Skip to main content

नक्षत्रांचे देणे

लेखक सूड यांनी गुरुवार, 25/09/2014 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल नक्षत्रांचे देणे बघताना शांता शेळकेंच्या ओळी ऐकत होतो.. जुन्या आजोळाची आता पार झाली पडझड ओटी अंगण ओसरी एक राहिले ना धड हरवले बाळवय खोल जिव्हारी लागले उठे मुकाट तिथून मन शिणले भागले क्षणभरही वळून नाही पाहिले मी मागे काय राहिले तिथेच काय आले मजसंगे काय राहिले तिथेच, काय आले मजसंगे? विचार करता करता हे काहीसं सुचलं.

कमिटी (शतशब्द्कथा )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 25/09/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
'कमिटी येनार' म्हटल्यावर सगळी संस्था कामाला लागली. बऱ्याच फाईली हालल्या. कमिटीचा दिवस सणासारखा सजला होता. मिटिंग हॉलमधे लंबगोल टेबल- त्यावर सफेद बेडशिटं टाकालीवती. पाटील सर फाईली ठीक करत होते. काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. इतक्यात ''कमिटी आली..'' असा गलका झाला. सदस्यांनी जागा घेतली. फाईली चाचपल्या. पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं. चेरमनसायाबाकडं बघून कसनुसं हसले. चष्म्याच्या वरून बघत महाजनसाहेब म्हटले "यावेळी संस्थेने प्रगती चांगली केलीय. पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा '' ''तुमचं मार्गदर्शन असल्यावर काय सर?

आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 25/09/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा विरुद्ध लढणे त्यांना उपयोगशून्य वाटत असावे. असे असेल तर त्यांनी त्यांचे संघटनेचे नाव बदलून हिंदूधर्मश्रद्धाविरोधी संघटना असे नाव द्यावे. धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा ह्या इतर क्षेत्रातल्या अंधश्रद्धा जास्त भयानक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत.

अनवाणी नवरात्र

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 25/09/2014 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्‍याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा. वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत? व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि.

मी पयला... ???

लेखक दशानन यांनी बुधवार, 24/09/2014 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
मी पयला... हा प्रतिसाद अनेक धाग्यांवर मी पाहिला, मला याचा अर्थ नाही समजला. किंवा हा नियम जेव्हा लागू झाला असेल तेव्हा मी मिपावर येत नसेन त्या वेळचा असेल. पण एखाद्या उत्तम धाग्याची सुरवात अश्या प्रतिसादाने होते तेव्हा काय होते माहिती आहे? अनेक वाचक हे आधी प्रतिसाद वाचतात व मग लेख वाचायला घेतात. त्यांना हा "मी पयला..." असा प्रतिसाद दिसला की ते धागा सोडतात व दुसरा उघडतात, कारण मी असेच करत होतो. आपण एकदम जाणवले व असे धागे आवर्जून वाचले तर धागे खरच उत्तम व माहितीपूर्ण होते पण अश्या पहिल्या प्रतिसादाचा सोस पाहून असेल त्यांच्या गप्पा-टप्पाचा विषय म्हणून मी सोडून दिले होते.

न्यायालयातील एक दिवस

लेखक जानु यांनी बुधवार, 24/09/2014 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज एका जामीनासाठी कोर्टात जायचा योग आला. ४९८ ची केस होती. आई, वडील, दोन भाउ, त्यांच्या पत्नी, प्रत्येकी दोन अशी चार मुले, (वय वर्ष १० ते १) चार जामीनदार, दोन वकील असा गोतावळा घेउन आरोपींसह आम्ही कोर्टाच्या आवारात सकाळी बरोबर ११ वाजेच्या ठोक्याला पोहोचलो. त्या कुटुंबापैकी एक कोर्टातच नोकरीला असल्याने तशी काळजी फारशी नव्ह्ती. तालुक्याचे कोर्ट असल्याने सगळा खेड्यातील लोकांचा गलबला सुरु झालेला. बिलीफने पुकारा सुरु केला. आमचे चार्जशीट अजुन आले नसल्याने तपास अधिकार्‍याला फोन केला. त्याने पोलिस स्टेशनवरुनच सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन येत आहे असे सांगितले. आम्ही वाट पाहु लागलो.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 24/09/2014 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 --------------------------- छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons) स्पर्धेचे नियम दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" : निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 24/09/2014 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" नमस्कार मंडळी. पहिल्या छायाचित्रण स्पर्धेप्रमाणेच दुसर्‍या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ३१ प्रवेशिकांना ४० जणांनी मते दिली. त्यातून सर्वात जास्त मते मिळणारी छायाचित्रे पुढीलप्रमाणे: विशेष म्हणजे यावेळी बहुतेक छायाचित्रांना कोणी ना कोणी तरी पसंती दिली आहे. सर्वच छायाचित्रे विषयानुरूप आनंद देणारी होती. यातील पहिल्या आलेल्या ३ छायचित्रांचा समावेश मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये करत आहोत. तसेच विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत.

रायडींग ऑन अ सनबीम

लेखक श्रीरंग_जोशी यांनी बुधवार, 24/09/2014 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर – हे लेखन इथे प्रकाशित करण्याचा उद्देश म्हणजे रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंट्री फिल्मबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवणे हा आहे. यामध्ये मिसळपाव.कॉमची भूमिका केवळ एक माध्यम एवढीच मर्यादित आहे. Riding on a sunbeam मौक्तिक कुलकर्णी - एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर व न्युरोसायंटिस्ट पण पट्टीचा भटक्या.

संवेदनशीलता

लेखक सह्यमित्र यांनी बुधवार, 24/09/2014 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्ट मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटने बद्दल मिपा वर कुठला धागा वाचनात आला नाहि. एरवी मिपा वर बहुतेक सर्व चालू (राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ ) धागे येत असतात. ह्या विषयावर धागा येईल असे वाटले होते. आला असेल तर माझ्या वाचनात तरी नाही आला . अर्थात नुसता धागा काढून चर्चेतून सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा दुर्घटना ग्रस्त लोकांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत करणेच जास्त योग्य आहे आणि तसे करणारे बरेच मिपाकर असतीलच. पण तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले . इथे मी देखील हा विषय योग्य वेळी न मांडता उशिरा मांडत आहे ह्याची मला जाणीव आहे.