Skip to main content

माझी आवडती/नावडती पुस्तके: विज्ञानकथा, गूढकथा, रहस्यकथा

माझी आवडती/नावडती पुस्तके: विज्ञानकथा, गूढकथा, रहस्यकथा

Published on 13/08/2015 - 09:37 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी! आता पर्यंत या मालिकेत कथा, कविता, आत्मकथा, विनोद अशी आवडती-नावडती पुस्तके आपण पाहिली. http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 http://www.misalpav.com/node/29134 http://www.misalpav.com/node/29406 http://www.misalpav.com/node/29852 http://www.misalpav.com/node/30356 मराठीत विज्ञानकथा फार लिहिल्या गेल्या नाहीत. डॉ. जयंत नारळीकर हा सणसणीत अपवाद. गूढकथा म्हटले की नारायण धारप आठवतात. तर रहस्यकथा हाही मराठीत काहीसा उपेक्षित राहिलेला प्रकार. पूर्वी रहस्यकथांची पुस्तके चांगल्या कागदावर छापलीही जात नव्हती. ती वाचणारे सवंग काहीतरी वाचतात असे म्हटले जायचे. तरी बाबूराव अर्नाळकरांसारखे निष्ठेने लिहीत राहिले. आस्ते आस्ते हे चित्र बदलले आणि रहस्यकथांनाही थोडीफार प्रतिष्ठा मिळाली. चला तर या भागात आपल्या आवडत्या विज्ञानकथा, गूढकथा आणि रहस्यकथांबाबत लिहूया.
लेखनप्रकार

याद्या 6797
प्रतिक्रिया 21

माझा नंबर पैला.. नारळीकरांची वामन परत न आला, प्रेषित, व्हायरस, टाईम मशीनची किमया आणि यक्षांची देणगी शाळेत असतांना वाचलेले. तेव्हा जाम आवडलेली पुस्तके. मराठी रहस्यकथेपेक्षा इन्ग्रजी रहस्यकथांचे मराठी अनुवाद आवडलेत. मायकेल क्रायटनचे प्रे(सावज) हे ही त्यांपैकी एक. काँगो हे पण मायकेल क्रायटनचे पुस्तक मस्त आहे. आता जाते.. पुन्हा येते

नारायण धारपांच्या विज्ञानकथा मराठीत सर्वात जास्त संख्येने असाव्यात. युगपुरुष, नेनचिम, आकाशाशी जडले नाते, ऐसी रत्ने मेळवीन, कंताचा मनोरा इतकी आत्ता आठवतात. ..आणखी आठवली की येईन परत +)

गूढकथा म्हटले की नारायण धारप आठवतात. >>> मला तरी नारायण धारपांच्या कथा गुढकथा वाटत नाहीत . त्या भयकथा असतात . पण माझं प्रामाणिक मत आहे धारपांच्या कथा फार पाल्हाळीक आणि मला तरी न घाब्रवणाऱ्या वाटतात . म्हणजे वातावरण निर्मितीसाठी भूत आलं कि थंडी पडणं , कुबट कुजका वास येणं , हिडीस ओंगळवाण काही समोर येणं हे मला तरी कैच्या काही वाटतं . मला मतकरींच्या गुढकथा जास्त आवडतात

रिचर्ड प्रेस्टन व मायकेल क्रीश्तन ची सर्व पुस्तके उत्तम आहेत . मराठीत नारायण धारप व रत्नाकर मतकरी सुद्धा छान लिहितात . रॉबिन कुक ची मेडिकल थ्रिलर्स पण एकदम मस्त असतात.

जी ए च्या गुढकथा अजिबात आवडत नाहीत.सतत एक निराशा असल्यासारख वाटत.एक दोन वाचल्या नंतर सोडुन दिल्या. पुर्वी बाबा कदमांच्या रहस्यकथा कादंबर्या बर्याच आवडायच्या.

बाबा कदमांच्या रहस्यकथा ?? नावं माहित असतील तर सांगा प्लीज . खूप जुनी पुस्तकं आहेत ती . वडिलांनी त्यांच्या राद्दीवाल्या मित्राकडून ४ पुस्तकं आणली होती . बाबा कदमांची . जुनी , पिवळी पडलेली पानं आणि त्यांना येणारा तो घाणेरडा वास म्हणून मी परत द्यायला सांगितली . पण पपांनी २ ठेवून घेतली . १ ते वाचतायेत आणि १ सहज म्हणून मी घेतलं तर खरच छान आहे . गुढकथा नाहीयेत पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत

नारायण धारपांची चंद्राची सावली ही एक उत्कृष्ट भयकथा आहे. साठे फायकस ही पण त्यांची एक दर्जेदार भयकथा. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा तर अतिशय जबरदस्त. जंगल, टोक टोक पक्षी, लपाछपी, हेडस्टडी, खेकडा, ती दोन मुले, मला विक्रम दिसतो, मंदा पाटणकरची गोष्ट. जितकी नावे घेऊ तितकी कमीच. इंग्रजीमधे ब्रेम स्टोकरची ड्रेक्युला, मेरी शेलीची फ्रेन्केन्स्टाईन, एमिली बोन्टेची वुदरिंग हाइट्स ह्या भयगूढकथा अजूनही अभिजात गणल्या जातात.

मायावती,वेताळ्कोठी ह्या पुस्तकाचे लेखक आठवत नाहित पण मस्ताड आहेत या भयगूढकथा

रहस्यकथा या वाङमयप्रकाराचा जनक एडगर अॅलन पो. त्याची The Purloined Letter फार सुंदर आहे. G.K. Chesterton हे पण एक अग्रगण्य नाव. मग एकदम आर्थर काॅनन डाॅइल आणि त्याचा शेरलॉक होम्स येतो. नंतर मगा आगाथबाईंचे पाॅयराॅट आणि मार्पल, रेमंड चँडलर आणि डॅशिएल हॅमेट यांचे hard-boiled नायक, अर्ल स्टॅन्ले गार्डनरचा पेरी मेसन, मायकेल काॅनेलीची हॅरी बा‌ॅश सीरिज असे आहेत. आता गाजलेल्या कादंबऱ्या म्हणजे स्टीग लार्सनची मिलेनियम ट्रिलाॅजी. GIRL WITH THE DRAGON TATTOO, GIRL WHO PLAYED WITH FIRE आणि GIRL WHO KICKED THE HORNET'S NEST. अप्रतिम आहेत. मराठीत दुर्दैवाने या तोडीचं वाचायला मिळालं नाही. बाबा कदम आणि सुशि एकेकाळी आवडायचे. बाबा कदमांची ' दगा ' आणि ' स्टार विटनेस ' या छान कादंबऱ्या होत्या. सुशिंची मंदार आणि फिरोज सीरिज मी जवळजवळ तोंडपाठ होईपर्यंत रगडवली होती. त्यांची ' समथिंग ' ही कादंबरीही छान आहे. आणि हो, इंग्लिशमध्ये अजून एक आघाडीचं नाव म्हणजे फ्रेडरिक फोर्साईथ. जबरदस्त लिहितो हा माणूस. त्याच्या The Day of The Jackal पासून ते आता गेल्या वर्षीे आलेल्या The Kill List पर्यंत सगळी मी वाचलेली आहेत. त्याचे दोन कथासंग्रह - No Comebacks आणि The Veteran हेही भारी आहेत. मराठीत रहस्यकथा नाही, पण ट्रू क्राईम लिहिणारं एक नाव म्हणजे श्रीकांत सिनकर. त्यांच्या कथासंग्रहांचीही पारायणं केलेली आहेत - वायरलेस, जेल, जेल कस्टडी ही काही आठवणारी नावं. व.कृ.जोशींच्या इन्स्पेक्टर प्रधानांच्या चातुर्यकथाही चांगल्या असायच्या.

भयकथा , गुढकथा नाही पण गुढरम्य अशी काही पुस्तकं वाचलीयेत . Autobiography ऑफ अ योगी (योगी कथामृत )-by परमहंस योगानंद , Living विथ हिमालयन मास्टर्स (हिमालय के संतो के संग निवास )-by स्वामी राम , Apprenticed to हिमालयन मास्टर (हिमालयातील योग्याच्या शिष्याचे आत्मकथन )- by श्री एम , In Search ऑफ secret india (रहस्यमयी भारताच्या शोधात) -by पॉल ब्रन्टन , सिद्धयोगी - by लोब्स राम्पा , तिमिरातून तेजाकडे (योगी महेश ह्यांच्यावरच हे पुस्तक वाचलं होतं तेव्हा अर्थातच विश्वास बसला नवता पण कुतूहल प्रचंड चाळवल गेलं ह्या विषयातलं ), चीतशक्ती विलास by स्वामी मुक्तानंद

पेरी मेसन नामक वकील पात्र असलेली सर्व पुस्तके वाचा. अतिशय मनोरंजक शेवट पर्यंत रहस्य रोखुन धरणारे. विनोद, चेव.. ताण, खुमासदार कोर्टरुम संवाद, सुरेख तर्कशास्त्र याने भरलेल्या या व्यक्तीपात्राच्या कथा मुळ लेखक अर्ल- स्टॅनले-गार्डनर याने लिहल्या आहेत. त्याच्या बहुतांश कथांचे अनुवाद अपर्णा भावे यांनी केले आहेत. अतिशय मनोरंजक. बाकी यावरुन फडतुस मराठी तथाकितांनी वकिल पात्र रचुन त्यावर कमाइ केली नसती तरच आश्चर्य होते :) असो अनुवाद व कथा अतिशय सुरेख आहेत. Perry Mason - Erle Stanley Gardner. (म्राठी translated by अपर्णा भावे) अजुन एक पात्र म्हणजे हर्क्युल पायरो बाय अगाथा ख्रिस्ती. मला स्वत:ला अगाथा ख्रीस्तीच्या २-३ कथा सोडल्या इतर इतर कथा अजिबात विषेश सस्पेन्स वाटल्या नाहीत. पण ती ज्या रोम्यांटीक पध्दतीने खुलवते, कथेतील वातावरण वाचकाच्या मनात निर्माण करते/ जिवंत करते त्याला रहस्यकथा लेखकात अजिबात तोड नाही. तिच्या कथा अक्षरशः जगल्याचा भास होतो. म्हणून रहस्य पुरेसे दाट नाही हे माहित असुनही मी त्या पुन्हा पुन्हा वाचल्या होत्या. अगाथाच्या कोणत्याही कथा वाचा. Hercule Poirot - Agatha Christie's. (म्राठी translated by लोट्स ओफ पिपाल) वर उल्लेखलेली साठेफायकस सुरेख कादंबरी आहेच तसेच समर्थ हे पात्र असलेल्या अनेक कथा नारायण धारपांनी रचल्या. धारपाम्ची कोणतीही कादंबरी वाचा तोच तो अगम्य, वेगळ्या मितीतील काहीतरी, हिडीस, नकारात्म वगैरे वगैइरे पेटंट शब्द वापरुन पुन्हा पुन्हा तोच मसाला त्यात रचलेला दिसेल... जुनी दरौ नवे लेबल प्रकार आहे तरीही त्याचा कंटाळा येत नाही. कारण बहुतांश रचलेल्या कथात शेवट सुष्टाचा दुश्टांवर विजय असाच असतो.. आणी त्यांची ओघवती शैली मनाला नेहमीच स्पर्शुन जाते. त्यांनी केलेला फ्रँकेस्टाइनचा अनुवाद माझा बालवयात थरकाप उडवुन गेला होता :) हॉरर, गुढ कथातील अ मस्ट रीड लेखक म्हणजेच नारायण धारप... बाकी बालकथा असल्या तरीही रहस्य व साहस म्हणून भागवतांचा फास्टर फेणे आणी दिलीप प्रभावळकरांचा बोक्या सातबांडे जाम मनोरंजन करतो... चव बदल म्हणून अत्यंत आवश्यक. तीच गोष्ट शरलॉ़क होम्सला लागु. उत्कृष्ट बाल वांग्मय. जेम्स बाँडच्या काही लघुकथा भारा भागवतांनी अनुवादीत केल्या होत्या त्या ही अफलातुन. एका चालत्या ट्रेनच्या छपावर चालत चालत बाँड एका गुंडाचा कसा पाठलाग करतो व त्याच्या मागे डब्यात शिरतो या प्रसंगाचे इतके जिवंत वर्णन त्यांनी ५ पानात केले होते की प्रसंग व थरार अक्षरशः अनुभवायला मिळत होता.. त्या कथांची नावे आठवत नाहीत पण जरा शोध घेतल्यास आवश्य मिळतील. बाकी तुम्हाला नक्कि काय आवडते ? किंचीत विक्रुत वगैरे असल्याशीवाय रहस्य गडद वगैरे वाटत नाही काय ? तसे काही असेल तर काही डार्क पुस्तकेही नक्किच सुचवेन. वरील सर्व कुटूंबीक मनोरंजन वाली पुस्तके आहेत :)

In reply to by द-बाहुबली

जेम्स बाँडच्या काही लघुकथा भारा भागवतांनी अनुवादीत केल्या होत्या त्या ही अफलातुन.
काय सांगता! पुस्तकाचं नाव देता येईल का? मी रमेश मंत्रींच्या जेम्स बाँड कथा वाचल्या होत्या. भागवतांनी अनुवाद केलाय हे माहीत नव्हतं!

In reply to by आदूबाळ

होय. लेखक भा.रा. भागवत होते. मि केवळ मराठीत बाँड कथा म्हणून मी ते जुनाट पुस्तक उचलले लाब्ररीतुन पुस्तक आणले होते. ती संपुर्ण कादंबरी न्हवती तर लघुकथाच होती पॉकेट-बुक आणी नेहमीचे पुस्तक याच्या मधे बसेल इतक्या आकाराचा साइज. मी स्वतः ते पुस्तक परत हुडकत आहे इन केस कोणाला माहित असेल म्हणून इथे रेफरन्स लिहला. :) लेखकाचे नाव भा.रा. भागवत हेच लिहले होते.

In reply to by द-बाहुबली

तो ट्रेनमधला थरार बहुधा फ्रॉम रशिया विथ लव्ह मधे होता. विजय देवधरांनी ह्याच कादंबरीचा अप्रतिम अनुवाद केला होता. धारपांनी अनुवाद केलेलं फ्रेन्केन्स्टाईन कुठे मिळेल?

In reply to by आदूबाळ

मंत्रींनी जेम्स बाँडचं विडंबन म्हणून जनू बांडे ही व्यक्तिरेखा तयार केली होती. आॅस्टिन पाॅवर्ससारखी. प्रत्यक्ष बाँडकथाही त्यांनी अनुवादित केल्या आहेत?