द सोनाक्षीच्या संगनमताने. सल्लूच्या खर्चाने. हे कसे बुवा? तर त्याचीच ही कहाणी : बॅटमॅनच्या या धाग्यात इरसाल यांनी “जर मी ह्यावर पिच्चर काढला तर पेन्थेसिलिआ चे काम फकस्त आनी फकस्त सोनाक्षी सिन्हालाच.” हे वाचून आम्ही अक्षरश: भारून गेलो, आणि आमच्या मन:चक्षु समोर सोनाक्षीबाला आणि तिचे पेन्थेसिलिआच्या वेषातील रुपडे साकार झाले. मग काय, लगेचच आम्ही तिला फोनून ही कल्पना सांगितली.

स्ट्फ्ड मटार पराठे

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 03/03/2014 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः नेहमीप्रमाणे पोळ्यांचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे. १ वाटी मटाराचे दाणे उकडून घेणे व मिक्सरला पाणी न घालता भरडसर वाटणे (मी फ्रोझन मटार वापरले आहेत) १-१/२ टेस्पून आले + लसूण + हि.मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं करु शकता) १/४ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून गरम-मसाला १/२ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर ही वापरू शकता) १/२ टीस्पून जीरेपूड मीठ चवीप्रमाणे १-२ टेस्पून बेसन बारीक चिरलेली कोथींबीर

स्पेशल "26" ... (घारापुरी कट्टा!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 03/03/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
तो मेरे मि.पा.करों... अब हम देखने जा रहे है... मि.पा. के जाने आउर माने सदश्यों का एक ऐसा रंगीन कट्टा.. एक ऐसा रंगीन नजारा ..जिसमे, "ड्रामा है..ट्रॅssssजिड्डी है... कॉमेडी है" https://lh4.googleusercontent.com/evonK-xthiHvDPFJh6vh8je0XcYWeTcdaO6eWYaJO00=w140-h54-p (ढिश्श..क्लेमरः- धागा आध्यात्मिक असल्यामुळे स्मायल्या भरपूर असणार आहेत! त्यामुळे ऐहिकां'न्नी फिल्टर-लाऊण धागा पहावा..म्हणजे मणा'स त्रास होणार णाही!!! =)) ...

पेशंट

लेखक सूड यांनी सोमवार, 03/03/2014 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज गजर दोनदोनदा रिसेट केला, अंथरुणातनं उठायचा अगदी कंटाळा आला होता. सवापाच झाले तसं डोळे उघडले आता उठलो नाही तर पुढच्या प्रवासाचे तीन तेरा वाजणार एवढं नक्की होतं. होय नाही करता पटापट आवरुन निघालो, कधी नव्हे ती रिक्षासुद्धा घराबाहेर पडल्या पडल्या मिळाली. लोकलने कर्जत गाठलं. इंद्रायणीच्या डब्यांच्या स्थितीबद्दल स्पीकर कलकलत होता. बरेचसे हुंबैकर पेंगुळलेल्या डोळ्यांनी इंद्रायणीची वाट बघत होते. गाडी आली, माझ्या जागेवर आधीच एकजण बसला होता. रिझर्वेशन आहे म्हणताना तो उठला आणि मला जागा मिळाली. अर्थात ती मिळणारच होती.

डोंबिवली कट्टा ०२ मार्च वृत्तांत

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 03/03/2014 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि ०२ मार्च रोजी डोंबिवली ( मध्यवर्ती ठिकाण -मुवि ) येथे हॉटेल नंदी पैलेस या ठिकाणी मिपा कट्टा संपन्न झाला. मुळात मला घारापुरी कट्ट्याला येता न आल्याची खंत होतिच म्हणून हा कट्टा करायचाच हे मी ठरवले होते. माझ्या मुलाची बारावीची परीक्षा असल्याने मला थोडासा उशीर झाला.( मी त्याचा अजून अभ्यास घेतो हे मला आनंदाने नमूद करावेसे वाटते). मुवि आणि बाकी सर्व जण साडे सात वाजता तेथे पोहोचले आणि जागा राखून ठेवलेली होती. त्यामुळे मी पोहोचे पर्यंत समारंभाला सुरुवात झालेली होती. आजचे आपले पाहुणे श्री दीपक कुवेत ते पण पोहोचलेले होते. माझी कल्पना अशी होती के हे कोणीतरी मध्यम वयीन सद्गृहस्थ असावेत.

मकरतोरण आणि कमलवेल

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 03/03/2014 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, दै. 'लोकमत' च्या दर बुधवारच्या 'युरेका' या पुरवणीत डॉ. साने मॅडमचे वृक्षपरिचयाचे लेख येत आहेत. दि. ११/०९/२०१३ च्या पुरवणीत कमळाबद्दल मस्त लेख आलाय तो इथे मुद्दाम देत आहे.... 'पद्मपुराण'.......... 'इचिरो ओहगा (Ichiro Ohga) एक जपानी तज्ञ. गोष्ट १९५० ची. त्यांना कोळशाच्या दलदलीत काही बिया सापडल्या. 'कार्बन १४' या कालमापन पद्धतीनं ओहगा यांनी त्या बियांचं वय आजमावलं. ते निघालं अंदाजे दोन हजार वर्षे. ओहगा महाशयांनी नंतर या बियांवर काही संस्कार करून, त्या रुजवल्या. बिया रुजल्या. रोपं उगवली. ओहगांनी ती दलदलीत लावली. आश्चर्य म्हणजे, या रोपांच्या छान वेली वाढल्या.

अडकलेले सुपारीचे कण .... भाग १... भूलाबाईची गाणी....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 03/03/2014 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त पैकी छान जेव्ण झाले, की पान हवेच आणि पान म्हटले की सुपारी पण हवीच.आता सुपारी कच्ची असु दे की पक्की, कधी ना कधी ती दातांत अडकण्याचा पण संभव असतोच आणि दातांत अडकेलेली सुपारी , जोपर्यंत निघत नाही,तो पर्यंत जीवाला स्वस्थता पण लाभत नाही. तसेच कधी कधी आपले पण होतेच.मनांतल्या कुठल्या तरी कोपर्‍यात काही सुखद किंवा दुखःद आठवणी दडलेल्या असतांत आणि कुठल्या तरी कारणामुळे त्या परत जाग्या होतात. काल-परवा पण असेच झाले.खानदेशी शेवेजी भाजी वाचली आणि मन एकदम भूतकाळांत पोहोचले.आमच्या आजोबांना १२ मुले-मुली (५ मुले आणि ७ मुली).आता ह्या सगळ्यांना सांभाळायचे, म्हणजे घर पण तसेच हवे आणि आमचे घर पण तसेच होते.२५