Skip to main content

माझी पत्रकारिताः माझे अनुभव

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 23/09/2015 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पत्रकारिताः माझे अनुभव मनाची संवेदनशिलता मरु न देणे आणि सकरात्मकता जपून ठेवणे हे पत्रकारितेतील सर्वात मोठे आव्हान आहे. मागील वीस वर्षाच्या प्रवासात अनेक अनुभवांना सामोरे गेले. प्रत्येक वेळी संवेदनशिलता आणि सकारात्मकतेची कसोटी लागली. पत्रकारितेचे ग्लॅमर भल्या भल्यांना वाहवत नेते. मोहाच्या क्षणी कमजोर न पडता आपले उद्दिष्ट साध्य करणे अवघड असते याचा अनुभव घेताना प्रवाहात टिकून राहणेही आवश्यक असते. अशावेळी प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची किंवा आपल्याकडे दूर्लक्ष होण्याचीच शक्यता जास्त. माझी पत्रकारिता सुरु झाली त्यावेळचे वातावरण महिलांनी या क्षेत्रात यावे की नाही याविषयीच सांशकतेचे होते.

स्क्रिन शॉट भाग -२

लेखक राजू यांनी बुधवार, 23/09/2015 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्क्रिन शॉट भाग - २ आतापर्यंत..... असभ्य भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे मेसेंजर वरील मेसेजचे स्क्रिन शॉट पाहुन........छातीत आलेली कळ,धूसर झालेली नजर आणि फुटलेल्या घामाने हार्ट अटॅक आल्यावर जशी अवस्था होते तशी त्याची अवस्था झाली. पुढे चालु..... नखशिखांत हादरलेला अमित आता त्या बसलेल्या धक्क्यातून सावरु लागला. जसजसे मन आणि बुध्दी स्थिर होऊ लागली तसे त्याने सर्वप्रथम आपले फेसबुक अकाऊंट लॉगआउट करुन नेमके काय घडले असू शकते याच्या विचारात गुंतवले. काल रात्रीच अमित व त्याचे काही मित्र एका पोस्टवर कॉमेंट्स मध्ये हँसी मजाकची मस्ती करत होते.

|| सांगा आता आम्ही काय करायचं? ||

लेखक नितिन५८८ यांनी बुधवार, 23/09/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजला जाण्यासाठी बस stop वर तीन बस ची वाट बघत थांबायचं, थोड्याच अंतरावर आम्ही नुस्त तिच्याकड बघत थांबायचं. बस आल्यावर तीन पटकन बस मधी चढायच, तिच्याकड बघण्याच्या नादात आम्ही आपल सगळ्यात शेवटी बस मधी चढायच. आता मुलगी असल्या मुळ तिला बसायला जागा कुणीपण द्यायचं, आम्हाला आपल उभच रहाव लागायचं. सांगा आता आम्ही काय करायचं? बस स्टोपवर उतरल्यावर मैत्रिणींसोबत तीन कॉलेज कड निघायचं, आम्हीपण उगाचच आपल तिच्या मग मग जायचं. जाताना वळून तीन आमच्याकड बघायचं, हळूच मैत्रिणींच्या कानात आमच्याविषयी काहीतरी सांगायचं, त्या मैत्रिणीनीसुधा आमच्याकड बघून हसायचं, हासत हासत त्यांनी वर्गात सुद्धा निघून जायचं. सांगा आता
काव्यरस

चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी

लेखक खेडूत यांनी बुधवार, 23/09/2015 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी भाग -१ भाग -२ भाग -३ भाग -४ भाग -५ भाग -६ मागील सहा भागांमध्ये आपण ऑटोमोटिव्ह क्षेत्रातल्या काही घडामोडी आणि त्याचं आर्थिक गणित थोडक्यात पाहिलं. सध्या कधी नव्हे तो वाहन उद्योग भारतात फोफावला आहे.

नक्षत्राचं देणं..(शतशब्द कथा ) २.०

लेखक जेपी यांनी बुधवार, 23/09/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १.० http://www.misalpav.com/node/32359 ================================================================================ चालु पंधरवाड्यात पाऊसकाळ चांगलाच झालता.शिवारात वितभर उंचीच पिक डोलत होत. विठ्या आणी त्याची बायका पोर शेतातल्या कामात बुडून गेलते. दिस मावळतीला झुकताना विठ्या तात्याला म्हणाला,"तात्या हे नक्षत्र चांगलच बरसल की रे!." तात्या त्याच्याकड पहात म्हणाला,"पोरा आभाळातील नक्षत्र येतील अन जातील,बरसतील अगर नाही,ती त्यांची मर्जी हाय, पर हि जी माणस हायतन..", विठ्याच्या बायकोपोराकड बोट दाखवत म्हणाला,"हि माणस बी नक्षत्रासारखीच हायती,अन ह्या

बाप्पाचा नैवेद्य : पुरवठ्याची काजूकतली

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 23/09/2015 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
पुरवठ्याची काजू कतली. आईकडे गौरीच्या दिवशी मोठ्या आरतीच्या वेळी पूर्वी आवर्जून केली जाणणारी पाककृती देतेय.नंतर माझ्यापेक्षा धाकटा भाऊ कमवायला लागल्यावर काजूकतली विकत आणू लागला.पण तरीही त्याला चिडवत सगळे म्हणायचे,’’माईच्या हातची सर नाही हां.’’कारण वडीचे आकारमानही मोठे न् जाड असायचेच.चवही आगळीच.रवा घातलाय याची शंकासुद्धा येत नाही.चला तर बनवा यंदाच्या गणपतीला. खालील प्रमाण हवे तवढे कमी जास्त करून घ्या. साहित्य:- १. १ वाटी रवा.(शक्यतो फाईन रवा घ्यावा०) २. १ वाटी तूप. ३. ३ वाट्या दूध सायीसकट. ४. ४ वाट्या साखर. ५. १ वाटी रवाळ काजूपूड. ६.

श्रीगणेश लेखमाला ६ : कथा एका आयुर्वैद्याची (संवादमालिका)

लेखक प्रास यांनी बुधवार, 23/09/2015 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
काळ - वर्ष १९९२ (ट्रींग ट्रींग! ट्रींग ट्रींग!!) "हॅलो! नमस्कार!" "अरे मी अरुण बोलतोय. काय म्हणतायत चिरंजीव? काल बारावीचा रिझल्ट लागला ना?" "हो ना! रिझल्ट चांगला आहे पण नेहमीप्रमाणे अडनिडा आहे..." "अडनिडा? का रे? पास झालाय ना? किती टक्के मिळालेत?" "पास झालाय रे. टक्केही चांगलेच आहेत, पण मेडिकलची अॅडमिशन हुकतेय. त्यासाठी थोडे टक्के कमी पडतायत." "मग आता विचार काय आहे?" "तशी त्याला नाशिकच्या फार्मसी कॉलेजात अॅडमिशन मिळालीय. उद्या सकाळी तो आणि मी निघतोय नाशिकला जायला." "अच्छा, पण मला सांग, त्याला मेडिकलला जायचंय ना?" "त्याला जायचं असून काय उपयोग?

पापड कर वा पोळ्या लाट (विडंबन)

लेखक दमामि यांनी मंगळवार, 22/09/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेर्ना रस्सा तिखट पुरी सपाट तरी न माझे भरले ताट... जिलबीमागून भजी वाढली बासुंदीचा भलता थाट.. वरणभाताच्या शिखरांमध्ये तुपाचा हा अवघड घाट.. जरा किनारा दिसला पानी मठ्ठ्याची मग आली लाट... आयुष्याच्या पंगतीस मी .. पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!

राम जोशी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 22/09/2015 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
राम जोशी (१७६२-१८१२) - पेशवाईअखेरचा एक मराठी कवि व प्रख्यात लावणीकार. हा सोलापूरचा राहाणारा यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण व तेथील वृत्त्यंशी जोशी होत. यानें बैराग्यपर व शृंगारपर उत्कृष्ट लावण्या केल्या आहेत. छंद:शास्त्रावर व 'छंदोमंजरी' नांवाचा त्याचा एक ग्रंथ आहे. याखेरीज मदालसाचंपू व इतर खंडकाव्यें यानें केली आहेत. मोरोपंताच्या आर्या यानेंच विशेषत: प्रसिद्धीस आणल्या. हा त्या कालांतील लावण्या व पवाडे करणारांचा 'तुरा' होता. याचें सर्व चरित्र विशेषच होतें. स्वभाव, बुद्धीची तीव्रता विद्वत्ता, आयुष्यक्रम, छंदफंद हे सर्व विशेषच होते. याच्या बापाचें नांव जगन्नाथ.

अवधूत (भाग-४)

लेखक मांत्रिक यांनी मंगळवार, 22/09/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
बैराग्यानं सल्ला देऊन बरेच दिवस लोटले होते. त्यानं त्र्यंबकेश्वरला जायचा विचार फारसा काही केला नव्हता. पण एके दिवशी मात्र त्याची इच्छा नसून देखील पावले त्र्यंबकेश्वरकडे वळली. काय घडू शकेल, ही उत्सुकता आणि कदाचित काही घडणार देखील नाही, ही निराश करणारी भावना. भर दुपारच्या वेळेस तो निघाला. हिवाळ्याचे दिवस. पण आज सूर्य फारच त्रासदायक वाटत होता. त्याच्या अंगात देखील थोडासा ताप जाणवत होता. सकाळपासून त्यानं काही खाल्लेलं सुद्धा नव्हतं. विचार करण्यातच बराचसा वेळ वाया गेलेला होता. संध्याकाळ होईतो, आभाळ चांगलंच भरून आलं. लालसर जांभळ्या रंगांचे अवकाळी पावसाचे ढग सर्वत्र दाटून आले.