Skip to main content

क्रिकेट आणि मी

लेखक kurlekaar यांनी मंगळवार, 18/03/2014 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट आणि मी क्रिकेट चं माझं वेड अगदी लहानपणापासून -म्हणजे चौथी पांचवी पासूनचं. तेंव्हा तो खेळ देखिल कळायचा नाहीं व इंग्रजीतील commentary सुद्धा. पण विजय हजारे खेळायला आला की मी रेडीओ जवळ बसुन राह्यचो. तेंव्हाची audio technology सुद्धा फारशी प्रगत नव्हती. फलंदाजाने फटका मारला की वाऱ्याची झुळुक यावी तशीच एक disturbance ची wave रेडीओवर यायची.पण तो एक चौकार होता का एकेरी वा दुहेरी धावा होत्या ते कळायचं नाही.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ५

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 18/03/2014 07:04 या दिवशी प्रकाशित केले.
साऊथ कोल ही २६००० फूट उंचीवरील एव्हरेस्ट आणि ल्होत्से या शिखरांना जोडणारी खिंड आहे. १९५२ च्या स्विस मोहीमेतील गिर्यारोहकांनी सर्वात प्रथम साऊथ कोल वर चढाई केली, परंतु शिखरावर पोहोचण्यात त्यांना अपयश आलं. १९५३ ब्रिटीश मोहीमेत ( हिलरी - तेनसिंग ) विल्फ्रेड नॉईस आणि अनुलू शेर्पा यांनी साऊथ कोलवर प्रथम प्रवेश केला. पुढे हिलरी - तेनसिंग यांनी साऊथ कोलचाही वरच्या भागातून आपल्या अंतिम चढाईला सुरवात केली होती. सुमारे ४०० मी लांब आणि १५० मी रुंद असलेल्या या पठार वजा खिंडीच्या परिसरात तुफान वेगाने वाहणा-या वा-यांचं साम्राज्यं असतं.

मागोवा लोकसभा निवडणुकांचा..१ पहिल्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान

लेखक लाल टोपी यांनी सोमवार, 17/03/2014 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
सोळाव्या लोकसभेचा बिगूल वाजला आहे. कार्यक्रमाची घोषणाही झाली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकाशाहीतल्या सर्वात मोठ्या उत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. भारतीय राजकारणाला दिशा देणा-या या निवडणुकांचा इतिहास रोचक आहे. या निवडणुकांचे बदलते स्वरूप, मुद्दे, नेते यांचा या लेखमालेत आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. २६ जानेवारी १९५० या दिवशी सार्वभौम राष्ट्र झाल्यावर याच वेळी अस्तित्वात आलेल्या घटनेप्रमाणे भारतात १९५१ या वर्षी पहिल्या लोकसभेच्या निवडणुका घेण्याचे निश्चित झाले. मुळातच भारताकडे निवडणूक घेण्यासाठी यंत्रणाच नव्हती.

भजन - महागाई

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 17/03/2014 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमाच्या, अल्बम च्या गाण्यांच्या मीटरवर बसवलेली भजनं हा संगीताचा एक विशिष्ट प्रकार म्हणावा लागेल. त्यात फूल न फुलाची पाकळी म्हणून ही माझी एक प्रामाणिक भर.

निवडणूक २०१४ अनुभव: १. नावनोंदणी

लेखक आतिवास यांनी सोमवार, 17/03/2014 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात सार्वत्रिक निवडणूक घ्यायची हे एक आव्हानात्मक काम आहे याची मला कल्पना आहे. निवडणूक आयोगाचं आणि निवडणूक प्रक्रिया नीट व्हावी म्हणून राबणा-या इतर यंत्रणांचही त्यासाठी कौतुक करायला पाहिजे. दर वेळी या निवडणूक प्रक्रियेतून आपल्यासारख्या सामान्य लोकांना बरंच काही शिकायला मिळतं. मला आठवतं – मी जेव्हा मतदान करायला ‘पात्र’ झाले त्यावेळी ‘पवित्र राष्ट्रीय कर्तव्य’ पार पाडण्यासाठी मी अत्यंत उत्सुक होते. पण बरीच वर्ष मी आणि मतदान यांचा पाठशिवणीचा खेळ चालला. दरवेळी मी नाव नोंदवायला गेले की आधी एक तर कागदपत्रांची अडचण यायची.

बाबा वाक्यं प्रमाणं.... भाग १...

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 17/03/2014 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख हा तद्दन विनोदी आणि फालतू लेख आहे.खूद्द आम्हीच ह्या लेखाला जास्त किंमत देत नाही.आता आम्हीच लेख लिहीणार, म्हटल्यावर त्यात आमचा उल्लेख असणारच.ह्या लेखातील व्यक्ती आजूबाजूला असतीलच असेही नाही आणि नसतीलच असेही नाही.

नसतील शब्द जिवंत जर का

लेखक वैभवकुमारन यांनी सोमवार, 17/03/2014 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे) नसतील शब्द जिवंत जर का अबोल राहतील नातीगोती शब्दावाचून मुके अर्थ हे रडत बसतील हळव्या पोटी नसेल रुसवा नसेल फुगवा नसतील ओळी सुंदर ओठी शब्दावाचून ओठांच्या ह्या होणार नाहीत गाठी भेटी देवही तिकडे मलुन होतील भजनावाचून वीझतील वाती पुस्तक डोळे मीटुनी म्हणेल माझी नाही राहीली ख्याती बाळाला ही झोपवताना अंगाईविना सरतील रात्री कविवर्याच्या कल्पकतेला शब्दावाचून लेगेल कात्री

पापभीरू

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 17/03/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता.

कंपासपेटी

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 17/03/2014 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू मोज त्रिज्या, पण फार आक्रसू नकोस परीघ असं का बघते आहेस आश्चर्याने फिरव की तुझा हात पटापट तुझ्या वहीवर लिहून थांबू नकोस नाहीतर मी राहीन घुटमळत तुझ्यापाशी तो पर्यंत माझ्याही वहीवर उमटत नाहीत तुझी अक्षरे जो पर्यंत चल लवकर मोज व्यास दे उत्तर चटकन् उशीर करू नकोस फार वेळ नाही राहीलाय कारण . . . . . . . . . . . . . . . गधडे, मी कंपासपेटी घरीच विसरलोय.
काव्यरस