माय...
माई माय माई माय
नाई शिकली लेयनं
रातं दिसं मेहनतं
जीवं मातीले जायनं
चुरुक भुरुक अशी
लावे झाकटीतं रई
देते पाह्यटीचं मले
खायाले सायीचं दई
ठूनं हातावरं डोकसं
तिचं वगारु पाजनं
शाळेतलया पोराईचं
येकं दोनं आईकनं
चुनं भाकरं थापूनं
घाई घाई वावरातं
बोंड येचता येचता
जोळे नख़याईशी नातं
सोसूनं सासरवासं
तरी हाये समाधानी
पोरं शिकतीलं लयं
सदा राये ह्याच ध्यानी
दुधं तापऊनं राती
टाके तयातं ईरजनं
होते दई लोनी चं ते
नाई नासलं आजुन
लेखनविषय:
याद्या
2001
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
ह्याप्पी मदर्स डे !
STU
In reply to ह्याप्पी मदर्स डे ! by पगला गजोधर
छान कविता. ही बोलीभाषा कोणती?
धन्यवाद !
In reply to छान कविता. ही बोलीभाषा कोणती? by सतिश गावडे
_/\_
धन्यवाद !
In reply to _/\_ by नूतन सावंत
भाव पोचला, आवडला. पण कही
very much thanks...
कविता अणि भाषा दोन्ही आवडले..
धन्यवाद !
In reply to कविता अणि भाषा दोन्ही आवडले.. by गणेशा