माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग २ -रोम
भाग १
व्हिसा मिळाला आणि खरेदीची एकच धांदल उडाली.थोडेसे गरम कपडे घ्यायचे प्रवासी कंपनीने सुचवले होते.कपडे,बूट अशी खरेदी,क्लिनिकला पेशंट्सची कामं आवरणं यात दहा दिवस उडून गेले. शुक्रवारी पहाटे आमचे टर्कीश एयरलाईनचे विमान अगदी वेळेवर इस्तंबुलला येऊन पोहोचले.पुढे इस्तंबुल रोम असे दोन तासानी विमान बदलून जायचे होते.विमानाबाहेर येऊन बघतो तर विमानतळावर अफाट गर्दी.पिक अवरमधलं डोंबिवली स्टेशन झालं होतं.तिथे गेटपाशी आल्यावर कळलं की पुढची फ्लाईट बेमुदत लेट आहे कारण रोमच्या टर्मिनल तीनला आग लागल्याने कालपासून रोमचा विमानतळ बंद आहे!
मिसळपाव