Skip to main content

पाठवण

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 20/09/2015 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
"आला कारं टँम्पू? सुभ्या गेलाय ना फाट्यावर?" जोरकस झुरका घेऊन हातातल्या शिगरेटची राख चुटकीसरशी झाडत रामभाऊने सदाला विचारले. "चार वाजत आलेत भाऊ, आजुन पत्त्या न्हाय" सदा उगाच दाखवायची म्हणुन काळजी करत बोलला. "मायला, नवरी काय कडुसं पडल्यावर पाठवायची का? पावण्यानबी लय ऊशीर लावला" रामभाऊ घरात शिरत शिरत मनाशीच बोलला. घरात नव्या नवरीचा साजशृंगार चालला होता. बहीणी, मावश्या, आत्या, माम्या सगळी नवरीच्या खोलीत शिदोरीच सामान बांधण्यात व्यस्त होत्या. रामभाऊकडं कुणाचचं लक्ष नव्हतं. "झाली का तयारी?

राजकन्या, राक्षस आणि घोडा

लेखक सातबारा यांनी रविवार, 20/09/2015 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
राजकन्या दबा धरुन बसली होती. तिच्यापेक्षा तिप्पट मोठया राक्षसाला हरवायचे तर अनपेक्षीत हल्ला करणे आवश्यकच होते आणि अनपेक्षीततेचे शस्त्र कुशलतेने वापरण्यात राजकन्या वाकबगार होती. पट्टीच्या शिकार्‍यासारखी, श्वास रोखून, संधीची वाट पहाणारी राजकन्या आणि डुलत डुलत येणारा अनभिज्ञ राक्षस! आपल्या कावेबाजपणे युद्धाचा निकाल पहिल्यापासूनच आपल्याबाजूने करुन घेतलेला असला, तरी राजकन्या अजिबात गाफील रहाणार नव्हती. राक्षस टप्प्यात येताच एक गगनभेदी आरोळी ठोकून राजकन्येने झेप घेतली. अवचित हल्ल्याने गांगरलेल्या राक्षसाला संधी न देता तीने निष्ठुरपणे घाव घातले. राक्षस धडपडला, कोसळला!

रामपुरी ते रायफल

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 20/09/2015 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
"लुटूपुटूची फयटींग खेळताना,पोलीसाने ”हेंज-जॉफ" असं म्हटलं की गुंड दोन्ही हात वर करून उभा रहायचा.” मुंबईत असताना आमच्या लहानपणी घरात चाकू असलाच तर पेन्सिलीला टोकं काढण्यासाठीच असायचा.मोठं धारदार हत्यार बाळगायला त्या काळात बंदी होती.जातीवादावरून किंवा अन्य कारणावरून दंगे किंवा भांडणं झालीच तर चाकूचे वार व्हायचे.

बाप्पाचा नैवेद्य : मोदक

लेखक निवेदिता-ताई यांनी रविवार, 20/09/2015 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव असल्याने मोदकांच्या पाककृती देत आहे. १) आंब्याचे मोदक सारणासाठी साहित्य-दोन वाट्या खवलेले ओले खोबरे, एक वाटी आंब्यांचा मावा (साटे), चिमुटभर मीठ, अर्धा चमचा साजूक तूप पारीसाठी साहित्य- दोन वाट्या तांदूळाचे पीठ, एक टेबलस्पून लोणी किंवा तेल, अर्धा चमचा मीठ, पाणी कृती- एका पातेल्यात खोबरे, आंब्याचा मावा, तूप आणि चवीसाठी मीठ एकत्र करून गॅस वर ठेवावे. चांगले ढवळुन एक वाफ आणावी. खाली उतरवून गार होउ द्यावे. एका पातेलीत दोन वाट्या पाणी घेउन त्यात मीठ, लोणी किंवा रिफ़ाइंड तेल (हवा असल्यास केशरी रंग) घालून उकळी आणावी.

द स्केअरक्रो - भाग २८

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 20/09/2015 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २७ द स्केअरक्रो भाग २८ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) बुधवारी सकाळी मी जेव्हा ऑफिसमध्ये आलो तेव्हा परत लोकांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा असं झालं होतं, तेव्हा माझी नोकरी गेली होती आणि प्रत्येकजण माझ्याकडे कीवभरल्या नजरेने बघत होता. गेल्या आठवड्यात अँजेलाचा मृतदेह माझ्या घरात सापडला होता आणि प्रत्येकाच्या नजरेत राग आणि संशय होता. आज मी अँजेलाच्या खुन्याला मारून तिच्या मृत्यूचा सूड उगवल्याप्रमाणे सगळेजण पाहात होते. माझी प्रतिक्रिया तिन्ही वेळा सारखीच होती.

श्रीगणेश लेखमाला ३: योगशिक्षक

लेखक लाल टोपी यांनी रविवार, 20/09/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालेतील इतर लेखकांच्या व्यवसायाला असणारे वलय कदाचित योग शिक्षकाला नसेल; आपण भविष्यात योग शिक्षक बनावे अशी स्वप्नेही मुले किंवा त्यांचे पालक पाहत असतील असे वाटत नाही. मात्र या क्षेत्रात जवळपास २८ वर्षांहून अधिक काळ व्यतीत केल्यानंतर या क्षेत्रामध्ये स्वत:चे आणि इतरांचेही भविष्य घडवण्याची ताकद आहे आणि केलेल्या कामाचे समाधानही आहे असे नक्कीच वाटते.

पिढ्यांमधल्या धार्मिकतेतील बदल - कौलाचं विश्लेषण

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 19/09/2015 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय समाजाची मनोवृत्ती ही कायमच धार्मिक राहिलेली आहे. निरनिराळ्या रुढी, परंपरा आजही अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने पार पाडल्या जातात. त्यात अनेक कर्मकांडांचा समावेश आहे. सण साजरे करणं, दिवाळीसारख्या उत्सवात जल्लोष करणं, गणपती बसवणं, दुर्गापूजा करणं या अनेक सामाजिक सांस्कृतिक गोष्टींना धार्मिक, पौराणिक कथांचा आधार आहे. वैयक्तिक पातळीवरदेखील बारसं, मुंज, लग्न, मरण, तेरावं, श्राद्ध यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीदेखील धार्मिक संस्कार करून त्यांचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न होतो.

बैसलो होतो पानटपरीवर

लेखक भैड्या यांनी शनिवार, 19/09/2015 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
बैसलो होतो पानटपरीवर उगाच फुंकित बिड्या, करीत खेळ आगिशी पेटविल्या अनंत काड्या ऊठुन बैसलो घेतला दगड टाकिला पत्र्यावरी आवाज जाहले शेजारचे कुत्रे पळता भुई थोडी. धाप लागिली घाम फुटला नरड्यात माझ्या कोरड. हाड कुत्र्या छौ साल्या बंद कर तुझी ती ओरड. झाड दिसले चढलो वरती बैसलोय मटकुळं करून. बैसलयं खाली बघतयं वरी कुत्रं खाकरून. एक थेरीडा बघुन प्रसंग गेलाय बावचळुन. हासडुनी शिव्या मजला गेला कुत्र्याला घेऊन. रोखुन मज दाखवा कुणी चालिलो मी अड्ड्यावर. चार शिपुरडे नेई मजला पुन्हा टपरीवर. क्रमश:

स्चीझोफेनिया.... आजार की पेर्सेप्शन भाग ४

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 19/09/2015 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ४ "गिता हे खर आहे की विकी कुठे आहे आणि इतका वेळ का लावतो आहे हे बघण्यासाठी मी गच्चीत गेलो. विकी टाकीवर बसून कुठलस गाण गुणगुणत होता. मी हाक मारली तसा त्याने माझ्याकडे वळून बघितल आणि आलो म्हणून लगेच खाली उतरून आला आणि माझ्याबरोबर घरी आला. अग, मला कल्पनाच नव्हती की त्याला परत त्याचे ते मित्र दिसायला लागले आहेत, नाहीतर मी त्याला तिथेच छेडल असत." विक्रमचे वडील म्हणाले. "बर मग आता पुढे काय काका?" गीताने डॉक्टर ख्रराताना प्रश्न केला. "पुढे अस गिता, की तू त्याच्याशी बोलत रहायचं. कारण त्याचा तुझ्यावर विश्वास बसला आहे. त्याच्या मित्राना तू आवडली नाही आहेस अस त्याच म्हणण आहे.

स्चीझोफेनिया.... आजार की पेर्सेप्शन भाग ३

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 19/09/2015 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ गीतानेदेखील घड्याळाकडे बघितल आणि बर म्हणून ती केबिनच्या बाहेर आली. "इतकावेळ काय करत होतीस आत?" ती बाहेर येताच विक्रमने तिच्याकडे संशयाने बघत तिला विचारले. "अरे आज जी केस येणार आहे ना त्याच डिस्कशन करत होतो आम्ही. पुढची सेशन्स मीच घ्यायची आहेत ना म्हणून. का रे?" मुद्धाम निट एकस्प्लनेशन देऊन मग गीताने विचारल. त्यावर हळूच मोकळा श्वास सोडत विक्रम म्हणाला;"काही नाही. मला वाटल तू आपल्या सकाळच्या गप्पा सांगायला गेलीस की काय." गिताने मुद्धाम गोंधळल्यासारखा चेहेरा केला आणि मग आठवल्यासारख करत विचारल;"कुठल डिस्कशन? ओह! तू तुझ्या मित्रांबरोबर मजा केलीस ते?