Skip to main content

थालीपीठ-एक मराठमोळा पदार्थ

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 27/02/2023 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिस्क वाॅक करताना कानात कुंडले घालून मराठी गाणी ऐकणे बरेच दिवसापासूनचा नियम.दररोज प्रमाणे सकाळचे फिरणे संपले व सोसायटीतील मुलांच्या बागेत बाकावर सकाळचं कोवळं उन खाण्यासाठी येऊन बसलो. हिरवटसर पिवळ्या गवतावर सध्या सुरू असलेली पानगळ एक वेगळेच चित्र रेखाटत होती.शांत वातावरण, कोवळे उन आणी मंद वारा यांच्या संगनमताने उबदार थंडी सुखावत होती. सध्या परीक्षेचा हंगाम असल्याने बागेत मुलांचा गलका नव्हता पण पाखरांचा चिवचिवाट मात्र आनंदात भर टाकत होता.झोपाळा,घसरगुंडी सर्व काही शिक्षा दिल्यासारखे गपचूप उभे होते.

शशक- निवडणूक २

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 27/02/2023 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग शशक- निवडणूक आबा तंबाखू मळत ओसरीवर बसले आहेत. तेव्हढ्यात बाईकवरून एक कार्यकर्ता येतो. कार्यकर्ता- आबा!! इथे काय बसून राहिला आहेत? चला मतदानाला.नंतर ऊन तापेल. आबा - अरे बाळा, आम्ही म्हातारी माणसे. दोन वेळा खायला मिळाले की झाले.आम्हाला काय करायच्यात या भानगडी? कार्यकर्ता- तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला.चला मी घेऊन जातो. आबा - काय भाव आहे यावेळी? कार्यकर्ता- ५०० रुपये. आबा खुशीत मिशीवर ताव देत बाईकवर बसतात. त्यांना मतदानकेंद्रावर सोडून कार्यकर्ता दुसरे गिऱ्हाईक पकडायला जातो.

'काव्यप्रेमी' कायप्पा घोळका विडंबन.

लेखक निओ यांनी रविवार, 26/02/2023 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
कायप्पा वर कोणीतरी कवितेविषयी एका घोळक्यात मला ओढून घेतलं. असुदे काय घडतं ते पाहू म्हटलं. तर तिथे अनुभवलेल्या सदस्यांच्या काही गंमती जमती, तिथल्या सर्व मान्यवरांची माफी मागून सादर करत आहे. हि सगळी मंडळी हाडाचे कवी आहेत कारण एकमेकांच्या चारोळीला, कवितेला अजिबात दाद ना देण्याचे व्यवच्छेदक लक्षण या सर्व मान्यवरांना लागू पडतं. एक ताई आहेत, चारोळी चं सदर चालवतात. त्याचं शीर्षक 'संस्कार शिदोरी'. या ताई सकाळी सकाळी किमान सहा वाजताच आपली शिदोरी उघडून घोळक्यातील मेम्बरांवर की मेंढरांवर उपदेशांचा मारा करतात. चारोळी असते, तिला क्रमांक व शीर्षक असते. आजचा क्रमांक 'पुष्प -३३८, मी मराठी ' वेळ पहाटे ४:५०.

वात्सल्य, विज्ञान आणि विधि(लॉ)

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शुक्रवार, 24/02/2023 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच हा व्हिडिओ व्हाट्सपवर पाहण्यात आला. संदर्भ असा - 'मि. चटर्जी वि. नॉर्वे' नावाचा एक चित्रपट येऊ घातलेला आहे.

पत्र

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 24/02/2023 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
पत्र तुझे वाचत असताना नटखट शब्दांपाशी अडतो गाभुळलेल्या चिंचेचा मग स्वाद जिभेवर उगा उतरतो पत्र तुझे वाचत असताना अडतो अनवट शब्दांपाशी मग ओळींच्या अधली मधली लड उलगडते जरा जराशी तुझे पत्र वाचत असताना अडतो शब्दांपाशी अवघड शब्दांच्या घनदाटामध्ये अर्थाची मग होते पडझड

शशक-फ्रिज

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 24/02/2023 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
ती-रोज रोज काय तेच तेच? तुला कंटाळा कसा येत नाही? मी-आलाय ना. मला तुझा कंटाळाच आलाय. तसेही आपल्याला एकत्र राहायला लागुन आता २ वर्षे होउन गेली आहेत. किती वेळा तेच तेच बघायचं? आणि तुझा ईंटरेस्ट आजकाल कमी झालाय फार. बाहेर काहीतरी चालु नाहीये ना? ती- मूर्ख आहेस का? एकच चूक माणुस पुन्हा पुन्हा कशाला करेल? आधीच डोक्याला ताप झालाय. उत्तराखंड ट्रिपवर गेलो होतो तिथेही तुझी कटकट होतीच. आणि तुला परत सांगते, माझ्या अंगावर हात उगारलास ना तर सरळ पोलिसात तक्रार करीन आणि तुझे घोडे लावीन. मग बस खडी फोडत तुरुंगात. मी- मला धमकी देतेस?

श्वान शीघ्रकोपी

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शुक्रवार, 24/02/2023 03:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही भटकी कुत्री चार वर्षाच्या मुलाचे लचके तोडत असतानाचा एक व्हिडिओ कोणतीही पूर्वसूचना न देता कुणीतरी ग्रुपवर पाठवला. मला तो दहा सेकंदसुद्धा पाहण्याचे धाडस झाले नाही. पुढे काय असेल या कल्पनेनेच थरकाप उडाला, आणि मन प्रचंड उदास, अस्वस्थ झाले. इतकं की मला आज थेरापिस्ट कडे जावे लागले. कुत्रा नामक गोष्टीची भिती खूप लहानपणी बसली. मला कुत्रा लहानपणी चावला नाही, पण धाकट्या भावाला एक कुत्रा चावला. करंगळीच फाडली होती. तो धसका बसून मी कुत्र्यांपासून प्रचंड सावध वागू लागलो. नंतर एका बालमित्राला एक पिसाळलेला कुत्रा चावला. सुदैवाने त्याचा मोठा भाऊ दवाखान्यात काम करत असल्याने लगेच उपचार केले गेले.

शहरी माणूस.

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 23/02/2023 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवातीला गांगरलो, भोवळलो, घुसमटलो पण... आता रुळू लागलोय या वस्तीत. किती दिवसात नाही पाहिलं चांदणं काजव्यांच लुकलुकणं चंद्राच्या अस्तित्वाचीच आता येऊ लागलेय शंका सूर्याचं उगवणं, मावळणं देखील किती दिवसात अनुभवलेलं नाही. इथे व्यवहार चालतो घड्याळाच्या काट्यावर त्याच्या काट्यानुसार आमचं आयुष्य सरकत असतं पुढं पुढं माणसांच्या गर्दीत राहून सुद्धा असतो एकटा एकटा आसपासच्या माणसाचं अस्तित्वसुद्धा कळत नाही आतासं. किंवा... तशी गरजच भासत नाही कुणाला.
काव्यरस

Thrills on Wheels - चौथा टप्पा

लेखक मालविका यांनी गुरुवार, 23/02/2023 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
Thrills on Wheels ( Thane - Statue of Unity - Thane) चौथा टप्पा २६ जानेवारी. आजपासून परतीचा प्रवास सुरू. येताना जेव्हढे रिलॅक्स होतो त्यापेक्षा जरा काळजीत होतो. काळजी एवढ्याचसाठी की आलो तेव्हा कुठे थांबणार हे पक्क होत, हॉटेल बुक केलेली होती. आता आम्ही आमचा अंदाज घेवून त्यातल्या त्यात मोठ्या शहरात जाऊन मग तिथे हॉटेल बघून राहणार होतो. त्यामुळे वेळेत निघणं, वेळेत पोहोचणं गरजेचं होत. सुरवातीला अंकलेश्र्वर नक्कीच होत. निघालो आणि केवडियाचा परिसर सोडला नि मस्त टेल विंड्स लागले. इतके दिवस एकही BRM ला या टेल विंडस नी साथ दिली नव्हती.