Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] ईवाईन

लेखक नाव आडनाव यांनी मंगळवार, 04/08/2015 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
तसंतर विमान म्हणजे फक्त एक वाहतुकीचा प्रकार. पण खेड्यातल्या "त्या"च्या सारख्यांसाठी विमान म्हणजे एक मोठं आकर्षण. विमानाचा आवाज ऐकून एकदा तो त्याच्या आई-वडिलांना म्हणाला "मी मोठा व्हवून ईंजिनीअर झालो त आपन ईवाईनातून फिराया जावू". त्याने अभ्यास केला, ईंजिनीअरींगचं पहिलं वर्ष बरेच लोक फेल होत असतांना त्याने फर्स्ट क्लास मिळवला. एज्युकेशनल ट्रिप साठी हैद्राबादला गेला. परत येतांना सगळ्यांसोबत लुंबिनी पार्कात गेला. ............ अचानक मोठा आवाज झाला. त्याला अजूबाजूला सगळं लाल दिसायला लागलं. छातीत काहितरी घुसलं होतं. श्वास हळूहळू थांबत होता. त्याने सरांना सांगितलं पण आता उशीर झाला होता.

[शतशब्दकथा स्पर्धा] नाईटमेअर

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 04/08/2015 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार..गडद, काळाकुट्ट अंधार...डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही इतका. त्याला जाग येते. खिडकीतला दिवा विझलाय. पेटवायला हवा. तो बिछान्यातून उठतो. काडेपेटी नेहमीच उशाशीच असते, पडली असेल कुठेतरी. अंधारातच तो इकडेतिकडे चाचपून बघतो. बहुधा खिडकीतच ठेवलीय मगाशीच. अंदाजानेच ठेचकाळत तो तिथे पोचतो. मंद झुळूक येतेय. वाऱ्यामुळेच विझलाय वाटतं. तो कवाडं ओढून घेतोय. पण..पण.. कुणीतरी आहे तिथे. अगम्य, निराकार... लालभडक डोळे... विचकलेले दात...शोषून घेतंय जणू आपल्याला. ऑ माय गॉड..... खडबडून तो जागा होतो, पूर्णपणे घामाघूम.....छ्या...! नाईटमेअर...परत तेच. दिवा फडफडतोय. खिडक्या लावल्यात. मरू दे च्यायला.

[शतशब्दकथा स्पर्धा] सुटका

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 04/08/2015 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
सहा महिन्यापासून पोटाचा त्रास सुरु होताच पण बाईची जात नि मधलं वय म्हणून सोडून दिलं होतं. चुकीचं पडलेलं दान, नशीबानं आयुष्यभर दिलेला त्रास नि जीवनसाथी म्हणवणाराची कसलीच नसलेली साथ. १५ वर्षात ना प्रेमाचा शब्द ना एखादी शाबासकीची थाप जगण्यात काय रस वाटायचा? माहेरचे लोक ओरडतात म्हणून गेल्या महिन्यात दवाखान्यात दाखवलं. हीमोग्लोबिन कमी + कसल्याशा पेशी खूप जास्त म्हणालेत. गोळ्या सुरु केल्या त्याचा साईड इफेक्ट म्हणून पोटाचा त्रास. मग सलाईन लावायचं ठरलं. ते सुरु होतंच तोवर मागच्या आठवड्यात ओटीपोटात जीवघेणी कळ आली.... टेस्ट केल्या. आज रिपोर्ट आलेत. खूप हलकं वाटतंय.

[शतशब्दकथा स्पर्धा] शिवी

लेखक शब्दबम्बाळ यांनी मंगळवार, 04/08/2015 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा दिवस मह्याचा होता. एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! कॉलनीमधले सगळेजण मह्याच्याभोवती गोळा होऊन त्या प्रसंगाचं मसालेदार वर्णन त्याच्याकडून ऐकत होते. "मस्त काम केलस रे! पण तो बरा सापडला तुला!" गर्दीतला एक जण म्हणाला. मह्या हसला,"अरे, घाबरून पळत सुटलं होत येड, स्वताच पडलं तोंडावर! वाटेतला दगड दिसलाच नाई आंधळ्याला!" गर्दीत हशा पिकला. मह्यानीपण खुशीत बाजुच्याला टाळी दिली! गर्दीतला तो मात्र चपापला, गर्दीतून सावकाश थोडा बाजूला आला. त्याला कुठेतरी खोल काहीतरी बोचल्यासारखे वाटले.

एक न पाहिलेली सुखदा ..........!

लेखक झंडुबाम यांनी मंगळवार, 04/08/2015 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी फेसबुक वर एक पोस्ट पाहिली, एका 6 महिन्याच्या मुलीचा फोटो , इतकी सुंदर ,गुटगुटीत आणि खूप बोलके डोळे. मला एकदम माझी पुतणी लहान असताना अगदी अशीच दिसायची . पण खालची पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर मन भरून आलं , अलिबाग मधील वात्सल्य नावाच्या अनाथाश्रामातली मुलगी होती खाली तिथला नंबर दिला होता . मी फोन केला आणि चौकशी केली पत्ता घेतला आणि जायचं ठरवलं . एक गोष्ट समजली ,तिचं नाव सुखदा . सुखदा काही डोक्यातून जात नव्हती . शनिवारी सकाळीच तिथे पोहोचलो . बाहेरचा बोर्ड वाचून आत शिरलो , तिथल्या madam नि आत घेतले . मी चौकशी चालू केली .

[शतशब्दकथा स्पर्धा] कबुली

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 04/08/2015 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
शिकविताना सरांनी डोळ्याच्या कोपर्‍यातून पाहिलं तेव्हा पुन्हा एकदा नितीन शेजारी बसलेल्या विजयच्या कानात कुजबुजताना दिसला. दोघेही हसत होते. सर भडकले. शिकवणं थांबवून ते संतापून दोघांच्या बाकाजवळ गेले. "विजय, हसायला काय झालं?" "मी हसत नव्हतो सर. मी वहीत लिहित होतो." "नाही म्हणतोस, खोटं बोलतोस, चुका नाकबूल करतोस. अरे, आम्ही शाळेत असताना आमची चूक नसताना सुद्धा सर रागावले तरी आम्ही सॉरी म्हणायचो, चुकलं म्हणायचो, परत करणार नाही असं म्हणायचो. सांग का हसलास?" "सर, नितीन हसत होता, म्हणून मी हसलो." "का हसत होतास नितीन?" सर गरजले.

[शतशब्दकथा स्पर्धा] वन नाईट इन द ट्रेन

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 04/08/2015 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे दोन वाजतायत. आता स्टेशन यायला हवं. कुणाला विचारणार? सगळे गाढ झोपलेत. ती दरवाज्यापाशी वाकून कुठे दिवे दिसतायत का पाहू लागली . इतक्यात मागे हालचाल जाणवली . कुणीतरी टोयलेटसाठी उठलं असावं. या आडगावी कोण उतरणार? काही वेळात हिरवा शर्ट घातलेला माणूस दरवाजा उघडून आत गेला. ती दरवाज्यात उभीच. थोडा वेळ गेला आणि पुन्हा दरवाजा उघडला. मगासचाच माणूस. काहीवेळ पसेजमध्ये थांबून आत गेला. आता कशाला आला असावा? परत दरवाजा उघडला. पुन्हा तोच. आता मात्र ती घाबरली. ओरडावे का? ट्रेनच्या आवाजात कुणाला ऐकू जाईल? तिने डोळे मिटले. दरवाजावरची पकड घट्ट केली.

आनंदाचा क्षण आणि ....

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 04/08/2015 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्या आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. ही आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्‍या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटलवर पोहोचला. त्याला बघताच बायकोच्या चेहर्‍यावर मंद स्मित पसरले, तिने पाळण्याकडे इशारा केला. पाळण्यात ती चिमुकली परी शांत झोपलेली होती. त्याने अलगद त्या चिमुकल्या परीला उचलले. अचानक त्याला हसू आले. "असे हसता काय?" बायकोने विचारले. तो हसतच म्हणाला, "कशी डोळे वटारून पाहते आहे अगदी तुझ्यासारखी.

[शतशब्दकथा स्पर्धा] द लॉस्ट रेलिक्स

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 04/08/2015 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
द लॉस्ट रेलिक्स 1 "खरेतर अशोकानंतर लगेचच मौर्यसाम्राज्याची पडझड झाली , त्याआधी बांधलेल्या लेण्यांपैकी ही एक !" प्रो.लँग्डन तल्लीनतेने सांगत होते. "पण मग अशोकाने जमावलेल्या बुध्दिस्ट रेलिक्सचे काय झाले ?

[शतशब्दकथा स्पर्धा] वड्यांवरची मालकी

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 04/08/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नाष्ट्यासाठी एका वड्याच्या गाड्यावर थांबलो होते. त्याच्याकडुन प्लेट घेताना नेमकी ती खाली मातीत पडली. लगोलग तो रडु लागला," साहेब 'त्यानं' वडे मोजुन ठेवले व्हते .. आता तेवढं पैसं नाही दिलं तर.." पाकीट काढलं आणि पैसे देऊन मी निघालो. जाताना बघीतले तर मातीतले वडे तो वेचुन खात होता. समोरच्या वड्यातल्या ढिगापैकी त्याच्यासाठी एकही नव्हता. त्याला त्याच्याच गाडीवर पोटभर जेऊ घातलं आणि मी निघालो. पाच पाऊल जाताच त्याने आवाज देऊन मी विसरलेलं पैशाने भरलेलं पाकीट मला परत आणून दिलं.... घरी परतलो आणि कपडे बदलताना लक्ष्ात आलं की रस्त्यावरुन येताना माझं पाकीट कोणीतरी मारलं आहे.