Skip to main content

प्रिंटरवर छापलेल्या विमानातून प्रवास करायला तयार व्हा !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 15/02/2015 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
डोळे चोळू नका. तुमचे डोळे ठीक आहेत... आणि इथे टंकनचूकही झालेली नाही ! तंत्रज्ञांनी विमानाचे इंजिन "छापण्याचे" तंत्र विकसित केले आहे आणि जवळच्या भविष्यात तुम्ही त्या तंत्राने बनवलेले इंजिन आणि इतर भाग वापरून बनवलेल्या विमानातून प्रवास करू शकाल ! .

त्रिमिती छपाई (3D printing) अथवा संयोगी वस्तुनिर्माण (Additive Manufacturing, AM)

तसे बघितले तर 3D छपाई ही काही नवीनं गोष्ट नाही. हे तंत्र १९८० मध्ये नागोया मुनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इंस्टिट्यूट (जपान) मधील हिदेओ कोदामा या तंत्रज्ञाने विकसित केले.

बिरहा कि रात…

लेखक पारा यांनी शनिवार, 14/02/2015 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेंव्हा खडकी स्टेशन वरून शनिवारी सक्काळी मुंबईसाठी ट्रेन पकडत असे. शक्यतो सकाळची सिंहगड ठरलेली असायची. शेवटचे दोन डबे आमच्यासारख्या ऐन वेळी आरक्षण नसलेल्यांसाठी ठेवलेले असायचे. आमची कोण पर्वा रेल्वे प्रशासनास. आमच्यासारखे जगात फारच असल्याने दोन डबे, खडकीला उघडत असून पुरेसे पडत नसत. त्यामुळे गाडी फलाटाला लागायच्या आधीच, तिकीट वगैरे काढून आत उडी मारण्याच्या तयारीत राहावे लागे. शनिवारी सकाळी हा व्याप करायला प्रचंड कंटाळा येत असे. असाच एका शनिवारी मी खडकीला पोहोचलो. सकाळी लवकर म्हणजे ५.४५ झाले होते. फार गर्दी व्हायची होती. त्या दिवशी मे महिन्यातसुद्धा थोडसं गार वातावरण होतं. पूर्ण फलाटावर जाग आली नव्हती. एक कोपऱ्यात रेल आहार चालू झाला होता. सकाळच्या रम्य वेळी, गरम चहाचा सुगंध, थोडसं फटफटू लागलेलं, आणि कहर म्हणजे अतिशय सुंदर असं ‘बलमा जानो मोही प्रीत’ हे गाणं लागलं होतं, बेगम अख्तरांच्या ठेवणीतल्या आवाजात. त्यांचा आवाजही असा अगदी जुन्या ठेवणीतल्या पैठणीसारखा आहे. कधी जुन्या एखाद्या लाकडी कपाटात आत हात घालावा आणि कागदात छान बांधलेली जुनी आजीची पैठणी हळुवार काढावी, त्या तलम वस्त्रावरून हात फिरवताना मऊशार आणि उबदार जाणीवेबरोबर मनही कुठेतरी भूतकाळात हरवून जातं, तसा त्यांचा आवाज. त्या आवाजाला अजून साज चढावा तो जुन्या रेडीओमुळे. हे Bose आणि Sennheiser कालची गोष्ट. तांत्रिकदृष्ट्या उत्तम, पण रेडीओ वरच्या खरखरीची सर त्याला नाही. अशी बेगम अख्तरांच्या आवाजातील एखादी जुनी ग्रामोफोन ची तबकडी ऐकत राहावीशी वाटते.

'ति'ची गोष्ट

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 14/02/2015 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
तो..... शनिवार नेहमीच्या सवईने घरी येताना बागेतल्या नेहमीच्या वळणावर उभा होतो. त्या वळणावरचा काळ माझ्यासाठी गेली कित्तेक वर्ष तसाच थांबला आहे. आणि त्याची आता सवयही झाली आहे. रोज जस गणपति-मारुती स्त्रोत्र म्हणतो; तस रोज त्या वळणावर मी काही क्षणांसाठी फ़क्त माझा उरतो. पण आजचा दिवस वेगळा आहे. आज ती दिसली. तोच जुना वड... तेच जुन बाक... आणि ती देखिल तशीच! काळजाचा ठोका चुकला. गडबडलो... आणि तिच्याशी बोलायची उफाळून आलेली उर्मि दाबून घरी आलो. ती शनिवार 10 वर्ष पूर्ण झाली हे शहर सोडून. त्यानंतर कधी मागे वळून नाही पाहिल.

वासोटा - बामणोली ते चोरवणे

लेखक सतीश कुडतरकर यांनी शनिवार, 14/02/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
वासोटा- बामणोली ते चोरवणे कामाच्या धबडग्यात आणि पोटापाणाच्या उद्योगात एव्हढा गुंतून गेलो होतो की मलापण गड किल्ल्यांचा विसर पडायला लागला होता. डोंबिवलीहून कल्याणला राहायला गेल्यामुळे तर मित्रपरिवाराचे दर्शनसुद्धा दुर्लभ झाले होते. अक्षरश ७ वर्षे सर्वांपासून दूर कुठेतरी राहायला गेल्यासारखं वाटत होत. रोजचा कल्याण ते अंधेरी प्रवास म्हणजे एक दिव्यचं. रात्री बारा-एक वाजायचे घरी यायला. पण मनात कुठेतरी डोंबिवलीप्रेम जागृत होत. परत सगळ्या मित्रांना भेटायला उत्सुक झालो होतो आणि त्यातच डोंबिवलीमध्ये परतण्याचे माझे प्रयत्न चालू होते आणि एक दिवस आपल्या घरट्यात परतलो.

मराठी कथा

लेखक पुस्तकमित्र यांनी शनिवार, 14/02/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! कादंबरी, आत्मचरित्र, विनोदी साहित्य, कविता असे विविध साहित्यप्रकार हाताळून आता तुमच्या साठी घेऊन येत आहोत एक नवा विषय - मराठी कथा. आपल्या काही आवडत्या कथांविषयी ह्या धाग्यात बोलूया. जेणेकरुन मराठीतील काही उत्तमोत्तम कथांचा आढावाही घेता येईल. चला तर मग आपल्या आवडत्या कथांविषयी लिहायला.

मले माईतच नाई...

लेखक ऊध्दव गावंडे यांनी शनिवार, 14/02/2015 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
असं कसं होते मालं मले कयतच नाई तसं झालं तरी काई मले माईतच नाई नेतो नाल्या वरं ढोरं मी पानी दाखोयाले धुनं धूते तथी कशी मले माईतच नाई डाबडुबली खेयाले म्हून आंब्या खाली जातो तिची रखवाली तथी मले माईतच नाई गुळं फोळला दुपारी ढोरं हकल्याले जातो ढोरं हायेतं तिचेचं मले माईतच नाई संद्याकाई ईरीवरं पानी भर्यासाठी जातो नस्ते तिच्या जोळं दोरं मले माईतचं नाई यकं दिसं बुडा म्हने तुयं लगन जुळलं माई नौंरी केलं तिले मले माईतचं नाई तसं झालं काई तरी मले माईतचं नाई शब्दार्थः नालाः नदी पानी दाखोयालेः पाणी पाजण्या साठी डाबडुबलीः आंब्या च्या झाडावर खेळायचा खेळ रखवालीः watch ग

किशोर मासिक : बालपणी च्या आठवणी

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी शनिवार, 14/02/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अंतर्गत, बालभारती ने सर्वप्रथम 1971 मधे किशोर प्रकाशित करायला सुरुवात केली!!, पाठयपुस्तक मंडळात विषय तज्ञ म्हणुन माझे वडील "सिलेबस रिव्यु" ला पुण्याला जात असत, त्यांनीच प्रथम मला ह्या मासिकाची गोडी लावली, कॉन्वेंट मधे शिकुनही आज जी काही मोड़की तोड़की मराठी मी लिहु शकतो त्याचे बऱ्याच अंशी श्रेय ह्या मासिकाला मी देतो, 1992 ते 2000(वय वर्षे 7 ते 16) दर महिन्याला हे मासिक घरपोच अगदी वेळेवर येत असे पोस्टाने.

शिक्षण मंत्री आणि "काटा"!!

लेखक म्हया बिलंदर यांनी शनिवार, 14/02/2015 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
तसे विचित्र पोजेस देऊन स्वतःचे कसलेही फोटो काढून घेण्यात नेतेलोक मग्न असल्याचे आपण सर्वांनी पाहिलेच आहे, पण एखाद्या विशेष खात्याचा मंत्री त्या खात्याचं मोजमाप काटा घेऊन मोजताना मी तरी पहिल्यांदाच पाहतोय. दप्तरांचे ओझे वाढते आहे वाढलेले आहे हि काही आत्ताची बोंब नाही. व ते निश्चितच कमी व्हायला/ करायला हवे. निर्विवाद. ते किती वाढतेय यावर बर्याच वाहिन्या/ संस्थांनी सर्वे देखील केलेत पण म्हणून मंत्री महोदय लगेच काटा घेऊन मोजायला निघालेच.

"जेसन आणि बोलती बेडकी"

लेखक पदकि यांनी शनिवार, 14/02/2015 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
सिलिकॉनदरीत/वसे तो जेसन शिका हा लेसन / तरुणींनो त्याच्या डोक्यामध्ये / आज्ञावली फक्त संगणकी रक्त/ खेळतसे रस्त्याने चालता / एका प्रात:काली बेडकी बोलली / शेजारून "अरे राजपुत्रा/ राजकन्या मीही बेडकाचे देही/ शापग्रस्त मला उचलून / स्वगृही नेशील आणिक घेशील / चुंबन ते प्रगटेल माझे / मानवी शरीर "कामा" स उशीर / मग नाही जन्मभर तुझी/ होईन मी कांता आनंदा अनंता/ मुकू नको " जेसनने तिला / मग उचलले आणिक ठेविले / खिशामाजी घरामध्ये तिला / दिले छोटे घर खायलाही चार / किडे बिडे आठवडे झाले/ कित्येक दिसांचे पण चुंबनाचे / नाव नाही बेडकी अखेर/ झालीसे हताश स्वरात निराश / प्रश्न करी "अरे प्रिय म
काव्यरस

मोज्यांचे दालन

लेखक पदकि यांनी शनिवार, 14/02/2015 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीगोलाच्या पोटात अगदी मध्यावर एक विस्तीर्ण दालन आहे ज्यात सर्व हरविलेले मोजे जातात. त्यांचा प्रतिदिन वाढणारा ढीग पाहून देव कपाळाला हात लावतो. एकाही मोज्याची जोडी हजर नसते. तुम्ही जर तुमच्या लाडक्या मोज्याची जोडी शोधत बसाल तर एक अब्ज वर्षे लागतील. या वरून हे सिद्ध होते की मानवाच्या दोन बाजू सारख्याच असल्या पाहिजेत हा नियम निसर्गालाही मान्य नाही. पुरुषांनी दोन वेगळे मोजे घातले तर बायकांनी त्यांस हसू नये असा नियम करता येईल.पुरुषांनीही हसू नये (पुरुषांना). बायका असे होऊ देतच नाहीत. बहुधा त्या एकाच प्रकारचे शेकडो मोजे विकत घेत असाव्यात. हुशार असतात. xxx Milind Padki