[स्पर्धेसाठी नाही] - शतशब्दकथा (सिक्वेल) : गणू नाटयस्पर्धा गाजवतो.
भाग पहीला :
गणू
"आई, मी शाळेत जाणार नाय" गणू रडत सांगत होता."पोरं मला जाडया जाडया चिडवत्यात. आणखीन मी आन समोरची सरस्वती जोडीनी शाळेत निघालो का पोरं गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती असं वरडत्यात."
"बरं मी सांगते गुर्जींना पोरांना सांगायला." गणूची आई.
"पण मीच का जाड? "
"ते देवाच्या हातात असतं बाळा.”
आईनी गणूची कशीबशी समजूत काढली.
संध्याकाळी गणू आनंदाने ओरडतच घरी आला. "आई, पुण्याला बाल नाटय स्पर्धा हाये. गुर्जी म्हंटले आपल्याला तब्येतवान राजा पायजे. आख्ख्या वर्गात माझीच निवड झाली.”
"अरे वा!
मिसळपाव