Skip to main content

बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनाचे समन्वयक श्री. शैलेश शेट्ये यांच्याशी बातचीत

लेखक बीएमएम२०१५ यांनी गुरुवार, 14/05/2015 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन आता फक्त दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. दोन अडिचशे स्वयंसेवकांना घेऊन चार-पाच हजार लोकांचे तीन दिवस मनोरंजन करणे ही काही सोपी गोष्ट नाही. गेल्या दोन वर्षाहूनही अधिक काळ या अधिवेशनाचे काम सुरु आहे. आणि हे काम करण्याची जबाबदारी ज्यांच्या समर्थ खांद्यानी पेलली आहे त्या शैलेश शेट्येंशी केलेही ही बातचीत.

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 14/05/2015 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल. अर्थात थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे. मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते. मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता. म्हणून त्या मैदानाला लोक स्टीफन ग्राउंड म्हणून ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भाड मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पना करणे ही शक्य नव्हते.

काही नवे करावे म्हणून.-भाग २

लेखक नूतन सावंत यांनी गुरुवार, 14/05/2015 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या दिवशी भावाचा फोन आला,"ताई,मी आज जाऊन आलो फणसोपला.तो चाफेरकर (तलाठी)काय म्हणाला म्हीतीय? तुमची बहिण आणि मेहुणे मंत्रालयात आहेत न?मग मग त्यांना माहिती नाही वटते काम कसे करतात?वजन कसे ठेवतात?मी त्याला सांगून आलोय की, ताई येऊन तुझ्या डोक्यावरच वजन मारेल म्हणून?" "ठीक आहे."असे म्हणून मी फोन ठेवला.

'माझा' अभिप्राय

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 14/05/2015 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी ऑफीसात होतो तेव्हा मला माझ्या व्यग्र कामातुन वेळ मिळाला आणि आमच्या जुन्या मित्राची कविता दिसली त्यातील मीपण विसरण्याविषयीचे वाक्य पाहुन फार वाईट वाटले म्हणुन इथे मी माझा अभिप्राय देत आहे . मला माझा अभिप्राय आवडतो . तुम्हाला आवडला तर मला माझ्या व्यनित कळवा .

कुठे जावे?

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 14/05/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्या आहेत. पुढच्या महिन्यापासून मुलांची शाळेची वारी सुरु होईल. सहकुटुंब गावी जावे तर बजेट कोलमडतय. पण मुलांना याचा भुर्दंड का? म्हणून एक दिवशीय पिकनिक करायची ठरवली आहे. पण सारखेच रिसोर्टला जाऊन पाण्यात बेडकासारखे डुंबत बसणे याचा कंटाळा आला आहे. तेव्हा मिपाकरांनो … मुंबईच्या जवळपास असे कोणते ठिकाण ज्यात रिसोर्टची मज्जा, थोडे निसर्गसौंदर्य, गावचा फील येईल असे जेवण, बैलगाडीची सफारी असे कोणते ठिकाण असेल ते सुचवा.आम्ही सगळ्या लेडीज आहोत त्यामुळे जास्त लांबचे ठिकाण नको आहे. साधारण वसई ते पालघर किंवा ठाणे भागात असेल असे काही.

डोक्क्यात जाणारी सेल्समनशिप

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 14/05/2015 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे; जे सगळ्यांना जमत नाही. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी समोरच्या माणसाला प्रवृत्त करणं, हे मला तरी महाकठीण काम वाटतं. नॉट माय चहाचा कप. आज बाजारात तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तरी तुमच्यापुढे अनेक पर्याय असतात. बरं, स्पर्धा इतकी आहे की कंपन्याही आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) हा एककलमी कार्यक्रम घेऊन शर्यतीत उतरलेल्या असतात. त्यांचे मोहरे असतात ते म्हणजे सेल्समन. ग्राहक म्हणून तुमचा अधिक संबंध येतो तो या 'सेल्समन' नावाच्या प्रजातीतील व्यक्तींशी. कुणाचीही हेटाळणी करायचा उद्देश नाही, त्यामुळे हलकेच घ्या (take it easy).

जकार्ताच्या आठवणी : ३ : सुरुवातीचे दिवस

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 14/05/2015 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी जकार्ताच्या आमच्या ऑफिसमध्ये रुजू झालो आणि काम सुरु केले. मी कामाचा तपशील तुम्हाला सांगत बसणार नाही. कारण, तुम्हाला तांत्रिक संज्ञांमध्ये विशेष रस असणार नाही, आणि त्याने काही फरकहि पडणार नाही. आणि काही कमीअधिक फरक सोडले तर सर्व आयटी कंपन्यामधले काम सारखेच असते. मी तुम्हाला मुख्यत्वे इथले लोक, जकार्ताभोवतीची मी पाहिलेली ठिकाणे याबद्दल सांगेन. lift माझ्या कंपनीचे इंडोनेशियामध्ये काही क्लायंट आहेत, आणि म्हणून त्यांनी तेथे एक ऑफिस उघडले आहे.