Skip to main content

ज्ञानेश्वरी

लेखक मनो यांनी सोमवार, 17/03/2014 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज सॅन फ्रान्सिस्कोच्या एशियन आर्ट म्युझियमला भेट देण्याचा योग आला. पाश्चात्य शैलीच्या इमारतीत तामिळनाडूमधला नंदी, जपानी अमूर्त चित्रे, अफगाण गांधारशैलीतील ग्रीक शिल्पे, चीनी दुर्मिळ कपबश्या सारंकाही एका छताखाली मांडलेले. प्रकाशयोजना उत्कृष्ट आणि माहिती देणारी सुंदर. त्यामुळे तसं आवडीने सगळं पहात होतो. त्यातच एकदम मला काही मराठी अक्षरं दिसली आणि अगदी माहेरचं माणूस भेटल्याचा आनंद मला झाला.

ओळख पाहू -होळीमय चारोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 17/03/2014 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
(१) गुरूलाच दाखविला धोबीपछाड तयाने घालूनी टोपी गुरुची युद्धात उतरला सत्यवीर(?) (२) जनसमुद्र दिसत होता डोळ्यांसमोर तयाचा की नजर अधू जाहली की कबूतरे उडुनी गेली? (३) भीष्मासम वृद्ध हा सेनानी महान एक पदाती सम आज का उतरला रणांगणात? (४) आधी लगीन गादीशी मग राजकन्येशी विच्छा त्याची आज पूर्ण होणार का? (५) द्वारकेचा राजा होणार का दिलीश्वर. कि कुणा अर्जुनाचा सारथीच ठरणार?

केजरीवाल ,राजकारणातील राखी सावंत

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी रविवार, 16/03/2014 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे. ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले. आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे. मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागला

दिल्लीची होळी -सल्तनत काळची- अमीर खुसरोच्या लेखणीतून

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 16/03/2014 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुद्राराक्षस या नाटकात मदनोत्सव उल्लेख आहे. वसंत ऋतूत सुंदर स्त्रिया [सर्व स्त्रिया स्वत:ला सुंदरच समजतात] आपल्या प्रेमी वर आम्र मंजरी फेकायच्या). कादंबरी या उपन्यास मध्ये कामदेवाच्या मंदिराचा उल्लेख आहे आणि पूजा करण्याचे वर्णन ही आहे. १३व्या शतकातल्या होळीचे [दिल्ली सल्तनत] अमीर खुसरोने सुन्दर वर्णन केले आहे. आज रंग है ऐ माँ रंग है, मोरे महबूब के घर रंग है। दैया री मोहे भिजोया री शाह निजाम के रंग में कपडे रंगने से कुछ ना होत है या रंग में मने तन को डुबाया री दैया री मोहे भिजोया री शाह निजाम के रंग में। ... ‘कपड्यांवर रंग टाकल्या ने काही होत नाही.

पडघम- २०१४ भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 16/03/2014 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक या लेखाने पडघम-२०१४ या लेखमालेची सुरवात करत आहे. या लेखमालेसाठी १९८९ पासून सर्व निवडणुकांच्या आकडेवारीचा उपयोग करणार आहे. ही आकडेवारी जमा करायला मी सुरवात केली होती गेल्या वर्षीपासून.गेल्या २-३ महिन्यात ज्ञानोबाचे पैजार, पैसाताई, राहुलजीव्ही, सुहासदवन आणि श्रीरंग जोशी यांनी ही आकडेवारी एकत्र करायला महत्वाची मदत केली. या मिपाकरांच्या मदतीमुळेच ही लेखमाला पूर्ण होणार आहे त्यामुळे त्यांचे सर्वप्रथम आभार मानून या लेखमालेला सुरवात करतो. या भागात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानात फरक असतो का या प्रश्नाचे उत्तर शोधू.

संस्कारनगरी वडोदरा

लेखक संतोषएकांडे यांनी रविवार, 16/03/2014 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मोदक यांचा वडोदरा (बडोदा) प्रवासाचा लेख मिपावर आला होता. वडोदरा बद्दल ओढ असणारे बरेचशे मिपाकर त्या लेखाच्या प्रतिक्रीयेत दिसले. म्हणूनच वडोदराची जवळून ओळख करून देण्यासाठी हा लेख. संस्कारनगरी,विध्यानगरी,साहित्यनगरी किंवा कलानगरी अशी विश्वात कीर्ती मिळवून देण्याबद्दल वडोदरा संस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड ३रे यांचं सदैव ऋणी आहे. स्वातंत्र्याआधी वडोदरा संस्थान निझामाच्या हैद्राबादा नंतर भारताचं दूसरं भव्य राज्य होतं. तरीही वडोदराला इंग्रजां कडून जास्तच महत्व मिळालं होतं. श्रीमंतांनी बरीचशी स्थापत्य व महालांचं राज्यात निर्माण केलं.

तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 16/03/2014 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
अजून नात्यात या पुरेसा तणाव नाही सिधासिधा खोल घाव आहे , बनाव नाही जरी तुझी धारदार हुकुमी कट्यार आहे, छलकपटाचा तुला पुरेसा सराव नाही किती दयाळू, महान आहेस तू खरोखर तुझ्यासमोरी इथे कुणाचा निभाव नाही! तुझ्या कृपेचे कधीच आकाश सोडले मी मला उमगले कुठेच माझा पडाव नाही अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही हवी तशी उत्तरे तुझी दे ,तुझ्या कलाने तुझ्या खुशीचा सवाल आहे, दबाव नाही अखेर मरणात हात माझ्या तुझाच होता तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही डॉ.सुनील अहिरराव

मेरा हो ज्जा बालमा कहेती है मिस पिल्ले...

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 16/03/2014 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
आयला या बायका म्हणजे......हुS श शीर्षक वाचले .. आणि बोंगाली भाषी नटखट किशोर कुमार आठवला... मेरे दिलमें प्यार इल्ले इल्ले! म्हणणाऱ्या प्रियकराला सुरवातीलाच 'पेकाटात लाथ' घालून मदरासी नृत्यांगना पद्मिनी, 'रागिणी' (1958) सिनेमात स्टेज डान्समधे खेळकरपणे 'मेरा हो ज्जा' म्हणताना, मैं बंगाली छोकरा ऐका व टेन्शन दूर करा. होलीचा मूड बनवा. शिवाय हे ऐकले तर आणखी एक गाणे फ्री...

थोडं समजून घ्या ना...!!! (भाग २)

लेखक वडापाव यांनी रविवार, 16/03/2014 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
थोडं समजून घ्या ना...!!! घरी गेलो. जेवण कसंबसं एकदाचं आटोपलं. ते आटोपल्यावर पलंगावर नुसताच पाय जवळ घेऊन बराच वेळ बसून राहिलो होतो. आई आली, दोनदा 'दिवे मालव' असं म्हणून गेली. तरीही मी तसाच. शेवटी तिनेच येऊन दिवे मालवले. तरीही मी पाच दहा मिंटं तसाच बसून होतो. ती पुन्हा भेटली तर... पुन्हा पुन्हा भेटतच राहिली तर... अरे? जर-तर काय? भेटायलाच हवी पुन्हा!! कसंही करून काहीही करून तिचा नंबर मिळवायलाच हवा. काय करावं?? आधी ब वर्गात असलेली पण नंतर सेमी मध्ये आलेली एक मुलगी होती ओळखीची.. पण तिच्याशी फारसं बोलणं होत नसे. विचारायचं का तिला?

क्रंचीझी मॅगी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 16/03/2014 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
‘मला स्वयंपाक येत नाही, पण हां! मॅगी येतं !’ असं एखाद्याला म्हणताना तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. मॅगी या अशा सहजसुंदर व्यंजनात आपल्या वाईट सवयीप्रमाणे काहीतरी किडे करून नवीन रेसिपी तयार करण्याचा हा माझा एक सफल (हो म्हणजे... आवडलेला!) प्रयत्न. साहित्य: २ मो. चमचे साजुक तूप १ चमचा जिरं १ चिरलेला बटाटा २ चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा बदाम २ मो.