Skip to main content

हमशकल्स - एक मैलाचा दगड

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 15/07/2014 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
हो हो, 'हमशकल्स' हा एक मैलाचा दगडच आहे. 'हमशकल्स'ला नाके मुरडणार्‍या तमाम अभिजनांच्या चित्रपटीय जाणीवांची मला अक्षरशः कीव येते. अहो, असं धाडसच कसं काय करू शकतात ही लोकं? 'हमशकल्स' हा चित्रपट म्हणून उच्च दर्जाचा तर आहेच परंतु माणसाच्या अंतरंगाचा इतका तपशीलात धांडोळा घेणारी, माणसाच्या मनाच्या बहुपेडी जडण-घडणीची नुसतीच दखल घेणारी नव्हे तर इतक्या सुबक पद्धतीने ती जडण-घडण दुनियेसमोर निर्भीडपणे मांडणारी ही कलाकृती अजरामर आहे यात शंकाच नाही. कल्पनाविलास ही संकल्पनाच तोकडी पडेल अशी कल्पनाउड्डाणांची आणि कल्पनाभरारीची विस्मयकारक किमया 'हमशकल्स' या चित्रपटात अनुभवायला मिळते हे कसं विसरू शकतो आपण?

पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 14/07/2014 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मितानताईने दिलेले पाकातले चिरोटे बघून तोंडाला पाणी सुटलेय :) . त्यात पाकातल्या पुर्‍या व चिरोटे म्हणजे विकपॉईंट आहे . ताईने दिलेल्या पाककृतीला आम्ही पाकातले चिरोटे म्हणतो आणि रवा-मैद्याच्या किंवा कणकेच्या पुर्‍यांना साखरेच्या पाकात घोळवून तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे पाकातल्या पुर्‍या .

फ्राईड मटण चॉप्स

लेखक भिंगरी यांनी रविवार, 13/07/2014 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
फ्राईड मटण चॉप्स साहित्य---------- मटण चॉप्स---६ आलं लसूण पेस्ट २ लहान चमचे. १० हिरव्या तिखट मिरच्या आणि एक कप निवडलेली कोथिंबीर यांची पेस्ट ३ अंडी फोडून चांगली फेटलेली मीठ रवा किंवा ब्रेड क्रम्स तळण्यासाठी तेल. कृती----- मटण चॉप्स घेताना खाटकाकडून दाबून थोडे चपटे करून घ्यावे. स्वच्छ धुवून त्यांना आलं लसणाची पेस्ट व मीठ लावून कोरड्या भांड्यात ठेवावे. कुकरमध्ये हे भांडे ठेवून तीन शिट्या होऊ द्याव्या. कुकरची वाफ गेल्यावर चॉप्स बाहेर काढून थंड होऊ द्यावे.

शाही अंडा मसाला

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 13/07/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- ४/५ अंडी उकडून, २/३ टोमॅटो किवा १ वाटी तयार टोमॅटो प्युरे, २/३ मध्यम कांदे, १ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट, १ चहाचा चमचा कसूरी मेथी, १तमालपत्राचे पान ७/८ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे, १ मोठा चमचा हेवी क्रिम किवा साय,२ मोठे चमचे तेल,१चमचा बटर, मीठ चवीनुसार, १/२ चहाचा चमचा साखर थोडी कोथिंबिर गार्निशिंग साठी. कॄती- खोबरे किंचित लालसर कोरडेच भाजून घ्या व बाजूला ठेवा. एक चमचाभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता.

पाकपुर्‍या (पाकातले चिरोटे)

लेखक मितान यांनी रविवार, 13/07/2014 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा सुरू झाला की आईचा स्वयंपाक बदलायचा. पक्वान्न पण बदलायची. आंबे संपलेत, श्रीखंड खाण्यासारखे हवामान नाही, श्रावणातला पुरणाचा रतीब सुरू व्हायचा आहे, खिरींचा खुराक सुरू व्हायला हिवाळा अजून यायचाय, बाहेर भुरभुर पावसामुळे चमचमीत नि गोड खायचा आमचा हट्ट पुरवायचा आहे.... असं सगळं असायचं. मग काय सुरू व्हायचे एकेक पदार्थ.. कधी गुळातले गडगिळे, कधी कणिक तुपावर एकदम चॉकलेटी भाजून त्याचा शिरा, गोड पुर्‍या, सुधारस, साखरभात आणि आमच्या अत्यंत आवडत्या पाकपुर्‍या. म्हणजेच चिरोटे ! आता मी तिच्या भूमिकेत गेलेय. लेक माझ्यासारखीच खवैय्यिण ( वा ! ) असल्याने तिचेही हट्ट भरपूर असतात. आजही असाच हट्ट केला तिने.

चलो काश्मीर....

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 13/07/2014 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळि, काश्मीर....भुतलावरील नंदनवन/स्वर्ग. खरं तर हे एक ईयर द राउंड डेस्टिनेशन म्हटलं तर वावगं ठरु नये. वेगवेगळ्या ऋतुतलं काश्मीर पहाणं हा नक्किच एक वेगवेगळा अनुभव असतो. एक वेळ आपली नजर तोकडि/थीटि पडेल ह्याच्या सौदर्यांपुढे.... असं एकलयं कि एप्रिल ते ऑगस्ट हा काश्मीर भेटिसाठि उत्तम ऋतु मानतात. एकदम योग्य हवामान, बहरलेल्या बागा, थोडासा उरलेला बर्फ....फॅमीली टुर च्या दृष्टीने एकदम अ‍ॅप्ट असा हा सीजन. पण माझ्या मते खरा जातीवंत भटका तोच जो ह्याच रुळलेल्या वाटा जरा वेगळ्या नजरेने बघतो.

"टी "

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 13/07/2014 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
असाच ऑफिस मध्ये पाट्या टाकण्याचा अजून एक दिवस . पावसाळी दुपार . एके काळी आपण स्वतहाशिच काय काय गगनचुंबी promises केली होती आणि आपण आता हे काय करत आहोत हि मनातून मधूनच टोचण्या देणारी जाणीव अजूनच टोकदार झालेली. असेच स्वतहाला कुरतडत बसण्याचा खेळ चालू असताना एकदम फोन वाजतो. फोन त्याचाच असतो. " जिवंत आहेस का? बऱ्याच दिवसात तुझा उदास आवाज कानावर पडला नाही . म्हंटल आपणच फोन करावा ।" "अरे काही नाही रे. असाच busy होतो ऑफिस च्या कामात. " " तुझा आवाज बराच cheerful येतोय .

CID ची गोष्ट !

लेखक पामर यांनी रविवार, 13/07/2014 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले किती तरी दिवस(सॉरी, वर्ष आणि दररोज दुपारी) मुंबई पोलिसांकडे प्रचंड म्हणजे प्रचंड काम असल्याने अनेक महत्वाच्या cases सोनी चॅनलनी ह्या CID कडे सोपवल्या आहेत हे सर्वांना माहीत आहेच.(हेच हो आपले खुन, अपहरण वगैरे..)आपले सर्वांचे लाडके A.C.P. प्रद्युम्न (काय त्यांचे डोळे,काय त्यांचे टक्कल,काय त्यांचा ३ piece suit ...वा जवाब नाही!