Skip to main content

धाग्याचे नामकरण

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 23/07/2014 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज पाहुण्यांसाठी एक स्पेशल धागा काढला. धाग्याला छोटीशीच पण दाट(घट्ट) प्रस्तावना केली. अशा धाग्याला आम्ही 'काकू' असे म्हणतो. पाहुणे म्हणाले आम्ही 'धागा' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली. तेंव्हा आणखी शब्द मिळाले, 'एकोळी' 'जिलबी' 'पाटी' एत्यादी असेच आणखीही शब्द असतील जाणकारांनी माहिती द्यावी. आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ. स्फूर्ती - साभार इथे पहा

मर्जी

लेखक आतिवास यांनी बुधवार, 23/07/2014 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझी झोप उडालीय, मन:शांती लयाला गेलीय; कशातच आनंद नाही; काही सुचत नाहीये. स्वप्न आहे हे? का खरोखर घडतंय? त्यांचा सतत आरडाओरडा चालू आहे, अगदी क्षणभरही खंड नाही. प्रत्येकाला विजयी व्हायचंय, इतरांपेक्षा जास्त जगायचंय, जास्त चमकायचंय. प्रत्येकाला हवं आहे यश, प्रेम, सुरक्षितता, पैसा आणि प्रसिद्धी. प्रत्येकाला हवी आहे महत्त्वाची भूमिका. इतरांना झाकोळून टाकण्याची त्यांची किती लगबग. मार्ग काढला असता मी; पण त्यांची संख्या खूप जास्त आहे. भीती वाटतेय मला.; जो तो धमकी देतोय. असं किती काळ चालेल? कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.

अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी..

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 23/07/2014 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
नभी काजळी दाटता सूर ओला उरा अंतरातून बरसून गेला झरा आत वाहे,तरीही सुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी कुणी हासते वा कुणी गीत गाते कुणी प्रेमरंगात रंगून जाते उभी एकटी दूर सार्‍याहुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी झरावे किती मेघ आतून सारे फुलावे किती अंतरंगी शहारे फिरो गार वारा किती आसमंती तरी कोरडासा उरे जीव अंती नव्याने नटो ही धरा मेघवेडी नवी बावरी लाजुदे सांज थोडी उभी पायथ्याशी नव्याने जुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी सख्या,एकदा जीव ऐसा झुरावा सुटावे जिणे,श्वास माझा सरावा उरो शेवटाला तुझी होवुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी © डॉ.अदिती शरद जोशी

ओरल इन्शुलिन

लेखक उडन खटोला यांनी बुधवार, 23/07/2014 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर ओरल इन्शुलिन उपलब्ध आहे. पण ते विकायला बंदी आहे. सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलिन असते पण ते जठरात गेल्यावर नष्ट होते. फक्त उंटीणीच्या दुधातील इन्शुलिन पोटात नष्ट न होता रक्तात मिसळते. म्हणू हे दुध पिणाऱ्या लोकांना मधुमेह होत नाही. पण या दुधावर विक्री बंदी आहे हे आज कळले. भारतातील काही डॉक्टर्स हे दुध हवाबंद पिशव्यातून विकण्याच्या प्रयत्नात असून त्या साठी दोन कोटी उंटांची गरज आहे असा त्यांचा अंदाज आहे. आज जगभर ओरल इन्शुलिन बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत.

रश्श्याचे नामकरण

लेखक भिंगरी यांनी बुधवार, 23/07/2014 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज पाहुण्यांसाठी वांग्याची भाजी केली भाजीला थोडासाच पण दाट(घट्ट) रस्सा केला. अशा रश्श्याला आम्ही 'लपथपित' असे म्हणतो. पाहुणे म्हणाले आम्ही 'लबलबित' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली. तेंव्हा आणखी शब्द मिळाले, 'अंगापुरता रस्सा' 'थपथपित 'दाटसर' 'जाडसर' असेच आणखीही शब्द असतील जाणकारांनी माहिती द्यावी. आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.

निसर्गकन्या : लावणी

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 22/07/2014 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

’मी...ग़ालिब' ला भेटताना...

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 22/07/2014 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब! आपण अस्सल तुर्की वंशाचे आहोत असा अहंकारमिश्रित समज असलेला, नबाबाच्या घराण्यात जन्मलेला आणि त्यामुळेच जगण्यासाठी कमवावे लागते याची गंधवार्ता नसलेला.

कोणी आहे का इच्छुक

लेखक कबीरा यांनी मंगळवार, 22/07/2014 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
९-१० ऑगस्ट ला कोयना नगर ला दुचाकी वर रपेट मारून यावी अशी इच्छा आहे. कोयना नगर ला पावसाळ्यात सुंदरच वातावरण असेल. कोणी मिपाकर आहे का इच्छुक ? डिट्टेलवारी अजून काहीच नाही. जसे मावळे जमतील तस ठरवूया.

अभिजात भाषा सप्ताह कधी ?

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 22/07/2014 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांमधील मुख्य सचिवांना पत्र पाठवून '7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट', या काळात संस्कृत सप्ताह पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पत्रानंतर ऐका राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानी केंद्राच्या या सूचनेला विरोध करत, त्यामध्ये सुधारणा करण्याची विनंती केंद्राला केली आहे. "आमच्या राज्यात सरकारी स्तरावर अधिकृतपणे संस्कृत सप्ताह पाळणे अत्यंत चुकीचे आहे.