Skip to main content

. . हत्या आणि राजकारण !

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 23/08/2014 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे पहा. हत्येचेही कसे राजकारण केले जाते. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. त्यानंतर ६ महिने झाले तरी त्यांच्या हत्येचा तपास लागू शकला नाही. त्यावेळी काही लोकांनी फेसबुकवर तपास न लागण्याचा निषेध केला. फेबुवर आपला प्रोफाईल काळा ठेवला. आता हे लोक कोण होते ? यातले अनेक जण असे होते ज्यांनी दाभोळकर, त्यांची अनिस, त्यांची विचारधारा याला कायम विरोध केला. मग अचानक या लोकांचे दाभोळकर प्रेम कसे उफाळून आले ? ज्या काळात हत्या झाली आणि तपास सुरु होता त्या काळात राज्यात आणि देशात काँग्रेस आणि रा काँ यांचे सरकार होते.

वंचना - १

लेखक पहाटवारा यांनी शनिवार, 23/08/2014 05:10 या दिवशी प्रकाशित केले.
आदित्यवर्मन आपल्या घोड्यावरुन पायऊतार झाला. कित्येक योजने तुडवलेल्या आपल्या टाचां झाडत वातायन, आदित्यवर्मनाचा अश्व, ऊभा ठाकत विश्रांती घेउ लागला. संध्यासमयी पसरलेल्या लालिमेने पश्चीमेकडचे आसमंत जणू काहि पेटून ऊठले होते.. आदित्यवर्मनची अवस्थाही काहि वेगळी नव्हती. त्या लालिमेला अडवत, आसमंताला जणू आव्हान करत बेदरकारपणे एक पाषाण ऊभा ठाकला होता.आदित्यवर्मनने त्या पाषाणाकडे एक नजर टाकली अन कसल्याशा आवेगाने धाव घेत तो त्यावर जाउन ऊभा राहिला.. तिथुन खाली पसरलेल्या अथांग, हिरव्यागार अरण्याकडे नजर टाकत त्याची नजर कसलातरी शोध घेत, भिरभिरत राहिली.

नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 22/08/2014 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
नरेंद्र मोदी भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेऊ इच्छितात, विकासासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य गरजेचे आहे हे सर्वच खरे आहे. भारतातील अधीकतम जनतेला डिजीटल क्रांतीत सहभागी करून घेणे हि स्वागर्ह बाब आहे. नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन नावाची काही सरकारी+खासगी क्षेत्रातून योजना आहे. त्या बद्दल अंशतः http://digitalliteracy.co.in/index.html या धाग्यावर (जराशी व्हेग) माहिती दिसते (संकल्पनेची सुरवात काँग्रेसी काळातच झाली असण्याची शक्यता), पण एकुणच यात नवे काय ? यात नेमके काय ?

जडण-घडण 10

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 22/08/2014 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफीसमध्ये जाणं शक्यच नव्हतं. फोन करून कळवलं. शिकवण्या बंद होत्या आठवडाभर, त्यामुळे मुलं नव्हती. खूप चिडचिड व्हायची माझी. असं आजारी होऊन पडून राहणं अजिबात आवडत नव्हतं आणि ऑफीसमधलं काम आवडू लागलं होतं. त्यात हा खंड. आतापर्यंत वर्षभरातून फारतर एकदा, ते सुद्धा तापाचं आजारपण. त्यात सुद्धा दोन दिवसांच्या वर नाहीच. त्यामुळे कांजण्यांचा त्रास जरा जास्तच जाणवत होता. मग जवळ राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला मॅडम आजारी असल्याचं समजलं. इयत्ता चौथीतला विद्यार्थी. मला बघायला घरी आला. मी झोपले होते. तो आल्यावर डोळे उघडून त्याच्याशी बोलले, अभ्यासाबद्दल विचारलं. उठता मात्र नाही आलं मला, अगदीच गलीतगात्र झाले होते.

जॉर्डनची भटकंती : ०४ : मदाबा गाव आणि केराक किल्ला

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 22/08/2014 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

'ती' कोमातून बाहेर आली

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 22/08/2014 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार, स्वप्नाली लाड ही मुलगी, जी गेले वीस दिवस कोमात होती, ती शुद्धीवर आलेली आहे. हे वाचून एक अनामिक दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी या मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तोच जीव धोक्यात घालत रिक्षातून उडी मारली होती. रिक्षावाल्याने सांगितलेल्या रस्त्यावरून रिक्षा न नेता भलत्या रस्त्यावर वळवली आणि मग स्वप्नाली ने चालत्या रिक्षातून उडी घेतली. अर्थातच रिक्षावाला फरार झाला. मग तिला तिथल्या नगरसेविकेने इस्पितळात नेले, ती कोमात गेली, आता ती शुद्धीवर आली हा सगळा पुढचा प्रवास. दरम्यान, माझा, तुझा चायनल वाल्यांनी अनेक चर्चा घातल्या या विषयाला धरून. कामच आहे ते त्यांचं म्हणा.

किस्से एका डॉक्टरचे

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 22/08/2014 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
मायमराठीतले (आणि सावत्रमाय विंग्रजीतले) काही शब्द आपल्यामागे एक एक इमेज घेऊन वावरत असतात. मंत्री (मराठीत मिनिष्टर ) म्हटल्यावर डोक्यावरची गांधी टोपी सावरत कडक इस्त्रीच्या खादी जाकिटाची बटणे कुरवाळत फर्डे भाषण करणारा बगळासदृश्य मनुष्य डोळ्यासमोर येतो. वकील हा सहसा घाऱ्या कावेबाज डोळ्यांचा धूर्त इसम असतो. आणि डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते. खारकर डॉक्टर हे याला शंभर टक्के अपवाद होते. होते म्हणायला कारण आता ते नाहीत.

कापूसकोंड्याची खरी गोष्ट

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 22/08/2014 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी विदर्भ देशात आटपाट नगर होते, नगरच्या वेशीवर धनाजी नावाचा शेतकरी आपल्या बायको आणि एकुलत्या एक छकुल्या सोबत सुखाने नांदत होता. आपल्या शेतात तो कधी ज्वारी, तर कधी तूर, भुईमूग इत्यादी पिक घेत होता. वरुण राजाच्या लहरीपणाचा फटका विदर्भाला नेहमीच बसतो. धनाजी सारख्या शेतकरीच्या भाग्यात लक्ष्मी नव्हती पण दुर्भिक्ष पडले तरी उपासमार व्हायची नाही. पोटाचा खड्डा अर्धा तरी भरल्या जात असे. एक दिवस धनाजी शेत नागरत होता. अचानक शुभ्रवेशधारी लांब-लचक रेषे असलेला कापूसकोंडा त्याचा शेतात उतरला. कोण ग पावण, कुठून आलात, धनाजीने विचारले. मी दूरदेशी पाताळातून आलो.