Skip to main content

अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव -१

लेखक तिमा यांनी गुरुवार, 15/05/2014 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अ‍ॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती. गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अ‍ॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे.

आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं नवीन अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप

लेखक विश्व यांनी गुरुवार, 15/05/2014 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप तय्यार केले आहे. Google Play वर आपण हे अ‍ॅप या लिंक वर डाउनलोड करू शकता http://bit.ly/1hOrUnZ हे अ‍ॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे.

दुस्री

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 15/05/2014 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास. गुर्जी म्हन्लं "आता दुस्रीत". म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत. गावभर हिंडून दारात बसली. मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली. आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी. कायबी कराया गेलं की "ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा" म्हनत्येत. त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू.

सिनेमा आणि प्रेम

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 14/05/2014 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा का कोण जाणे उगीचच बदनाम झालेला आहे. सर्वच उच्चभ्रू लोकांची त्याला येनकेनप्रकारेण नावं ठेवण्याची अहमहमिका लागलेली असते. सर्वसामान्यांना आवडतं त्याला नाकं मुरडल्याशिवाय स्वतःला विचारवंत आणि उच्चभ्रू म्हणवूनच घेता येत नाही. 'सिनेमे बघून मुलं बिघडतात' हा त्यांचा सगळ्यात नवीन शोध. मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्यामुळे मुलं बिघडली की समाज बिघडतो, आणि त्यातूनच कॉंग्रेससारख्या पक्षाचं राज्य दशकानुदशकं टिकून राहतं. अर्थात लवकरच हे बदलणार आहे, त्यामुळे मला तर समाज बिघडलेला आहे याची चिंता वाटत नाही. पण तरीही या उच्चभ्रूंचा सिनेमांना नावं ठेवण्याचा उद्योग चालूच असतो.

२०१४ लोकसभा निवडणुक - सर्वेक्षण अंदा़ज, मतमोजणी व निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 14/05/2014 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ लोकसभा निवडणुकांचे निवडणुकपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज झी-न्यूज अंदाज http://zeenews.india.com/news/general-elections-2014/bjp-to-emerge-as-s… http://znn.india.com/Img/2014/4/3/Opinion%20Poll-%20Phase%202%20Report… भाजप - २१५-२२५, रालोआ - २१९-२३२ काँग्रेस - १२१-१३२, संपुआ - १३२-१४९, इतर - १७१-१८१

दमण बद्दल माहिती

लेखक कबीरा यांनी बुधवार, 14/05/2014 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
दमण बद्द्ल कोणाला काही माहिती आहे का? राहण्याचे ठिकाण? खादाडी साठी उत्तम जागा? २-३ दिवस जायचे आहे.

९० डिग्री साऊथ - १२

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 14/05/2014 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
९० डिग्री साऊथ - ११ ३० मार्चला अ‍ॅटकिन्सन आणि कोहेन कॉर्नर कँपवर पोहोचले होते. वाटेत टेडी इव्हान्सची स्लेज त्यांना आढळून आली होती. वा-याचा जोर वाढतच होता. तापमान घसरत चाललं होतं. हिवाळा तोंडावर आला होता. सर्व परिस्थितीचा विचार करुन अ‍ॅटकिन्सनने परत फिरण्याचा निर्णय घेतला. तो म्हणतो, " एखाद्या डेपोवर अथवा कँपवर ते असतील तरच त्या परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्यं होतं, अन्यथा त्यांना शोधणं अशक्यंच होतं. आम्ही सात दिवसाची सामग्री कॉर्नर कँपवर ठेवली होती.

आम्हाला सदर कार्यक्रमाच्या जाहिरातीचा मसुदा लिहिण्यास मदत करावी

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 14/05/2014 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका हो ऐका, आमच्या गावी ओसाडवाडीच्या माळरानावर, हर ५ सालाबाद परमाने जत्रेमध्ये, यापावतो दस्तूर खुद्द जादुगार न. म. सरकार यांचे जादूचे शो १६ मे पासून, लागणार हाये हो, जादुगार हे मुळचे रा. मु. पो. ढेबेवाडीचे असून, त्यांचा टुरिंग शिनेमाचा ह. मु. ओसाडवाडीच्या नदीकाठ येथे आहे.

गांधीजींबद्दलची भुमिका डावे-समाजवादी स्पष्ट करतील का?

लेखक विकास यांनी बुधवार, 14/05/2014 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज निवडणुकींच्या निकालाच्या (अगदी अगदी) पूर्वसंध्येस एका बातमीत खालील वाक्ये वाचनात आली: "....गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो...त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला... 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत.