Skip to main content

भूक

लेखक निशदे यांनी सोमवार, 23/06/2014 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
गारपिटीचा मारा असह्यच होता. उभं पीक जेमतेम १० मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आडवं झालं होतं. गुडघ्यात डोके घालून धर्मा शेताकडे तासन्तास बघत राही. कर्जाच्या डोंगराखालि दबून गेलेला धर्मा आताशी कुठे वर यायची स्वप्ने बघू लागला होता. आणि या आक्रिताने त्या स्वप्नांची धूळधाण उडवली होती. गारपीटग्रस्तांना मदत घोषित झाल्यावर धर्माला आशेचा किरण दिसला. आमदारसाहेबांनी स्वतः गावात येऊन २ शेतकर्‍यांना मदतीचे चेक स्वहस्ते दिले. मामलेदार कचेरीत जाऊन आता फक्त चेक घेऊन आले की आपल्याला कसलीच काळजी राहणार नाही अशी त्याची खात्रीच पटली. पहिल्या खेपेला बँकेने दादच लागू दिली नाही.

पुणे कट्टा वृतांत्त

लेखक देशपांडे विनायक यांनी सोमवार, 23/06/2014 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे कट्टा वृतांत्त माझा पहिला कट्टा पुण्यातला मिसळपाव वाल्यांनी बोलावलेला तेंव्हा काहीतरी घडणार याची खात्री होती आणि ते घडलेच मला सरळ केले गेले असा होतो ---- देशपाडॅ विनायक असे केले ----- देशपांडे विनायक धन्यवाद प्रशांत

मँगो - स्ट्रॉबेरी पॅना कोता

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 23/06/2014 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळि, पॅना कोता (Panna cotta) हे एक ईटालीयन डेझर्ट आहे ज्याचा अर्थ आहे "cooked cream". फार कमी पदार्थ वापरुन एक झटपट आणि तितकचं क्लासी होणारं हे डेझर्ट आहे. आंबा / स्ट्रॉबेरीचा सीझन अजुन असल्यामुळे हे पॅना कोता ह्या कॉम्बीनेशन मधे केलं आणि चव/रंगसंगतीच्या बाबतीत एकदम सरस ठरलं.

गप्पा … त्याच्याशी

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 23/06/2014 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा निवांत भेटला तो. त्याला म्हणाले ये, बैस जरा. घटकाभर बोलु आपण. किती दिवस झाले बोलले नाही आहे तुझ्याशी मनमोकळेपणाने. तू येतोस आणि जातोस. मी आपली प्रपंच गाढ्यात. तो म्हणाला अग मग बोलू कि त्यात काय. मी आहे आता ४ महिने तरी. जा घेऊन ये एक वाफाळता कप चहाचा म्हणजे गप्पाची लज्जत वाढेल अजुन. मी : राहु दे, असे म्हणुन दडशील पुन्हा. मग येशील जेव्हा तेव्हा निवांत असेन कि नाही कोण जाणे. तो : नाही ग, आज असेन मी, तुझ्यासाठी. मी : खरंच, राहशील माझ्यासाठी, माझे मन हि खूप जड झाले आहे, आज मी हि तुझ्यासोबत बरसेन म्हणते. तो : आवडेल मला. मी बरसतो सर्वजण पाहतात.

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग एक

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 23/06/2014 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
[ खालील उत्तरे सर्वसाधारणपणे आढळणार्‍या दंतविकारांबद्दल आहेत. दंतविकार टाळण्यासाठी घेण्याच्या घरगुती काळजी ( Preventive Home Care) बद्दल पालकांमधले समज गैरसमज लक्षात घेऊन ही उत्तरे लिहिली आहेत. काही विशिष्ट असाधारण परिस्थितीत ( उदा. विशेष बालके, गंभीर आजारावर उपचार घेणारे रुग्ण इ.) तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे उपाययोजना करावी. ] प्रश्न १ : दंतक्षय ( दातांची कीड) म्हणजे काय? Dental Caries (दातांची कीड) हा एक तोंडामधल्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. ( अर्थातच दातांमध्ये कोणताही किडा किंवा अळी नसते. काही गावांत कानात औषध घालून तोंडातून दातांचा किडा बाहेर काढून दाखवणारे रस्त्याकडचे कलाकार असतात.

गर्भसंस्कार

लेखक बाबा पाटील यांनी सोमवार, 23/06/2014 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भसंस्कार “ संस्कारो हि गुणान्तराधानम् ॥ ” जन्मजात प्रकृतिनुसार आलेल्या गुणांमध्ये चिकित्सेद्वारे केलेल्या संस्कारामुळे अधिक चांगले गुण निर्माण करता येतात. संस्कार प्रकृतिस्थित गुणांमध्ये बदल घडवून आणतात. संस्कार म्हणजे तो बदल जो गुणांमध्ये अधिक उत्तम गुणांचे वर्धन किंवा परिवर्तन करतो. दैनंदिन आयुष्य अगदी व्यस्त असते.

जडण-घडण...3

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 23/06/2014 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
गावच्या भटकंतीतला प्रत्येक वर्षीचा पहिला उद्योग म्हणजे वाडीतल्या सगळ्या आंब्याच्या झाडांची पाहणी करायची, मिळतील तितक्या कैऱ्या मिळतील तिथेच खायला सुरूवात करायची आणि परतताना जमतील तितक्या कैऱ्या घरी आणायच्या. पहिले तीन-चार दिवस पडवीत आम्ही जमवलेल्या कैऱ्या टोपलीत पडून राहायच्या. दात पुरेसे (म्हणजे वैताग येण्याइतके) आंबट झाले, करकरू लागले की कैऱ्या घरी आणायचा हा क्रम थांबायचा. आश्चर्य म्हणजे झाडाखाली पडलेल्या, क्वचित फुटलेल्या आणि न धुता खाल्लेल्या त्या कैऱ्यांमुळे कधीच खोकला झाला नाही किंवा आम्ही आजारीही पडलो नाही. आमच्या गावात कलमी आंब्यांची हौस कमी, रायवळ आंबे मात्र भरपूर..

शायरी ...

लेखक चिनार यांनी सोमवार, 23/06/2014 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
१. तेरे जाने का असर कुछ ऐसा हुआ मुझपे , के तुझे धून्डते धून्डते मैने खुदको खो दिया ! और जब खुदको धून्डने निकला, , तो हर जगह सिर्फ तेरा चेहरा नजर आया ! ! २. तेरी आखो में खोकर कई ख्वाब देख लीये मैने , तेरी सांसो में मिलकर एक जिंदगी जी ली मैने , अब ना तेरी आखे है , ना तेरी सांसे है, , ना कोई ख्वाब है ,, बस्स एक जिंदगी है…. जो पिछा नही छोडती ! ! ३.तेरा ना मिलना तनहाई से क्या कम था , के अब जीने से मै घबराऊ ? तनहा जिंदगी नरक से क्या कम थी , के अब मरने से मै घबराऊ ??

VoIP - म्हणजे काय रे भाऊ?

लेखक सोत्रि यांनी रविवार, 22/06/2014 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
डॉट कॉम बूमच्या काळात, साधारण 1999-2000 च्या सुमाराला, डायलपॅड.कॉम ह्या संकेतस्थळाची ओळख झाली होती. अमेरिकेतल्या कोणत्याही नंबरवर चकटफू फोन करण्याची सोय त्या संकेतस्थळाने करून दिली होती. बर्‍याच मित्रांना तेव्हा फुकटात फोन करून बघितले होते. पण त्यावेळी मला त्या फुकट सोयीपेक्षा त्या तंत्रज्ञानाने भुरळ पाडली होती. त्याच सुमाराला सत्यम कंप्युटर्स ह्या कंपनीने खोज.कॉम आणि समाचार.कॉम ही संकेतस्थळं कोट्यावधी रुपयांना खरेदी केली आणि ते ऐकल्यावर माझी झोपच उडाली. डायलपॅड.कॉम सारखे मुंबईला फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे एक संकेतस्थळ चालू करायचे डोक्यात आले.

शतशब्द कथा -विषकन्या

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 22/06/2014 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे मुंबई महामार्गावर लाल टॅाप घातलेली ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत उभी होती. च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी! त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि डोळ्यांना डोळे भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले. च्यायला पोरगी पटली. अररे... समोर वळण आहे तो विसरला होता. बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्याबाजूला फेकल्या गेला. किर्रर्र.... माझ्याच गाडी खाली यायचं होत का? आता बोंबला -ट्रक ड्राईवर. आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे.