Skip to main content

ठळक माझी मेहुणी....

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 17/04/2015 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या कडक माझी मेहुणी, वाघ बकरी चहापरी वाघ माझी बायको, डोळा सदा माझ्यावरी गुरकते, डरकाळते , पण मेहुणी जबरी खरी लाख नखरे बायकोचे शांत चित्ते साहतो मेहुणी येता घरा मी सभ्यतेने वागतो आलिया भोगासि म्हणुनी बोल नशिबा लावतो :(:(:(:(:(:(:(:(:(:(
काव्यरस

उन्हाळी शिबिरांमध्ये मुलांना घालावे कि नाही ?

लेखक स्वीत स्वाति यांनी शुक्रवार, 17/04/2015 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या उन्हाळी शिबिरांचे खूप च फॅड आहे (आपण लहान असताना नव्हते असले काही शिबीर वगैरे म्हणून म्हणाले फॅड) . माझा मुलगा तीन वर्षाचा आहे , तर त्याला या उन्हाळी शिबिरांमध्ये घालावे कि न घालावे हा मोठा प्रश्न आहे , बाकी चे लोक घालत आहे म्हणून आपण पण घालावे कि ती सध्या गरज आहे हेच कळत नहिये. बर्याच ठिकाणी अशी हि परिस्थिती आहे कि आई वडील दोघे हि नोकरी करणारे असल्याने मुलां कडे सुट्ट्यांमध्ये कोण लक्ष देणार म्हणून त्याला पर्याय उन्हाळी शिबिरे.

U.K. डिपेंडेंट वीसा

लेखक अभिजीत अवलिया यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी माझी पत्नी आणि मुलाचा U.K. साठी डिपेंडेंट वीसा अप्लाइ केला होता. पुणे येथे 26 मार्च ला vfs ला इंटरव्यू झाला.10 दिवसात वीसा मिळेल असे संगितल्याने आम्ही 27 एप्रिलचे त्यांचे त्यांचे मुंबई-लंडन टिकेत सुद्धा बुक केले. पण बरेच दिवस काहीच उत्तर न आल्याने मी ब्रिटीश हाइ कमिशनला विचारणा केली असता त्यानी सांगितले की पत्नी चे अप्लिकेशन प्रोसेस झालेले आहे पण मुलाच्या साठी त्यानी लिहीले आहे की 'decision on your application has been delayed whilst further enquiries are being conducted'. तुमच्यापैकी कुणी मला सांगू शकेल का असे का झाले असेल.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

मुलाखत: पंडित संदीप अवचट

लेखक पारुबाई यांनी शुक्रवार, 17/04/2015 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य सुखकर करण्याकरता ज्योतिषशास्त्राद्वारे मार्गदर्शन करणारे एक अग्रगण्य ज्योतिषी म्हणून पंडित संदीप अवचट आपल्याला सगळ्यांना माहितीचे आहेत. ‘पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि थोतांड अश्या प्रकारांना संपूर्णपणे फाटा देऊन नव्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोनातून ज्योतिषाचे महत्व पटवणारे’ ही त्यांची खरी ओळख म्हणता येईल. काही दिवसापूर्वी सानफ्रान्सिस्को बे एरियामध्ये त्यांच्या ‘दिलखुलास राशी’ या कार्यक्रमामुळे त्यांची भेट झाली.

दोस्ति

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 17/04/2015 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
नितिन, विकास आणि सुधीर लहांपणापासूनचे मित्र. एकाच वयाचे असल्याने एकाच शाळेत जायचे. एकाच सोसायटितले जीवश्च कंठश्च मित्र. नितिनची आई शिक्षिका आणि वडील प्राइवेट फर्ममधे नोकरीला होते. नितिन शांत स्वभावाचा आणि अभ्यासु होता. एखादा विषय तो उत्तम फोड़ करून सांगायचा. ग्रेजुएशन आणि पोस्ट ग्रेजुएशन नंतर तो एका उत्तम कॉलेज मधे प्रोफेसर म्हणून जॉइन झाला. विषयाची हातोटी चांगली होती म्हणून अल्पावधितच नाव झाल आणि मग तर त्याने आपले प्राइवेट कोचिंग क्लासेस् सुरु केले. सकाळी 6 ते रात्रि 10 तो बिजी असायचा. विकासचे वडील सरकारी कर्मचारी होते.

सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र

लेखक सौन्दर्य यांनी गुरुवार, 16/04/2015 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
(काही दिवसांपूर्वी, "How to take care of your wife" ह्या शीर्षकाचा एक लेख वाचला होता. त्या लेखाचा स्वैरानुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी स्वानुभवाचे बोल देखील पेरले आहेत. आपण आयुष्यात खुश राहू इच्छिता ?? – हा घ्या गुरुमंत्र आपापल्या बायकाना सदा खुश ठेवा ? कसे ?

गोव्याची साद - भाग २

लेखक किणकिनाट यांनी गुरुवार, 16/04/2015 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
आणि गोव्याची साद आली- भाग १ नमस्कार मि.पा. मंडळी, भाग ४ जवळ जवळ तयार आहे पण या भागातली प्रकाशचित्र अजिबात चांगली दिसत नव्हती. आपल्यातल्या बर्याच जणांनी तसे सांगीतले आणि काही बहुमोल सूचनासुद्धा केल्या. त्याप्रमाणे आज तशी दुरुस्ती करून हा अपडेटेड धागा टाकतो आहे. आवडेल अशी आशा.

संगणक घेताना (भाग-२)- संगणकाची जुळणी

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी गुरुवार, 16/04/2015 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग: संगणक घेताना (भाग-१) ह्या आधीच्या भागांमधे आपण संगणकाचे वेगवेगळे भाग काय असतात, ते कसे निवडावेत, एकमेकांशी ते संलग्न (कंपॅटिबल) आहेत ह्याची खात्री कशी करुन घ्यायची हे पाहिलं. ह्या भागामधे आपण संगणकाची जुळणी कशी करायची, जुळणी करत असताना काय काळजी घ्यायची ह्याची सचित्र माहिती घेउ.

*पुर्वतयारी* :

संगणकाची जुळणी करणं हा अतिशय सोप्पा प्रकार आहे. थोडीशी काळजी घेतली तर अगदी ८-१० वर्षाचं लहान मुलंही संगणकाची जुळणी करु शकतं. त्यासाठी थोडी पुर्वतयारी आवश्यक आहे.

हरलेला माणूस ?????????

लेखक नितिन शेंडगे यांनी गुरुवार, 16/04/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी सिनेमाना प्राईम टाईम दिला गेला आणि समस्त मंडळीना मिरच्या झोंबल्या. आता हि मंडळी कोण तर ज्यांच्या मुळे मल्टीप्लेक्स चालतात असे सगळे म्हणतात. का तर ते १०० करोड चे सिनेमे देतात, आता हे १०० करोड कसे होतात तर तिकीट दर वाढवले कि झाले. पण जे लोक खरच मनापासून सिनेमा वर प्रेम करतात त्यांनी मात्र ह्या मध्ये लक्ष दिले नाही. त्यांना हि माहित आहे कि मराठी सिनेमा आता बदलला आहे, जर २ ते ३ करोड मध्ये बनणारा सिनेमा ३० ते ४० करोड कमवत असेल तर तो तथाकथित हिंदी सिनेमा वाल्यांच्या पोटात गोळा आणणारा आहे .