Skip to main content

होती एक नजर.......

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 13/08/2015 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
होती एक नजर....... मला पाहणारी लाख झिडकारले तरी अंगचटीस येणारी..... होती एक नजर....... मला शोधणारी कधी कॉलेज, कधी बस्-स्टॉप तर कधी खिडकीवर रेंगाळणारी होती एक नजर....... मला आसुसलेली प्रत्येक नकाराने माझ्या सुडाने ठसठसलेली........... होती एक नजर....... मला दाहणारी पेटवून देहास माझ्या खुनशी खदखदणारी.......... होती हर एक नजर.... माझ्यावरच खिळलेली जेव्हा फोडला मी टाहो तेव्हा हलकेच चुकचुकलेली..... होती एक नजर....... धुराने धुसरलेली दिसत होते त्यात बाबा अन आई लाघवी हसणारी..... उरली एक नजर......... जगण्यास धडपडणारी प्रत्येक विझत्या निखर्‍यासवे एक बाहुली कायमची.......निजलेली

[शतशब्दकथास्पर्धा] दैव

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 13/08/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
ओ सायेब... !!! आज तरी माह्या बापाचा चेक आला का हो ? डागतराने आयचं आप्रेशन कराया सांगितलंय. पंधरा हजार रुपडे मागतोय..!!!! .. .. .. .. .. मागल्या वर्षी अंजीच्या बापानं आत्महत्या केली... वीस हजाराच्या पिक कर्जापायी. . आपल्या पतीला झाडाला लटकलेल पाहून तिच्या आईला तिथेच लकवा मारला... आता ती घरी झोपूनच असते. पिंट्याची शाळा पण आता फीचे पैसे न दिल्यामुळे बंद झाली होती. शासनाकडून मिळालेल्या नुकसान भरपाईचा चेक मिळवण्यासाठी अंजी गेले चार पाच महिने तलाठी ऑफिसचे उंबरठे झिझवत होती. .. .. .. .. .. आज त्याचा मूड चांगला होता. त्याने चेक देण्यासाठी हाथ पुढे केला.

[शतशब्दकथास्पर्धा] दान

लेखक पामर यांनी गुरुवार, 13/08/2015 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे,त्याला सांगु तरी काय? आणि कसं?...काय म्हणेल तो मला?..कशी जाऊ मी त्याला सामोरी?,नको रे अश्या संकटात लोटुस..माझ्यामधे आता धैर्य उरलं नाही...." "तुला जे हवे ते मी त्याच्याकडुन मिळविनही,तो देईलही..पण पुढे मी त्याला काय तोंड दा़खवु,सांग ना.." "जी गोष्ट आयुष्यभर नव-यापासुन,मुलांपासुन लपवत आले..आता त्यांच्याच भल्यासाठी ह्याच भांडवल करु बघतोस...अरे माझी थोडी लाज ठेव..." "ह्यात कोणाचा फायदा आणि तोटा कोणाचा,तुच जाणे,...आमच्या दोघांसाठी मात्र हे जगच पार बद्लुन जाणार आहे...होऊ दे तुझ्या मनासारख...तो बघ,तो आला..." गंगेचा घाट चढत येणा-या कर्णाकडे बघत कृष्ण आणि कुंती स्वस्थ उभे रहिले.........

माया -३ (भयगुढकथा)

लेखक तुडतुडी यांनी गुरुवार, 13/08/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
माया - १ माया -२ सगळ्या घरात एक उदासपणा पसरला होता . ते घर आता केविलवाणं दिसू लागलं . त्या घरातले स्मित गेले . काव्य गेले . बडबड थांबली .राजीव अगोदरच घुम्या . ती भयाण शांतता सावित्री बाईंच्या अंगावर येवू लागली . मध्ये मध्ये येणारा पोरीच्या रडण्याचाच काय तो आवाज .त्या लेकराला बराच वेळ आई ने आपल्याला घेतलं नाही हे जाणवत असावं . राजीवला काहीतरी मनात टोचत होतं. ह्या पोरीचा जन्म झाला आणि चंद्रा आपल्याला , ह्या घराला सोडून गेली असं काहीसं त्याला वाटत होतं .

[शतशब्दकथास्पर्धा] भेट

लेखक नूतन सावंत यांनी गुरुवार, 13/08/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चच्या न्यूइयर पार्टीत शिरताच तिने त्याचे लक्ष वेधले. ती त्याच्याकडे ओळखीचे हसत होती. पार्टीतल्या लोकांशी बोलत तिच्यापर्यंत येताच तिने उठून त्याचे स्वागत केले.एव्हाना थिरकू लागलेल्या डान्सफलोअरवर त्यांनी प्रवेश केला.धून संपली. ड्रिंक्सचे ग्लास हातात घेऊन विसावले.अचानक ती म्हणाली ,”थोडावेळ बाहेर फिरायचं?” त्यालाही ओळख वाढवायचीच होती.

असमाधानाची

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 13/08/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक भरलेली 'शव'वाहिका एका भरधाव 'रुग्ण'वाहिकेला म्हणते .........अजुन तुझी कोणती ग़ ओढ़ बाकी?? पानसरेंच्या छातीतली गोळी दाभोळकरांच्या डोक्यातल्या गोळीला म्हणते, ..........यापेक्षा आपली 'आत्महत्या' बरी असती. नेमाडेंच्या दौतीतली शाई कसबेंच्या दौतीतल्या शाईला म्हणते .........एवढं 'रुत्तुन' लिहिलंस, तरी तू अजुन फिक्कट कशी??? कलामांची मुठमाती याकूबच्या मुठमातीला म्हणते .........मला कालच 'पालवी' फुटली, तू अजुन कोरडीच कशी?? गझलेची कैफियत कवितेच्या दुःखाला म्हणते .........तुला 'एवढ्याss' शब्दांची गरज कशी??? माझी अ-स्वस्थता या जगाच्या स्वस्थतेला म्हणते .........असमाधानाची -तुझी ग 'व्याख्या' कोणती?
काव्यरस

माझी आवडती/नावडती पुस्तके: विज्ञानकथा, गूढकथा, रहस्यकथा

लेखक पुस्तकमित्र यांनी गुरुवार, 13/08/2015 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आता पर्यंत या मालिकेत कथा, कविता, आत्मकथा, विनोद अशी आवडती-नावडती पुस्तके आपण पाहिली.

[शतशब्दकथास्पर्धा] - डील

लेखक अंतु बर्वा यांनी गुरुवार, 13/08/2015 03:17 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेन हलली. "हितेसभाय!" त्याची तंद्री भंगली. "अरे दोशीसाब!" गप्पांवरुन दोघे बिजनेसमन असावेत. "क्या बताउ, धंदेकी लगी पडी है, सोचता हुं थानावाला दुकान बेच दुं" "अगर सचमें बेचना चाहते हो तो मै ले लेता हुं" "सच में? देखो दुकान तो नब्बे तक जा सकता है लेकीन तुम पिचासी दे दो" "मेरी हालात भी तुमसे अलग नही है, साठ-पैंसठकी बात होती तो सोचता." "मेरा कर्जाही साठका है. मेरे लिये भी तो कुछ बचना चाहिये ना?" "यार, तु दोस्त है इस्लिये सत्तर. इससे ज्यादा नही हो पायेगा" पहिल्याचं स्टेशन आलं…… इकडे फोनवर, "मगनसेठ, एक मस्त डील है, एक खोका तो पक्का..."

कोडी kodi प्लेयर

लेखक अलक निरन्जन यांनी गुरुवार, 13/08/2015 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच गूगल महाराजांनी एक मस्त अ‍ॅप्लिकेशन शोधून दिले. कोड़ी प्लेयर. हा प्लेयर एकदा इन्स्टॉल करा आणि काही अ‍ॅड ऑन इन्स्टॉल करा की स्काय इझ द लिमिट. काही अ‍ॅड ऑनची नावे सुरुवात करायला. Genesis / Icefilms सगळे लेटेस्ट हॉलीवुड बॉलीवुड मूव्हीज / मालिका तुमच्या एका क्लिकवर, तेबी बेस्ट क्वालिटी. तू नळीवर सगळ्या सूचना ढिगानी उपलब्ध. काही वैशिष्ट्ये 1. टॉरेंटची गरज नाही 2. डाउनलोड फॅसिलिटी उपलब्ध 3. बफर स्पीड एकदम मस्त भारतामध्ये चालेल की नाही याबद्दल साशंक, कारण बर्‍याच साइट्स ब्लॉक असतील कदाचित्, पण एकदा प्रयत्न करू शकता.

आजची ज्वलंत चर्चा - सुरेल कोण?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 12/08/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदर्शन वाहिन्यांवर, ज्वलंत आणि गंभीर मुद्यांवर चर्चा कश्या रंगतात.... हात हलवीत हातवारे आले, हा! हा! हा!. आज रंगणार सुरांची चर्चा, माऊ, कुत्रा, कोकीळ, कावळा, कोण सुरेल तुम्हीच ठरवा. (मनातल्या मनात इथे माझाच निर्णय अंतिम असतो) हा ! हा! हा!.उडी मारुनी मनी आली बारीक आवाजात हलकेच म्हणाली, हातवारे भाऊ, आवाज आहे माझा गोड, सदा गाते म्याऊ म्याऊ म्याऊ.तेवढ्यात ओरडला दादा कुत्रा, हळवा-बुजरा गळा तुझा, खर्जातला बघा सूर माझा, भों भों भों भों भों. ना सुरांचे ज्ञान तुम्हास्नी, ना तालाचे भान, रडत असतील पूर्वज सारे, ऐकून तुमचे गान.