अंधार क्षण भाग ४ - तात्याना नानियेव्हा (लेख १८)
अंधार क्षण - तात्याना नानियेव्हा
एका क्षणात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, होत्याचं नव्हतं होऊ शकतं. तात्याना नानियेव्हाच्या आयुष्यात तो क्षण २६ आॅक्टोबर १९४२ या दिवशी आला. सोविएत रशिया आणि नाझी जर्मनी यांचं युद्ध सुरू होऊन एव्हाना एक वर्षाहून जास्त काळ होऊन गेला होता. ती युक्रेनमध्ये सोविएत सैन्याच्या इस्पितळात नर्स म्हणून काम करत होती. त्या दिवशीही ती कामात होती. अचानक तिने एक थरकाप उडवणारा खडखडाट ऐकला. हळूहळू तो आवाज वाढत गेला आणि जेव्हा तिने हिंमत करुन खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा समोरचं पूर्ण क्षितिज रणगाड्यांनी व्यापलं आहे हे तिच्या लक्षात आलं.
मिसळपाव