शशक- निवडणूक ३
आधीचे भाग
निवडणूक
निवडणूक २
साहेब, नुसतेच काय शाहु,फुले,आंबेडकरांची नावे घ्यायची? यावेळी वॉर्डात बहुजन समाजाचा उमेदवार पाहीजे बघा लोकांना.आपले नाना कसे वाटतात?
अरे बाबा निवडुन यायला मतांची बेरीज बघावी लागते. शिवाय तुझा ऊमेदवार पार्टीफंड किती देणार?
पार्टीफंडाची काळजी नाही साहेब.तो पाहीजे तेव्हढा उभा करु . पण मतांसाठी जरा अडचण आहे बघा.
अरे तेच तर महत्वाचे आहे, आधीच नोटाचे फलक लागलेत तुझ्या वॉर्डात.
मिसळपाव