Skip to main content

सफर आडवळणावरील खेड्यांची....२

लेखक मेघनाद यांनी शनिवार, 19/09/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
त्यातील काही छायाचित्र पुढे देत आहे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- हुश्श....केवढे ते मनमोहक नजारे म्हणून सांगू? जितकी छायाचित्र काढावीत तितकी कमी होती, शेवटी मोह आवरला आणि घरी परत आलो कारण दुपारचा १ वाजला होता आणि भावाच्या पोटात कावळ्यांनी ओरडून थकल्यावर शेवटी संप पुकारला होता. गावचं घर आणि जेवण म्हणजे तर स्वर्गच जणू.

हि दिल्ली हाय एक जतरा ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 19/09/2015 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अर्थातच जगदिश खेबुडकरांचं हे जिवंत गाणं ही दिल्ली हाय एक जतरा, हौसं गवसं नवसं सतरा जो दिल्लीला भुलला न्हाई तो एक येडा भितरा पाच वर्षाचा फिरतो पाळणा ही अवघड फेरी नाव कुणाचे, नाकामंदी कुनी बांदली दोरी जागा होऊन बोलल त्याला, हाय कमांडचा हादरा यु आयडीचा शिनीमा बगा, बगा सोडुनी काम आधार झाला निराधार ना इथे राहीला राम कितीक योजना आशा लावूनी उगा दावतीया नखरा ह्यो फिरता घोडा नाव त्याचं सरकार कुनी नोकरशहा, मंत्री-संत्री टांग टाकुनी स्वार हितंच हाय परि दिसत न्हाई पब्लिक मारतय चकरा हि लोकशाहीची खानावळ लै खवाट कु
काव्यरस

तुला मी आठवतो का गं?

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 19/09/2015 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
आजही जेव्हा स्वप्नांत तुझ्या.... रात्र रंगुनी जाते, एकएकट्या नभात तुझ्या अनोळखी रंग भरुनी जाते, दूर लुकलुकणाऱ्या चांदण्यात मग स्वत:ला हरवताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं? आजही जेव्हा येण्याने तुझ्या.... आसमंत मोहरून येतो, नुसत्या चाहुलीने तुझ्या अलवार गंधाळुन जातो, धुंद मदहोशणाऱ्या निशिगंधात मग स्वत:ला विरघळवताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं? आजही जेव्हा ओढीने तुझ्या.... बेलगाम वहावत येतो, हरएक अदेवर तुझ्या बावरा खुळ्यागत होतो, त्याच्या आसुसलेल्या आवेगात मग स्वत:ला भिरकावताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं? आजही जेव्हा इशाऱ्यावर तुझ्या.... बेधुंद बरसत जातो, नाजुक स्पर्शा

बाप्पाचा नैवेद्य : खरवस

लेखक भुमी यांनी शनिवार, 19/09/2015 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
खरवस ( गाईच्या/म्हशीच्या ) चिकाची वडी- गाय किंवा म्हैस व्यायल्यावर सुरुवातीचे काही दिवस घट्ट दूध देतात, त्याला चीक असे देखील म्हणतात. या दुधात जास्त प्रमाणात प्रथिने असतात. साधारण पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या दिवसाचा चीक खरवसाच्या वड्या करण्या साठी वापरतात. पहिल्या दिवसाचा चीक घट्ट असतो. खालील कृतीत त्याच दिल्या आहेत.

कुछ अनमोल लोगो से रिश्ता रखता हूँ…

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 19/09/2015 05:25 या दिवशी प्रकाशित केले.
धाकट्या भावाने हरिवंशराय बच्चन यांची "कुछ अनमोल लोगोंसे रिश्ता रखता हूं" ही कविता पाठवली आणि कळवलं, 'दादा, मराठीत रुपांतर कर!'. प्रयत्न केलाय, त्याच्यासाठी, आणि मिपासाठी.

श्रीगणेश लेखमाला २: यंत्रोपवित

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 19/09/2015 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना माझे आई-बाबा मिपा वाचत नसले, तरीही सगळ्यात आधी त्यांचे आभार मानतो. कारण माझ्यावर त्यांनी कधीच तू अमुक एकच केलं पाहिजेस अशी सक्ती केली नाही. तुला वाटेल त्या गोष्टीमध्ये तुझं करिअर कर म्हणून त्यांनी मला मोकळीक दिली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. "बाळा/बाळे, तू मोठी झालीस की कोण होणार?" असा प्रश्न साधारण वयाच्या पाचव्या वर्षीपासून न विचारलं गेलेलं बालक शोधून सापडायचं नाही बहुधा.

द स्केअरक्रो - भाग २७

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 19/09/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २६ द स्केअरक्रो भाग २७ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) पहाटेचे दीड-दोन वाजले असतील. माझं घड्याळ बंद पडलं होतं बहुतेक. किती वाजले आहेत ते समजत नव्हतं. आजच्या दिवसात एफ.बी.आय.च्या ‘ ग्वान्टानामो एक्सप्रेस ‘ इंटरॉगेशन व्हॅनमध्ये एजंट बँटमसमोर बसायची ही माझी दुसरी वेळ होती. बँटम पुष्कळच निवळला होता. शांतपणे तो माझ्यासमोरच्या खुर्चीत बसला आणि त्याने माझ्यापुढे कॉफी ठेवली. मी ती संपवेपर्यंत तो काहीही बोलला नाही. नंतर त्याने त्याचं छोटं पॉकेटबुक उघडलं आणि माझ्याकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिलं.

पूर्वतयारी आणि दिवस पहिला - अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

लेखक सतिश पाटील यांनी शुक्रवार, 18/09/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
१३ ऑगस्ट साधारण दुपारी १२ वाजता मोबाईल वाजला तर पलीकडून बाबा चमत्कार..." मी पण येणार आहे, तिकीट काढा.." काय चक्रम आहे का हा बाबा? आज संध्याकाळी ची ट्रेन आहे आणि हा आता सांगतो तिकीट काढ म्हणून? अस म्हणत जुलीने माझ्याकडे पाहिले. साधारण ४ महिने आधीच प्लान झाला होता कि आपल्याला लडाख ला जायचे, तेव्हा मोठ्या उत्साहाने " येस आय यम फकीन इन " असा डायलॉग मारला होता त्याने. ३ महिने आधी तिकीट काढले, त्यानंतर तयारी सुरु झाली आणि हळूहळू या बाबाचा इंटरेस्ट कमी होत गेला, मला संशय यायला लागला कि हा आपल्याला कल्टी देणार बहुतेक. आणि त्याला विचारले कि म्हण्याचा हो मी येणार आहे.

क्या हुवा तेरा वादा आणि शीना बोरा मर्डर केस

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 18/09/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई पोलिस कमीशनर राकेश मारीया जो पर्यंत चार्ज मधे होते तो पर्यंत शीना बोरा मर्डर केस मधील उलट सुलट बातम्या, संभाव्य आरोपी इंद्राणी मुखर्जी तीचे तीन पती, ड्रायव्हर आणि अन्य यांचे धक्कादायक खुलासे यानी वर्तमानपत्रांची पाने आणि उपग्रह वाहिन्यांचे अनेक तास खर्ची पडले. माकडीण आपल्या मुलाला नाकातोडांत पाणी जाऊ लागल्यावरच नाईलाजाने पाण्याखाली दाबते पण सामाजीक प्रतिष्ठेच्या खुळचट कल्पना घेऊन एक आई आपल्या मुलीला मारत असेल अशी कल्पना हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या तद्दन गल्लाभरु चित्रपटांच्या लेखकांच्या मनाला सुध्दा स्पर्शुन गेली नसावी. चित्रपटातील कल्पनातुन खुन घडतात किंवा मुळच्या केसवर आधारीत सिनेमा/

दिवाळी बोनस मिटींग!

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 18/09/2015 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी बोनस मिटींग! ढीस्क्लेमर : सदर कथेतील पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत तरी याचा कुठल्याही व्यक्तींशी संबध येऊ शकतो. तसा आल्यास व तो आल्याचे पाहून तुम्ही हसलात तर याला लेखक(च) जबाबदार नसेल असे ठामपणे नाही म्हणता येणार! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- [दृश्य : एका नामांकित प्रा. लि.