Skip to main content

कुमाऊं – बिन्सर-चौकोरी

लेखक के.के. यांनी सोमवार, 21/09/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
==================== भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ ==================== कुमाऊं – बिन्सर-चौकोरी आमच्या प्रवासातला पहिला टप्पा ‘बिन्सर’ होता. बिन्सर हे मुख्यत: अभयारण्य म्हणुन प्रसिद्ध आहे. हे उत्तरांचल राज्यातील ‘अल्मोडा’ जिल्ह्यात आहे.

बाप्पाचा नैवेद्य : चॉकलेट मोदक

लेखक इशा१२३ यांनी सोमवार, 21/09/2015 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!गणेशउत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! घरोघरी गणपतीबाप्पाचे आगमन झाले आहेच.रोज छान छान नविन नैवेद्य दाखवताय ना?माझ्याकडेहि उकडीचे मोदक,तळणीचे मोदक,खवा मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवुन झालेच.पण मुलांना काहि समाधान होईना.कारण चॉकलेट मोदक काही अजुन झाले नव्हते.गणपती बसुन तीन दिवस झालेले आणि चॉकलेट मोदक नाहित म्हणजे बाप्पा रागवेल ना अशी धमकी शेवटि छोट्या लेकीकडुन देण्यात आली.आता मोदक करणे आलेच.बर बाप्पाही पूर्ण १० दिवस असल्याने रोज नैवेद्यात विविधता हवीच नाहितर गणपती बाप्पा कंटाळेल हे हि लेकीकडुन सांगण्यात आले.असो. घरी नेहेमी चॉकलेट बनवले जातातच त्यामुळे साहित्य घरात होतेच.अगदी थोड

एक तारा विझताना ("राजेश खन्ना: द डार्क स्टार")

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 21/09/2015 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
(काही दिवसापूर्वी नसीरुद्दिन शाहच्या आत्मचरित्रावर इथे लिहिलं होतं. त्याला बरेच प्रोत्साहनपर प्रतिसाद मिळाले. त्यामुळे आणखी एक पुस्तक-परिचय लिहिण्याचे धारिष्ट्य करीत आहे. हेही पुस्तक सिनेमाबद्दल आहे, हा केवळ योगायोग.) सत्तरदशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या आम्हाला सिनेमा या पदार्थाची लज्जत हळूहळू समजायला लागली, तेव्हा अमिताभ बच्चन त्रिखंड व्यापून राहिल्यागत होता. इतर अभिनेते खिजगणतीत नव्हते. प्राथमिक शाळासोबत्यांमध्ये पंखे फक्त आणि फक्त अमिताभ बच्चनचे असत.

श्रीगणेश लेखमाला ४ : उपाहारगृह - एक सेवा व्यवसाय

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 21/09/2015 00:23 या दिवशी प्रकाशित केले.

उपाहारगृह - एक सेवा व्यवसाय.

तरुणपणी सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक स्वप्ने पाहिली. म्हणजे अगदी लहानपणी रेल्वे इंजीन ड्रायव्हरपासून कळायला लागल्यावर विमानाचा पायलट ते सैन्यअधिकारी किंवा एअरफोर्स पायलट अशी विविध रोमांचकारी आणि कालसापेक्ष, प्रकृतीनुरूप सतत बदलणारी स्वप्ने पाहिली. पण नियती मला पाहून हसत होती. ती म्हणत होती, 'बेट्या, मला विसरतो आहेस. तुला मीच घडविणार आहे.' प्रथमवर्ष विज्ञानला कॉलेजला दांड्या मारून चित्रपट पाहणे आणि अभ्यासाकडे अक्षम्य दुर्लक्ष ह्याचा परिपाक म्हणून नापासचा शिक्का बसला. अर्थार्जनाची घाई आणि चालून आलेली संधी पकडून नोकरी सुरू केली.

विलास मोरे दोषी आहे

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 20/09/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
अर्जंट काम निघाले असून अॉफिसला चाललोय अशी बायकोला थाप मारली. सगळ कसं गुपचुप व्हायला हवं. कार न्यायच्या ऐवजी बाईक काढली. डोक्यावर हेल्मेट घातले. तिनं दोन वाजता बोलावलं होतं मी अकरालाच निघालो. रस्त्यातच दोन थंडगार बियर घेतल्या. एक तिच्यासाठी एक माझ्यासाठी. बियर घेतल्यावर ती कशी सर्वांगात फुलते. आज तिच्या यौवनाचा पुरेपुर आनंद लुटायचाय. मेनरोडपासून थोडासा दूर असलेला तिचा प्रशस्त फ्लँट नजरेत आला. बाईकचा वेग जरासा कमी केला. तेवढ्यात गेटच्या बाहेर येणारा एक सुटाबुटातला माणुस दिसला. हे काय?

राधा कृष्ण

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी रविवार, 20/09/2015 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
अजून म्हणती फिरते राधा यमुनेच्या निर्जन काठावर अजून वाटते तिला सख्याच्या ऐकू येतिल मुरलीचे स्वर !! आणिक इकडे तीरावरती लाटा उठती सुन्या सागरी, बुडून गेली भग्न द्वारका जिथे विसर्जित शाम मुरारी!
काव्यरस

कोडी सोडवा

लेखक _मनश्री_ यांनी रविवार, 20/09/2015 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
दोन मित्र जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक मोत्यांची माळ सापडते. ते दोघे माळेतील मोती समान वाटून घेतात पण १ मोती उरतो .

होऊ द्या खर्च....आपल्याच घरचं..

लेखक अभ्या.. यांनी रविवार, 20/09/2015 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी बाप्पा यायच्या आधीच एक महिन्यापासून माझ्या हपिसात मंडळासाठी टीशर्ट छापून घेणारे येऊ लागले. आता काय तंत्रज्ञानामुळे हव्या त्या रंगसंगतीचे, अगदी छान छान अशा कापडापासून बनवलेले टीशर्ट अगदी कमी वेळेत मिळू लागले आहेत. मंडळांचे टीशर्ट तर छापून गेले पण आता वाट पाहायची नवरात्रीची. असो, तर माझ्या डोक्यात विचार आला, आपण एवढ्या प्रकारचे रंगीत संगीत डिझाईन फक्त कार्यकर्त्यांसाठी बनवतो (ते मिरवणुकीत अजून काय रंग उधळतात त्यांनाच माहीत) मग आपल्या मिपाकरांनीच काय गुन्हा केलाय. मग म्हणले चला. मिपाकरांसाठी पण टी शर्ट डिझाईन करावा. पण नंतर विचार आला, साला इथे काय एक मेंबर एकसारखाय व्हय.

मोटरसाईकल रायडींग गिअर्स

लेखक मोदक यांनी रविवार, 20/09/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
. "मोटरसाईकल रायडींग गिअर्स" हे धाग्याचे नांव वाचून Moto GP मधला वेलेंटिनो रॉसी किंवा लोरेन्झो डोळ्यासमोर आला असेल. जाहिरातींनी मढवलेले परंतु शरीराचा भाग बनलेले; हेल्मेटपासून शूजपर्यंत वापरलेले वेगवेगळे पॅडींग आणि गार्ड्स. आपण येथे तशाच प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करणार आहोत. मात्र आपल्याला उपयोगी आहे तितक्याच प्रमाणात. आपण सगळे थोड्याफार प्रमाणात दुचाकी गाड्या चालवत असतो आणि बहुतांश वेळा रायडींग गिअर्स वापरत असतो.

छायाविष्कार २०१५ (तांबडी जोगेश्वरी मंडळ)

लेखक आदूबाळ यांनी रविवार, 20/09/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मित्र सौरभ धडफळे याच्या विनंतीवरून हे प्रकाशित करत आहे. या स्पर्धेच्या आयोजनात माझा किंवा मिसळपाव व्यवस्थापनाचा सहभाग नाही. त्यामुळे काही प्रश्न असतील तर थेट खाली दिलेल्या संयोजकांशी संपर्क साधावा. मागे एकदा छायाविष्कार पाहिलं होतं तेव्हा आवडलं होतं.