Skip to main content

फेसबुक मानिया

लेखक फुंटी यांनी बुधवार, 10/09/2014 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रोफाईल लॉगीनने समोर दिसतात असंख्य मने चांगुलपणाचे पुतळे ,आदर्श आभासी व्यक्तिमत्त्वे , सद्वर्तनी ,भावूक ,अंतरंगाला हमखास हात घालणारीच स्टेटस त्यावर सहमतीचे लोणी , आदर्श विचारांनी ओथंबून वाहणाऱ्या आदर्श पोस्ट त्यावर तसल्याच गुळमुळीत कमेंटची पखरण आदर्श फेसबुक जीवन ,रेडी टू सर्व्ह .... प्रेमाचे समुद्र ,उमाळ्याचे नद ... हळुवार ,सेन्सेटिव ,अलगद चालणारी इनबॉक्स मधली खलबत दुसरीकडे बुरखेधाऱ्यांचे राडे, अतृप्त इच्छांच्या तारेवर उलटी लटकलेली मने चाळीशीनंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ... संभ्रमात आहे फेसबुक .... झुगारावी सो कॉल्ड संस्कृती .... की मिरवाव भाऊराया ,ताई म्हणून.... लोगिन ने वाढ

मामाचे गाव - तात्या

लेखक दशानन यांनी बुधवार, 10/09/2014 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
लाल ठसठशीत कुंकू, हातात बांगड्या, आणि समोर निखारा फुललेली चूल. मावशीने चूलीवरून गरम गरम भाकरी काढली आणि माझ्या ताटात ठेवत म्हणाली "राज्या, उटा माडू, मते वन क्लसा माड अप्पि!" मी गरम भाकरीचा तुकडा मोडला व तोच समोरून काम आले हे पाहून तिच्याकडे पाहू लागलो तर मला तात्यांचे जेवण शेतात द्यायचे काम करावे लागणार होते. मावशीने शिदोरी बांधली व माझ्या हातात दिली. माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी ही मावशी व तिचा मी शब्द टाळेन हे शक्यच नव्हते. तीन तीन मुलींची ती आई, पण लहानग्या बहिणीच्या या पोरावर तिचा फार जीव. जसा ती माझा शब्द खाली पडू देत नसे तसाच मी तिचा शब्द खाली पडू देत नसे.

सायकलींग... (भाग १)

लेखक मोदक यांनी मंगळवार, 09/09/2014 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरायण साठी झालेली पुणे ते बडोदा ट्रीप मनाप्रमाणे पार पडल्यामुळे २०१४ सालाची सुरूवात झकास झाली होती. ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१३ पासूनच माझी गुजरात ट्रीपची तयारी सुरू होती तेथून परत येतानाच "आता पुढे काय..?" असा प्रश्नही डोकावत होता. त्या ट्रीपचा हँगओव्हर उतरण्यात दोनेक आठवडे गेले दरम्यान भीमाशंकर / गिरवली वगैरे भटकंती झाली.

The morning after..

लेखक निखळानंद यांनी मंगळवार, 09/09/2014 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
आदल्या रात्री उत्सव साजरा करताना अनवधानाने, जोशात किंवा धुंदीत काही खबरदारी घ्यायची राहून गेली तर त्यातून काही अनपेक्षित, अनावश्यक असे घडू नये म्हणून बाजारात 'The morning after pill' मिळते. सुजाण आणि समंजस लोक ती घेतात.. पण दहा दिवस दणक्यात उत्सव साजरा केल्यावर आणि दहाव्या रात्री त्याचा कर्णकर्कश परिपाक मोठ्या धामधुमीत केल्यानंतर अकराव्या सकाळी त्याच्या परिणामांची तमा न बाळगता आपण आपल्या कामाला लागतो. किंबहुना आपल्या जल्लोशी उत्सवाचे काही दुष्परिणाम असू शकतील हे आपल्या गावीही नसते.. But all is not lost....

नास्तिक आणि विकृती

लेखक arunjoshi123 यांनी मंगळवार, 09/09/2014 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
संकल्पना: नास्तिक म्हणजे कोण? तर मूलतः ईश्वर न मानणारे. म्हणजे हे जग निर्मिणारी, चालवणारी कोणी शक्ती नाही नि तिला अभिप्रेत असे कोणते संकेत जगात नाहीत असे मानणारे लोक. हे लोक बाकी काही मानोत न मानोत, इतके तत्त्वज्ञान तरी जरूर मानतात. आता अस्तिक म्हणजे कोण? तर देव म्हणून कोण्या शक्तीने जग निर्माण केले, ती ते चालवत आहे, ते कसे चालावे याचे तिला अभिप्रेत असे संकेत आहेत असे मानणारे लोक. हा देव नक्की काय आहे, कसा आहे आणि हे संकेत कोणते आहेत याबद्दल अस्तिकांत प्रचंड घोळ आहेत, भांडणे देखिल आहेत.

आदि कैलास, ॐ पर्वत दर्शन, पार्वती सरोवर परिक्रमा. भाग - १३

लेखक खुशि यांनी मंगळवार, 09/09/2014 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
सोळावा दिवस. आज २० किमीवरील बुधीला मुक्काम होणार होता. सकाळी पावणेसहाला चालायला सुरूवात केली. बॉडी चार वाजताच पुढे गेली होती. आठ लोकांनी एवढी जड खाट खांद्यावरून वाहून नेली होती. किती त्रास होत असेल त्यांना? नुसत्या विचारानेही कसेतरी होत होते. अनिता आणि मेहुणे घोड्यावरून आमच्याच बरोबर निघाले. मौसम खराबच होता, पावसाची रिपरिप सुरू होती. रेनकोट घालून हा कठीण चढ-उताराचा रस्ता, तुटक्या फुटक्या खडांज्या. त्यातच रस्ता निसरडा झालेला, रेनकोटमुळे भयंकर गरम होत होते. डाव्या हाताला कालीमैय्याने आज आणखीच रुद्रावतार धारण केलेला होता. नुसत्या आवाजाने धडकी भरत होती.

(चला ऑफीस आले आता...)

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 09/09/2014 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे मी बनेन ट्रोल सारे नुस्ते करा स्क्रोल मी वाट्टेल तसे पिंकायचे तुम्ही पकडापकडी खेळायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी संपादक बनेन सुचना देत सुटेन मी काहिंना ब्यान करायचे मग बंड तुम्ही पुकारायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी एकोळी टाकेन नंतर मजा बघेन तुम्ही भरपूर बॅशिंग करायचे तरी मी पयलाच म्हणायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| नुस्तेच फटू टाकेन तया प्रवासवर्णन म्हणेन तुम्ही तया भरपूर लाईकवायचे अजून येऊ द्या म्हणायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी मोदीद्वेष्टा व्हायचे तुम्ही समर्थक बनायच
काव्यरस

गणपती गेले (एकदाचे) गावाला !

लेखक सवंगडी यांनी मंगळवार, 09/09/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती गेले (एकदाचे) गावाला ! गणेशोत्सव संपला न भो एकदाचा. व्हय असंच म्हणायची यळ व्हो पुणेकरांना याचा लै च राग येईन. पन तेचं काय मी मनाव घेत न्हाय. पन आज कसं सकाळ सकाळ शांत वाटतय. गेले धा दिस लई जाम झालं व्हत. या धा दिसात आमच्छ्या मंडळानी लई कामं केले. लोकांकडून लई पावत्या फाडल्या. पुण्याचे लोक लई डेंजर बरका… पैशे देताच न्हाईत. (महाराष्ट्र ब्यांक कॉलनी मध्ये पैसा माघायची टाप न्हाय आमची) पन केले जमा २ एक लाख. हा पन खर्च पन केला बरका. काल संध्याकाळ पासून राती २ वाजेपथूर एक ढोल ताशा पथक अन्ह्ल. तेन्ल्हाच अर्धा लाख गेले. नेक्ष्ट इअर साठी पैशे नको का ?

बिनडोक बनियान आणि मार्मीक मदिरा !

लेखक मारवा यांनी मंगळवार, 09/09/2014 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
बिइंग इडीयट मला इडीयट बॉक्स फ़ार आवडतो. मी बटाटा कोच ही आहे त्यामुळे तंगड्या वर करुन सतत बॉक्स बघत बसतो. सारख खात ही असतो (डीप्रेस्ड माणसं सारखी विनाकारण काही ना काही तोंडात टाकतच असतात त्याला स्ट्रेस इटींग अस कायतरी म्हणतात ) माझ वजन वाढतयं केस पांढरे होताहेत मात्र पगार काही केल्या वाढत नाहीये. सर्वच हातातुन निसटल्यासारख वाटतय. पुर्वीसारख पोरीं ना इम्प्रेस करणं जमतच नाहीये. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इम्प्रेस करण्याची तृष्णा च कमी कमी होत चाललीय हो हल्ली. हे म्हणजे खुप च झालय. हल्ली माझी आवडती मालिका होणार सुन मी ह्या घरची देखील मला अपील होत नाहीये.