अस्तु "So Be It"!
खांडवी (नागपंचमी विशेष)
आमच्याकडे कोकणात नागपंचमीला चंदन उगाळून त्याने पाटावर नाग काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला उकडीचे मोदक किंवा खांडवी केली जाते. तसे कोकणातल्या पाककृती म्हणजे त्यात तांदुळ, गूळ आणि ओले खोबरे हे मुख्य घटक हवेतच!
साहित्यः दोन वाट्या तांदळाचा रवा, दोन वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, मीठ, तूप वेलची, पाणी.
कृती: पूर्वी जातिणीवर रवा काढला जाई. आता मात्र बाजारात तयार इडली रवा मिळत असल्याने काम बरेच सोपे झालेय. हा रवा थोडा कोरडा भाजून झाल्यावर साधारण पाव वाटी तूप घालून मंद आचेवर तांबूस भाजावा. रव्याच्या दुप्पट पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावे. त्यात गूळ. मीठ, थोडे ओले खोबरे आणि वेलची पावडर घालावी.
छंद तुझा ..
नभामध्ये तारकांचा
थवा धुंद आहे,
झुळूझुळू वाहणारा
'अनिल' मंद आहे !!
पावलात तुझ्या
घुंगरूचा नाद तो,
तालावर बेहोष
मी बेधुंद आहे !!
केसांत अडखळून
वाऱ्यास गंध आहे,
गालावरच्या खळीचा
हृदयास छंद आहे !!
रक्तिम ओठ चावताना
तू दिसतेस अशी,
तुझ्या त्या इशाऱ्यावर
मन गुंग आहे !!
तो कटाक्ष तिरका
अन निर्मळ हास्य,
कसं सांगू सखे
मी बेबंद आहे !!
...खरंच बेबंद आहे !!
काव्यरस
माझे साईपदयात्रेचे अनुभव - १
मी ६ वर्षांपासुन पदयात्रा करीत आहे. मार्च एप्रिल मध्ये जात असते. आमचा पदयात्रेचा मार्ग चारोटी - जव्हार - मो़खाडा - त्र्यंबकेश्वर - नाशिक - सिन्नर - वावी ते शिर्डी असा आहे. दिवसा कमालीचे उन आणि रात्री जंगल असल्याने भरपुर थंडी असते. एप्रिल २०१४ या महिन्यात मी माझी ६ वी वारी पुर्ण केली. रात्री अतिशय थंडी असल्याने मला ह्यावेळी रात्री झोपच लागायची नाही. २ शॉल्स नेउन सुद्धा सारखी कुडकुडायचे. म्हणुन विचार केला कि वुलनच्या उबदार शॉल्स घेतल्या तर बरं पडेल. मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली.
जिल्हा - पालघर
आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे.
माझे कुणा म्हणावे ...
वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना
माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना
जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा
चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना
ज्याने हलाल केले, कित्येक काफिल्यांना
तो भास मृगजळाचा, नजरेस पाहवेना
जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना
ती वाट मरूस्थळाची, मज कुठेच पोचवेना
सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या
जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना
(हरिहरन यांच्या 'गुलफाम' या संग्रहातील 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' या गझलचा स्वैर भावानुवाद)
फेर्यात अडकलेला...
माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो.
मित्राची कंपनी त्याच्या घरापासून अंदाजे तीसएक कि.मी.वर आहे. हायवेने ३०-४० मिनिटात कंपनीत पोहोचतो. नव्या स्प्लेंडरमुळे चक्क २० मि.
बोले तो ...!!!
काही लोकं बोलतात एक पण त्यांना आपल्याकडे काय आहे किंवा आपण किती लई भारी किंवा आपली समाजात किती वट आहे हे दाखवायचे असते.
त्याची काही उदाहरणे...तुमच्याकडे अजून उदाहरणे असतील तर टाका..
1) आख्खा जग पालथा घातला पण रत्नागिरीसारखी कोठेच जवळीक वाटली नाही.
2) कोठला मोबाईल हा? कार्बन का? छान छान..!! माझ्या i-phone पेक्षा display मोठा आहे..
3) आत्ताच मुंबईहून आलो. वोल्वो स्लीपर कोच असून सुद्धा झोप नाही झाली राव...
4) अय्या..!! कालच्या द लिलामधल्या शेपूच्या भाजीत चीझ काय मस्त मिसळले होते नाही...चव अजूनही गेली नाही तोंडातून...
5) ह्या..!!
नेहमी असंच का होतं ?
१) आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ?
२) आपण ट्रेन पकडायला जिथे उभे असतो त्यापेक्षा समोरच्याच फलाटावर गाड्या जास्त येतात?
३) आपण एखाद्या गोष्टीसाठी जीव काढून ठेवतो तरी ती होत नाही पण तीच कोणी दुसऱ्याने केली की सहज होते?
४) आपण एखाद्या कल्पनेला जितके घाबरतो आणि लांब ठेवायचा प्रयत्न करतो तेवढीच ती कल्पना आपल्या बोकांडी बसते ?
५) जगातल्या प्रत्येक माणसाला जरी लॉटरी लागली तरी त्यातही आपला नंबर शेवटचा का असतो ?
६) एखादी संकल्पना आपल्यापुढे कोणीतरी मांड्ल्यावर आणि ती आपल्याला बेहद्द आवडल्यावर ही आपल्याला सुद्धा सुचली असती असं का वाटतं
मिसळपाव