Skip to main content

सामान्य माणसासाठी साधा फोन

लेखक कंजूस यांनी बुधवार, 28/05/2014 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील . आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला . सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँग

सामान्य माणसासाठी साधा फोन

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 27/05/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील . आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला . सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँग

स्पंदन

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 27/05/2014 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
कधी चांदणं श्वासात कधी मन चांदण्यात धुंद प्रेमाचं उधाणं तुझ्या माझ्या अंतरात ll १ ll तुझा भास जीवनात तुझी आस हृदयात तुला पाहिले डोळ्यात जसा मोती शिंपल्यात ll २ ll वारा भरून वाहत पान फूल बहरत तुझा हाती येता हात तन मन मोहरत ll ३ ll तुझे असणे माझ्यात जीव तुझ्यात गुंतत तुझे सांगतो अस्तित्व श्वास श्वास स्पंदनात ll ४ ll - सार्थबोध www.saarthbodh.com

गंगाघाट ते रा. भवन (मार्गे राजघाट)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 27/05/2014 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
महात्मा गांधीजींची १९४८ मध्ये हत्या करण्यात आली, तेंव्हा राजघाट हे स्मृतीस्थळ उभारले गेले, अनेक वर्षे सरली तरीही आजतागायत (दि. २७ मे २०१४), जेव्हा कधीही नव प्रधान /मुख्य मंत्री कार्यभार स्वीकारण्या आधी , वा विदेशी पाहुणे भेटीवर आले असता, राजघाटावर येवून आदराने नतमस्तक होतातच, अश्या ह्या सध्या-सुध्या माणसामध्ये, असं काय महान होत ? त्यांच्या हत्येच्या इतक्या वर्षानंतरही एवढा प्रभाव कसा काय दिसून येतो बुआ ? म्या पगाल्याच्यामते, कदाचित 'जीवनामध्ये सत्याला प्रमाण मानने', या त्यांच्या विचारसरणीत आहे का ?

भारतीय कैद्यांची सुटका

लेखक आनन्दा यांनी सोमवार, 26/05/2014 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
नरेंद्र मोदींनी शपथविधीला पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना आमंत्रण दिले, त्यांनी ते स्वीकारले, आणि येण्यापूर्वी १५१ भारतीय कैदी सोडले. आतापर्यंतचा इतिहास बघता हे पाकिस्तान च्या अश्या वागण्याने मला धक्का बसलाय, पण हा नरेंद्र मोदींचा "करिश्मा" आहे यावर देखील माझा विश्वास नाही. हा नरेंद्र मोदींचा एक राजनैतिक विजय आहे याबद्दल दुमत नाही.

गरजांच पोलिटिक्स

लेखक फुंटी यांनी सोमवार, 26/05/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुणी लेखक नाही,मला लेखक व्हायचं पण नाही...मनातली घुसमट बाहेर पडावी म्हणून लिहितोय....डुप्लिकेट आयडी वरून ...घुसमट....मला सहन नाही होत ....इमोशनल चुतीया बनणं काय असत ते मला विचारा ...प्रेम असो कि कुणाला केलेली मदत .....त्या एका क्षणी वाटत असत कि आपण नसतो तर हे शक्य झाल नसत...हे आपल्यामुळे झालंय ,काडीचाही फायदा नसताना उगाचच छाती फुगून येते अभिमानाने.....कसला वांझोटा अभिमान तो.... तरीही घालवलीत ७-८ वर्ष या दुनियादारी मध्ये...कुणाला काही फरक पडत नसतो आपल्या असण्या नसण्याने ...आपण नसलो कि दुसरा कुणी असतो...हे ज्या क्षणी लक्षात येत तो क्षण असतो कोसळण्याचा ,कोलमडून पडण्याचा ...अनुभवतोय मी तेच क्ष

कट्टा: दादर पूर्व ऋषी हॅाटेल

लेखक सूड यांनी रविवार, 25/05/2014 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
व्हाट्सअ‍ॅपवर मिपाकरांचे असे चार ग्रूप आहेत. कोणते ते विचारु नका, अभ्यास वाढवा असं उत्तर मिळेल. त्यातल्या एका ग्रूपवर मेसेज आला शन्वारी सांच्याला कोण कोण भेटू शकतं. मेसेज अर्थातच विमेंचा होता. शन्वार संध्याकाळ असल्यामुळे तसाही उंडारायला वाव असतो, मग मी तर मेसेज आल्याआल्या हो म्हणून सांगितलं. त्यातही दादरसारख्या ठिकाणी कट्टा होणार होता. आता हल्लीच्या फ्याशनीनुसार मध्यवर्ती समजली जाणारी ठिकाणे न निवडता आल्याची खंत होतीच म्हणा, पण असो. कट्टा ठरला, पण बा़कीचे डिटेल्स विमे बैजवार देणार असल्याचं म्हणून तिथेच विषय संपला.

स्वादिष्ट मिरची (तोंडी लावायला)

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 25/05/2014 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ लागलेली ही मिरची छोले भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ विदर्भातली). पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो. काल अखेर तिने ही मिरची बनविली. साहित्य: हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार, मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ. कृती: प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या.

महाराष्ट्र पॉलीटीकल लीग अर्थात एमपीएल २०१४

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 25/05/2014 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या देशात सालबादाप्रमाणे आयपीएलचा हंगाम सुरु आहे. नुकत्याच संपलेल्या दुसर्‍या आयपीएल (इंडीयन पॉलीटीकल लीग हो!) मध्ये नरेंद्र मोदींनी निर्वीवाद जेतेपद मिळवून पंतप्रधानपदाची ट्रॉफी पटकावली आहे. ही मॅच खेळताना बॉयकॉटला रनआऊट करणार्‍या बोथमप्रमाणेच मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींपासून आपल्याच टीममधील अनेकांना रनआऊट केलंच, पण राहुल गांधींपासून ते लालूप्रसाद, मुलायमसिंग, नितीशकुमार यांच्याही मलिंगाप्रमाणेच यॉर्करवर दांड्या गुल केल्या. मायावतींचा तर त्यांनी यावर्षी पार अजित आगरकर करुन टाकला!