Skip to main content

जकार्ताच्या आठवणी : २ : प्रथम दर्शनी

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 11/05/2015 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी मलेशियन एअरलाईन्सच्या विमानामध्ये मुंबईहून जकार्ताला निघालो. या विमान कंपनीच्या एमएच 370 विमानाच्या आताच्या घटनेमुळे बरेच लोक या नावाला घाबरतात. अनेकजणांनी मला इशारा दिला. मीसुद्धा सतर्क होतोच. पण शेवटी अशा घटना घडत राहतात, म्हणून आपण काही त्या गोष्टी करणे थांबवू शकत नाही. मुंबईमध्ये सीएसटीवर हल्ला झाला होता, पण लोक तेथे जाणे थांबवू शकत नाहीत, पुण्यातसुद्धा जेएम/एफसी रोडवर हल्ला झाला होता, आणि अजूनही ती वर्दळीची आणि लोकप्रिय खरेदीची ठिकाणे आहेत. एमएच 370 तर अजूनही एक गूढ आहे. सुदैवाने, माझा पुढचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी होता. माझे पहिले विमान मध्यरात्री मुंबई ते क्वालालंपूर असे होते.

अट्टाहास

लेखक रातराणी यांनी सोमवार, 11/05/2015 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
आना वॉक करून परत आली आणि रोजच्या सवयीने तिने सगळ्या खिडक्यांचे पडदे बंद केले. म्हणजे ती अंधाराला घाबरत वगैरे नाही पण असा खिडकीतून बाहेर बघितल्यावर दिसणारा काळोख तिच्या अंगावर येतो. मोठ्या हौसेन, एकांतात राहायचं म्हणून ती या घरी राहायला आली. दिवसा उजेडी छानच वाटत ते. छोट्याशा टेकडीवरच टुमदार घर, समोर पसरलेला विशाल समुद्र, त्याच्या काठावर डोलणारी नारळाची झाडं, अगदी चित्रात असतं तसच! पहिल्याच भेटीत प्रेमात पडली ती या घराच्या. तिच्या या विचाराच हल्ली तिला स्वतःलाच हसू येत. पहिल्याच भेटीत ती कुठल्या मुलाच्यादेखील प्रेमात पडली नाही. पण या घरी आली आणि तिला वाटल, आपलीच वाट पाहत थांबल होतं इतके दिवस.

कधी येईल आठवण माझी .....

लेखक psajid यांनी सोमवार, 11/05/2015 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
बघशील कधी आठवांना, असशील जिथे तिथे तू, हसशील मनी गालांत, असशील जिथे तिथे तू ! स्पर्श नजरेचा होता, फुललेले अंगी रोमांच, जपशील सदा मनांत असशील जिथे तिथे तू ! सांगत वाहील झरा, माझे शब्द न शब्द, सोडशील श्वास उदासी असशील जिथे तिथे तू ! भेट तुझी माझी मोहोरल्या नभांखालची, फुलतील ते क्षण पुन्हा असशील जिथे तिथे तू ! सांगतील कुणी विरुद्ध, माझ्या चार शब्द, उठशील मैफल टाकून असशील जिथे तिथे तू ! विसरण्यां नाव “साजीद” करता कधी प्रयत्न चुकतील हृदयताल तेव्हा, असशील जिथे तिथे तू ! - साजीद यासीन पठाण

खराब दिवस

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 11/05/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
खराब दिवस परवा सकाळी मी दवाखान्यात गेलो. सकाळी तीन रुग्ण पाहिल्यानंतर एक चार महिने गरोदर असलेली तरुणी सोनोग्राफी करता आली होती. तिची सोनोग्राफी करताना मला असे लक्षात आले कि तिच्या मुलामध्ये मोठ्या प्रमाणावर दोष आहेत. मुलाच्या मानेला सूज होती(cystic hygroma), हृदयाच्या रचनेत मोठ्या प्रमाणावर बिघाड होता. मुलाच्या नाळेत शुद्ध रक्ताची एकच रक्त वाहिनी होती. (साधारणपणे दोन असतात)( single umbilical artery). मेंदूच्या रचनेतही बिघाड वाटत होता. मी बराच वेळ सोनोग्राफी करत होतो त्यावरून त्या जोडप्याला काही तरी गडबड आहे हे जाणवले. सुरुवातीला तिचा नवरा सारखे प्रश्न विचारत होता.

स्वच्छंद - ३

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 10/05/2015 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
स्वच्छंद - १ स्वच्छंद - २ पोपटांचे व्यक्तिचित्रण करयला खूप मजा आली. पोपटांचे वेगवेगळे आविर्भाव, मुद्रा खरोखरच मोहक होत्या.

पुण्यात येणार कुवेतचे शेख :)

लेखक टवाळ कार्टा यांनी रविवार, 10/05/2015 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात येणार कुवेतचे शेख :) गेल्या आठवड्यांत व्हाट्सप्प वृत्तसंस्थेकडून हाती आलेल्या बातमीनुसार कुवेताचे एक शेख (जे मुळचे मराठी आहेत...आणि मिपाकारांमध्ये "पनीर"बाबा असे सुपरिचित असलेले), यांस "घर वापसी" करण्याची ओढ़ लागली आहे. त्यांनी त्यांच्या घर वापसीसाठी सध्द्या सुरु असणारा मे महीना नक्की केलेला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, दिनांक ६-जून-२०१५ रोजी सकाळी पुण्यनगरीतसुद्धा त्यांचे आगमन अपेक्षित आहे.

जरुरत है, जरुरत है......

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 10/05/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?” नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!” “मग?” “पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम?

कोण चूक…कोण बरोबर???

लेखक टवाळ कार्टा यांनी रविवार, 10/05/2015 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
कोण चूक…कोण बरोबर??? नुकताच माझ्या शाळेच्या whatsapp ग्रूपवर एक गरमा गरम (सं?)वाद झाला, इथे जश्शाचा तस्सा देत आहे. प्रमुख पात्रे Person A - हा माझा शाळेतला फार चांगला मित्र आहे, त्याची आणि माझी मते बर्याचदा जुळतात Person B - हि पाचवीत असताना दुसर्या शाळेत गेली आणि whatsapp ग्रुपमधून आता आमच्या संपर्कात आहे Person C - ही शाळेतलीच दुसरी एक मुलगी Person D - हा शाळेतील एक त्यातल्यात्यात शांत मुलगा, Person A याची बर्याचदा मस्करी करतो (वैयक्तिक काहीही आकस नाही) मला स्वताला Person A ने लिहिलेले पटले आणि त्याच्या जागी मी असतो तर मी सुध्धा कदाचित असेच काहीतरी लिहिले असते…परंतू बाकीच्यांची मते बघू

माय...

लेखक ऊध्दव गावंडे यांनी रविवार, 10/05/2015 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
माई माय माई माय नाई शिकली लेयनं रातं दिसं मेहनतं जीवं मातीले जायनं चुरुक भुरुक अशी लावे झाकटीतं रई देते पाह्यटीचं मले खायाले सायीचं दई ठूनं हातावरं डोकसं तिचं वगारु पाजनं शाळेतलया पोराईचं येकं दोनं आईकनं चुनं भाकरं थापूनं घाई घाई वावरातं बोंड येचता येचता जोळे नख़याईशी नातं सोसूनं सासरवासं तरी हाये समाधानी पोरं शिकतीलं लयं सदा राये ह्याच ध्यानी दुधं तापऊनं राती टाके तयातं ईरजनं होते दई लोनी चं ते नाई नासलं आजुन