बो, बॉब आणि आयफोन
दिवस: फेब्रुवारी २०१० २रा आठवडा (नक्की दिवस आठवत नाहीये पण सुट्टी होती त्यानंतर )
स्थळ: Superior ,CO
वेळ: असेल रात्री ७, ८ वाजेची
मी आणि माझा सहकारी योगेंद्र बस मधून उतरून lawn तुडवत शोर्टकट मारत माझ्या अपार्टमेंट वर चाललो होतो अचानक मला माझ्या पायाखाली काहीतरी तुडवल्यसारखे वाटले बर्फ होता पण त्याखाली काहीतरी होतं थोडा अंधार होता तिथे जे काही होता ते उचलला आणि पुढं जाऊन बघतो तर काय मी पायाखाली चक्क आयफोन तुडवत होतो. बापा जन्मात कधी आयफोन बघितला नवता आणि तो पायाखाली. मला वाटला गेला आता तो, पण बनावट चांगली आहे म्हणावा नाहीतर काय ७० किलो चा भर सहन केला त्याने आणि तरी चालू होता.
मिसळपाव