Skip to main content

संध्याछाया..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 06/04/2015 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस संपला होता होता झालि संध्याकाळ संध्येच्या त्या छायेमध्ये झोपे थकला बाळ वाट वाकडी करून दिसाला संध्या छाया आली बाळाच्या त्या चर्येवरती मावळणारि लाली तो ही थकला ती ही थकली सांज वातीला जागा उद्या पुन्हाही सकाळ होइल तोवरि कसला त्रागा? मी ही वदतो छोटी कहाणी प्रत्येका दिवसाची कुठे कुठे ती दिसे पौर्णिमा-बाकी ही अवसेची! चला गड्यांनो समजुन घेऊ रूपक हे संध्येचे जुने जाणते जे जगले ते साधे जीवन साचे ----------------------------- अतृप्त..

सये भांडतेस कशा..

लेखक कहर यांनी सोमवार, 06/04/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
(दूर असलेला नवरा आज बऱ्याच दिवसांनी घरी येतोय म्हणून बायकोची उडालेली त्रेधा पाहून तिच्या मैत्रिणी तिची अशी फिरकी घेतात ) सांज दाराशी गं आली, सये भांडतेस कशा.. काय लागीर लागली अशा राती येड्यापिश्या । सये भांडतेस कशा, भरे घागर पाण्याची तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची । येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय आडवाट चकव्याची.. मन लागंल वढाय । मन लागंल वढाय, या गं चांदणचाहूली भीव घाली गोरीमोरी तुझी कातर सावली । या गं चांदणचाहूली, रंग ठेव कि राखून मीठ उतरून टाक..
काव्यरस

सुगंधा - भाग १

लेखक कविता१९७८ यांनी सोमवार, 06/04/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
"तुने साथ जो मेरा छोडा दिवाना तेरा मर जायेगा..........." दुरवर संध्याकाळच्या कातरवेळेत अमोघच्या कानावर हे सुर पडत होते आणि तो आणखीनच भावनात्मक झाला. तिला विसरणे खरंच इतके अवघड होते? का? ती जेव्हा आपल्या आयुष्यात नव्हती तेव्हा आपण जगत नव्हतो तिच्या आधी आपल्या आयुष्यात कुणी दुसरी होती असेही नाही. मग ? आपल्याला तिची सवय लागलीये? तिचं सतत समोर राहणं आपल्याला खलायचं, तिचं वागणं , बोलणं , हसणं खिदळणं सर्वच नावडतीचं मीठ अळणी असल्यासारखं वाटायचं , मग आता असं झालय तरी काय आपल्याला, का ती सारखी डोळ्यासमोर दिसते? का तिच्या बांगड्यांचा आवाज कानात घुमतोय.

ही वाट भटकंतीची १३ : वेरुळ - अजिंठा (भाग २)

लेखक गणेशा यांनी सोमवार, 06/04/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : सकाळची वेळ असल्याने, आणि बॅटरी बरोबर न घेतल्याने आतील बरेचसे फोटो काळसर येत असल्याने पुढील वेळेसच फोटो काढु आता निवांत सर्व बघुन घेवु असे ठरवले. काही फोटो काढले परंतु येथे देत नाही त्यासाठी लेणॅ १५ आणि १४ या लेण्यातील फोटो पाहण्यासाठी आमचे परममित्र वल्ली यांच्या धाग्याची लिंक दिलेली आहे, . . . . भाग १ : कैलास लेणे . मागील भागात पाहिल्या प्रमाणे, कैलास लेणे पाहुन मन खुप प्रसन्न होते..आता पर्यंत निसर्ग हा सर्वश्रेष्ठ कलाकार आहे हे मी मान्य करत होतो..

गोंधळ

लेखक नाखु यांनी सोमवार, 06/04/2015 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ. असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली. प्रांतोप्राती वेग्वेगळ्या लोकप्रथा असल्या तरी त्याचा गाभाहेतू एकमेकांच्या परंपरेशी नाळ जोडणारा असतो .

केजरूके गुलाम

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 31/03/2015 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला.

विरुपाक्षी, बंगारू तिरुपती आणि कोटिलिंगेश्वर

लेखक पॉइंट ब्लँक यांनी मंगळवार, 31/03/2015 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
विरुपाक्षी हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. हे मुलबागलपासून ५ किमी अंतरावर असून, इथे तेराव्या शतकातील एक प्रशस्त शिव मंदिर आहे. हे मंदिर कृष्णदेवराय दुसरे ह्यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. ह्याची रचना हंपीतिल विरुपाक्ष मंदिराप्रमाने असल्याचे सांगण्यात येते. (हम्पी मी अजून पाहिले नाही तेंव्हा जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकवा.) ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे एकाच गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. आणि ह्यातील एका शिवलंगाचा रंग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बदलत राहतो. मी तिथे दुपारी तासभर होतो तेंव्हा ह्याची शहानिशा करता आली.

लेह लदाख मोटरसायकल फेरी - फोटो

लेखक खंडेराव यांनी मंगळवार, 31/03/2015 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या ऑगस्ट मधे मी, बायको, मित्र, त्याची बायको अशा चार लोकांनी स्वतः प्लॅन करुन जम्मु- ष्रीनगर-द्रास-कारगिल-लामायुरु-लेह-नुब्रा-पॅन्गाँग-सर्चु-मनाली-चंदीगड अशी ३०००+ किमीची फेरी केली. आमच्या गाड्या अफाट होत्या. एक ११० सिसी सुझुकी हयाते आणि एक १३ वर्ष जुनी पल्सर १५०. ११० सिसी वर दोन माणसे ( एक १०० किलो - मी ), १५ दिवसाचे सामान घेउन ही फेरी करणारे बहुधा आम्ही भारतातले पहिलेच. वेगळाच अनुभव..स्वत:ला नव्याने ओळखले.