Skip to main content

दादा कोंडकेंची क्रेझ

लेखक दा विन्ची यांनी गुरुवार, 16/04/2015 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी उच्च शिक्षणासाठी सध्या देवभूमी उत्तराखंड मध्ये आहे. समवयस्क स्थानिक लोकाशी बऱ्याच वेळा गप्पा टप्पा अर्थात हिंदीमध्ये होत असतात . राष्ट्रवादी आणि शिवसेनेची धोरणे इत्यादी विषय असतात . पण मला असे जाणवले कि शरद पवार , बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, यांच्यापेक्षाही बहुतेकांना स्वर्गीय दादा कोंडके हे माहित आहेत आणि त्यांना त्यांच्या एकूण हजरजबाबी पणा तसेच त्यांचे दुहेरी अर्थाचे संवाद, त्यांची सेन्सार बोर्डाशी असलेली भांडणे ( पंगा) वगैरे चांगलीच माहिती आहेत.

गुजरात.......३ डभोई हिरागेट

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 16/04/2015 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात.......३ डभोई हिरागेट आत्तापर्यंत गुजरातमधे प्रवेश केल्यावर जेवढा प्रवास केला त्यात लक्षात राहणार्‍या बाबी म्हणजे रस्त्यांचा दर्जा. जगभरातील रस्त्यांना टक्कर देतील अशा दर्जाच्या रस्त्यावरुन जाताना पोटातील पाणीही हलत नव्हते. सगळे रस्ते डांबरी, त्यामुळे आवाजही कमी येत होता व मधे खटखट येणारे आवाजही नव्हते. बरेचसे रस्ते लार्सन अँड टुब्रो या कंपनीने केले होते. रस्ते म्हणजे नुसते डांबर टाकून त्यावरुन रोड रोलर फिरवणे असे नसते तर त्यामागी काहीतरी तंत्रज्ञान असते ही महाराष्ट्रातील राजकारण्यांना केव्हा उमगणार देव जाणे. टोल नाक्यावर एकदाही दोन मिनिटापेक्षा जास्त थांबावे लागले नाही.

किती सांगू मी सांगू कुणाला - युवराजान्च्या पुनरागमनाच्या आनन्दाप्रीत्यर्थ

लेखक लॉर्ड फॉकलन्ड यांनी गुरुवार, 16/04/2015 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला आला आला ग पप्पू आला द्वादशीच्या राती ग, यमुनेच्या काठी ग, राहुलबाबा अवतरले गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, झेन्डे थरथरले पप्पू दिसतो उठून, खान्ग्रेसी आले नटून शपथविधीचा शृंगार केला मूर्ति अशी साजिरी ग, गालावरी खळी ग, भुलले पप्पूला कुणी म्हणा राहुल, कुणी म्हणा युवराज, पप्पूला नावे किती लपूनछपून, परदेशी जावून सांजसकाळी अभ्यास केला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला आला आला ग पप्पू आला
काव्यरस

उटी-कोडईकॅनल बद्दल माहिती हवी आहे

लेखक त्रिवेणी यांनी गुरुवार, 16/04/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
लोक्स हो मदत करा. 30 एप्रिल ते 4 मे उटी-कोडईकॅनलची ट्रीप बूकिंग मिळाले तर करणार आहोत. मी आपले भटकंतीचे धागे चेक केले पण काही माहिती नाही मिळाली. तर तिकडे भेट दिलेल्या मिपाकरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती. जर कुणाकडे माहितीतील ड्रायवर किवा गाडी यांचे संपर्क क्रमांक असतील तर तेही द्या.

नाऱ्या नाऱ्या

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 16/04/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
नाऱ्या नाऱ्या चल्लस खय? मालवणाची माका इल्ली सय. नाऱ्या नाऱ्या पलतस कित्याक? गरज पडलीहा निल्या नित्याक. नाऱ्या नाऱ्या बांद्र्याक काय जाला? तुजे तोंडात शिरो पडो मेल्या. नाऱ्या नाऱ्या तुजा नेसाण सुटला? गप बस मारे , काम कर वायला.
काव्यरस

खाऊगल्ली

लेखक त्रिवेणी यांनी गुरुवार, 16/04/2015 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू--------- अप्पु ताई ही पहिली रेसीपी तुझ्यासाठी ग. वाग्यांची घोटलेली भाजी साठी तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद टाकून भरपूर लसूण आणि हिरवी मिरचीची चुरचुरीत फोडणी करून घ्यायची. नंतर त्यात हिरव्या वांग्यांच्या फोडी टाकुन परतवून घ्यायचे आणि भांड्यावर ताटात पाणी टाकुन मस्त दणदणीत वाफ काढायची. 10 मिनिटात वांगी बर्या पैकी शिजतात आता त्यात मीठ टाकुन वरण घोटायच्या रवीने भाजी मस्त घोटून घ्यावी.

राधा …....२

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 16/04/2015 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
राधा …....१ पहाटवाऱ्यानं सोबत आणलेल्या बासरीच्या सुरांनी राधेला उठवलं . राधेची लगबग चालू झाली . राधा जणू सोळा वर्षाची अल्लड युवती बनली. कितीप्रकारे नटली तरी तिचं समाधान होईना. शेवटी एकदाचा साजशृंगार आटपला आणि ती झपाझप शिवमंदिराच्या दिशेने चालू लागली . सूर्य नुकताच आकाशात डोकावत होता . मंदिरात पोचली तेव्हा तिथं कुणीच नव्हतं . कृष्णाची वाट पाहत ती आवारात बसून राहिली. हळूहळू लोक येऊ लागले. क्वचित कुणाच्या तोंडून त्यांच्या राजाची स्तुती ऐकू येई . आणि इकडे राधेचा उर अभिमानाने भरून जाई .

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४०

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 16/04/2015 04:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि ह्या काहिश्या समाधानानी दाटलेल्या हृद्य प्रसंगी, काकूचा निरोप घेऊन आंम्ही घराकडे परतलो. पुढे चालू... =================================================== काहि व्यवसायच असे असतात..की त्यामधे सुट्टी घेण्याचं स्वातंत्र्य असलं,तरी ती मिळण्याचं असेलच असं नाही. आता हेच बघा ना.. मी इकडे दिडदोन महिन्याकरिता आलो आणि त्यातले पंधरावीस दिवस गेले कसे ते खरच कळलं नाही..असं म्हणण्यासारखे दिवस सुखात चाललेले होते.

कुक्कुट शर्विलक-विलाप

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 15/04/2015 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
(किंचित्कवी समजून चू.भू.द्या.घ्या.) मालवणातिल सागरलहरी मला खिजविती अष्टौप्रहरी बाण लागता नको तिथे हा पर झाली 'कनका'ची नगरी 'कुक्कुट गेले साथ सोडुनी 'विकास' दिसता दुज्या अंगणी चोचीमधला दाणा जपती नख्या आपुल्या तीक्ष्ण परजुनी 'वाघ' लागला मागावरती 'वांदरे'हि किलकारा करती वनवासातुन सुटका या हो कधी व्हायची? घटिका सरती.. 'सोनिया'सम ते दिन ना उरले 'घड्याळा'तलेही क्षण सरले ठेवावे हे मस्तक ऐसी दिसतिल का चरणांची 'कमले'?
काव्यरस