Skip to main content

अपरात्रीचे चित्रपट: द बॅण्ड्स विझिट

लेखक रामदास यांनी मंगळवार, 17/02/2015 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची सात-साडेसातची वेळ. निघताना एकदा घरी फोन करावा काय असा विचार डोक्यात असताना मोबाइल वाजतो. अनोळखी नंबर. एकदा फोन टाळण्याची इच्छा होते, पण सवयीच्या नाइलाजाने फोन घेतो. समोरचा आवाज ओळखीचा नाही, पण निरोप घणघणत डोक्यात जातो. कुणीतरी अचानक गेलं आहे. बर्‍याच वर्षात संपर्कही नाही. पण आयुष्याच्या मैलोगणती विणलेल्या पटात उभे-आडवे धागे गेलेल्या माणसानी विणले आहेत. घरी फोन करतो. "उशीर होईल. झोपा. वाट बघू नका." सगळी निरवानिरव होऊन घरी पोहचेपर्यंत रात्रीचे दोन-सव्वादोन. बाथरूममध्ये गीझर चालू करून बादली भरेस्तो अवघडून सोफ्यावर बसतो. अजून मन सुन्न आहे. बधिर आहे.

मिसळपाव कशेळे कट्टा

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 17/02/2015 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ रोजी मिपा चा कट्टा कर्जत कशेळे जवळ आंबिवली येथील वन विहार या रिसोर्ट मध्ये झाला त्याची प्रकाशचित्रे मी टाकत आहे त्याचा वृत्तांत श्री चौकट राजा साहेब टाकणार आहेत. . .

घटस्फोट

लेखक शिरीष फडके यांनी मंगळवार, 17/02/2015 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
घटस्फोट 'लहानपण देगा देवा' असं म्हणण्या इतपत लहानपणीचे दिवस चांगले होते तिचे. पण कळायला लागल्यापासून किंवा कळत्या वयापासुनच दिवस पालटले. सतत घरातलं वातावरण तणावाचं राहू लागलं. वडिलांचं दारू पिण्याचं प्रमाण दिवसें-दिवस वाढत होतं. आणि दारूमुळे होणार्या आई-वडिलां मधल्या भांडणांचं प्रमाण देखील वाढतच होतं. तसं नाही म्हटलं तरी आधी तिला तिच्या भावंडांचा आधार वाटायचा. पण कालांतराने भावंडांमध्ये देखील तणावाचं वातावरण निर्माण झालं. घरातील प्रत्येक दिवस प्रत्येकजण तणावाखाली वावरत होता. घरात तणाव निर्माण होण्यासाठी किंवा भांडणं होण्यासाठी आता कुणालाच विषयांची कमतरता भासत नव्हती.

खानदेश सफर

लेखक त्रिवेणी यांनी मंगळवार, 17/02/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर ! अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं ! अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा देखा संसार संसार, शेंग वरतून काटे अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार ! अर

‘चांगल्या’ कामासाठी लाच घ्या...

लेखक नांदेडीअन यांनी मंगळवार, 17/02/2015 11:28 या दिवशी प्रकाशित केले.

नवीन कायदा येतोय. (कायदा आयोगाने सध्या फक्त प्रस्ताव मांडलाय.) या कायद्यानुसार जर एखादा सरकारी कर्मचारी ‘चांगल्या’ कामासाठी लाच घेत असेल, तर तो कायद्याने गुन्हा ठरणार नाही. या कायद्याबद्दल अधिक माहिती खालील लिंकवर वाचता येईल. http://navbharattimes.indiatimes.com/business/business-news/accepting-b… या निमित्ताने "ना खाऊंगा, ना खाने दूंगा" हा डायलॉग आठवला.

अश्मयुगातला बाबा

लेखक saumitrasalunke यांनी मंगळवार, 17/02/2015 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपली मुलगी बाबांसोबत दंगा करण्याच्या मूडमधे आहे.. बाबांनासुद्धा तेच करायचं आहे. पण नकळत डोक्यात काटे टकटक करत पुढे चाललेले.. बॉस कालच म्हणाले होते, जरा लवकर ये उद्या, डेडलाइन जवळ आलीये आणि आपण अर्ध्यात पण नाही आहोत. मुलीला फसवून दाराबाहेर पडताना चहासुद्धा घ्यायची इच्छा होत नाही. ती जी काही सात अट्ठाविस किंवा आठ चौदा असते ती पकडायला उसेन बोल्टला शरम वाटावी या स्पिडमधे तुम्ही पळता. कधी मिळते कधी हुकते. मिळाली तर ठीक पण हुकली तर जबर म्हणजे डबल मूड ऑफ़! असं वाटतं अश्म्युगात असतो (हे गृहीत धरून की तेव्हा काहीतरी बोली विकसित झाली असेल) तर कसं असतं? मुलगी सकाळी सकाळी म्हणाली असती...

हर्षयुक्त उमापती

लेखक देवदत्त परुळेकर यांनी मंगळवार, 17/02/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाशिवरात्री शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा लोकप्रिय अभंग आहे - भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥ भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥ सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥ या अभंगात महाराज शिवाच्या रुपाचे तसेच स्वरुपाचेही वर्णन करतात. कसा आहे तो महादेव ? नरहरी सोनार महाराज वर्णन करतात - भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ शिवाने भस्माची उटी अंगाला फासली आहे.

ब्रोकोली ग्रातिन

लेखक स्रुजा यांनी मंगळवार, 17/02/2015 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रातिन हा फ्रेन्च खाद्य संस्कृती मधला एक खास प्रकार. फ्रेन्च पदार्थांचं आपलं असं एक खास स्थान आहे जागतिक खाद्यदालनात. एक मंद सुगंध, त्यात प्रत्येक घटक आपली नजाकत घेऊन हजेरी लावणार आणि या प्रत्येकाची चव वेगवेगळी, हळूच जिभेवर घोळणारी तरी ही एकत्रित एक राजस परिणाम साधणारी. या सगळ्या वैशिष्ट्यांनी ग्रातिन पण नटलं आहे. कॅनडा मध्ये निदान गेले २ शतकं फ्रेन्च प्रभाव आहे. आणि आमच्या बाजूलाच एक फ्रेन्च राज्य आपल्या सगळ्या पाककौशल्यासकट नांदतंय. किती बाजूला ? म्हणजे इकडच्या घाटावर ब्रिटीशांनी धुतलेली धुणी फ्रेन्च धोबिणी आपलीच समजून चुकून घेऊन जातील इतक्या बाजूला.

चार अपशब्द

लेखक पदकि यांनी मंगळवार, 17/02/2015 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
(जसे: दाखव विठ्ठला / तुझे देवपण नाहीतर घण/ आहे माझा : विंदा करंदीकर ) खुल्या नभाखाली/ उभा मी नागडा बोल तो रांगडा / सुनावितो असे काय मोठे / देवा तुवे दिल्हे ? आई-बाप नेले/ मृत्युलागी साऱ्या सजीवांना / वेदना नि कळा रक्त भळाभळा / वाहते ते सर्वत्र ही मृत्यू /घालितो थैमान सोडीला हैवान / मोकळा तो. धाडिले "प्रेषित"/म्हणे सात-आठ त्याने काय xट/ बदलले? साऱ्या सजीवांना / बनविसी हीन होती मग दीन/ पायी तुझ्या . आम्हा सजीवांना / करी जे भिकारी ब्रम्हाची शिसारी/ नाकी माझ्या माझ्या आयुष्याचा / स्वामी मी बारका "पोर तो पोरका" / तुझा नाही. अटळ तो मृत्यू / सर्वांच्या राशीत घाल ते कांशीत / जग तुझे! :
काव्यरस