(चतुर) भ्रमणध्वनीच्या गमतीजमती…
टृ कॉलर पध्दल सर्वांना माहित असेलचं. आपल्यापैकी बहुतेकांच्या (चतुर) भ्रमणध्वनीवर ते विराजमान असेलही. त्याचीच गंमत सांगतो आहे, प्रत्यक्ष घडलेली.
माझा एक मित्र, राजेश राजे, वय अंदाजे पन्नाशीच्या आसपास, साडेसहा फुट ऊंच. मी त्यांना फक्त राजे काका या नावाने ओळखतो. शनिवारी रात्री सव्वा दहा - साडे दहा च्या आसपास या काकांना (सहजच) माझी आठवण झाली. लगेच या महाशयांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला.
त्यांच्या दुर्दैवाने माझ्या भ्रमणध्वनीवर (टृ कॉलर असल्याने) चिंटुमामा असे नाव दिसले. शनिवारी रात्री हा कोण चिंटुमामा माझी आठवण काढतोय म्हणुन (मनातल्या मनात) शिव्या देत तिकडे दुर्लक्ष केले.
मिसळपाव