Skip to main content

लावणी माझं जग आहे... सुरेखा पुणेकर.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 25/10/2015 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
. . महाराष्ट्राची एक प्रसिद्ध लोककला - लावणी. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून लावणीला एक प्रतिष्ठा देणार्‍या, 'कारभारी दमानं', 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा', 'दूर व्हा ना, सोडा जाऊ द्या', 'इचार काय हाय तुमचा' या आणि अशा कितीतरी लावण्या अतिशय सुंदर सादर करणार्‍या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या नुकत्याच औरंगाबाद जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी नटरंगी नार या कार्यक्रमासाठी आल्या होत्या.

सडक...

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 25/10/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
आमदार संपतरावांनी उदघाटन केले आणि सोनटाकळी ते बोरगाव रस्त्याचे काम चालु झाले. कांट्रेक्टर कासलीवालला साहेबांनी स्पेशल सूचना देऊन महीनाभरात कोसभराचा पक्का डाम्बरी रस्ता करवुन घेतला. दोन गाव एकमेकांना जोडली गेली. तालुक्याला जायला सोपं झालं. खाजगी वहानांची वर्दळ वाढली. जिथे दिवस जायचा ते काम घंटयात होउ लागलं. लोक आपल्यावर जाम खुश असणार असा विचार करुण साधारणता महिनाभराने संपतरावांनी सोनटाकळीचा दौरा करायचं ठरवलं. साहेबांना त्या कोसाभराच्या नव्या कीरिंग रोडवर साधारणता सात ते आठ स्पीडब्रेकर लागले म्हणजे गाडी आदळतच टाकळीला आली.

कांखेत कळसा एक ,मजेशीर अनुभव

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी रविवार, 25/10/2015 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
नारळाची झावळी दुपारी वीजेच्या तारावर पडली.वीज गेली.स्थानीक केंद्राला लगेच फोन केला.पाहातो म्हणाले. मी निवांत. संध्याकाळी पुन्हा फोन. काँल सेंटरला करा म्हणाले.११ आंकडी नंबर दिला.लगेच फोन लावला.या खेपेला लागेच ना.रेंजचा प्राँब्लेम बहुधा. कोपर्यावर आलो.चहाच्या टपरीजवळ. तिथं रेंज येते.तिथं दोन बांकडी टाकलेली.कांहींचा नाष्टा पण चालू होता.मला पण एक चहा सांगीतला. दोन प्रयत्नानंतर फोन लागला.पलिकडून ग्राहक क्रमांक विचारला,पुन्हा घरी तंगडतोड.पुन्हा फोन लागायचे वांधे.कंम्लेट नंबर लिहून घ्या,म्हणाले.

नागाला दुध पाजण्याची आहे आपली रिती

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 25/10/2015 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रूच्या गोळ्यांनी शहीद सैनिक किती. ओघळणाऱ्या रक्ताची किंमत शाई पेक्षा कमी. कसुरी नागाने विष ओकले किती. दही -दुधाच्या नवैद्य आनंदी दाखविला जी. शिवबाची लेकुरो हो कशाला करता राडा. गुलाम संगीत ऐकुनी ताल धरा हो त्यावरी. एका गालावर चापटी दुसरा गाल पुढती. नागाला दुध पाजण्याची आहे आपली रिती.

मुक्ता

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 25/10/2015 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
. . मी मुक्ता चित्रे. सर्वसाधारण मुली असतात, तशीच मीसुद्धा एक. शाळेत बर्‍यापैकी हुशार होते. आमचे आई-वडील दोघेही तालुक्याच्या गावी शाळेत शिक्षक होते. वडील मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आणि आई पर्यवेक्षिका म्हणून. आम्ही श्रीमंत नसलो, तरीही कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. स्वतःचे तीन खोल्यांचे घर आहे. आईवडिलांनी कधी फाजील लाड केले नाहीत, परंतु काही कमीही पडू दिले नाही.

जिंदगी ना मिलेगी दोबारा - जावेद अख्तर भावानुवाद

लेखक अजब यांनी रविवार, 25/10/2015 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
१. एक बात होठों तक है जो आयी नहीं बस आँखों से है झांकती तुमसे कभी मुझसे कभी कुछ लब्ज है वो मांगती आवाज़ की बाहों में बाहे ड़ाल के इठलाये वो लेकिन ये जो एक बात है एहसास ही एहसास है खुशबू सी है जैसे हवा में तैरती खुशबू जो बेआवाज़ है जिसका पता तुमको भी है जिसकी खबर मुझको भी है दुनिया से भी छुपता नहीं ये जाने कैसा राज़ है भावानुवाद एक कहाणी जी ओठांवर न येताही डोकावे डोळ्यांच्या मधुनी शब्दच काही मागत राही तुझ्याजवळ अन माझ्याकडुनी... कधी कहाणी आवाजाच्या बाहूंमध्ये मिरवत असते कधी कहाणी नुसती केवळ जाणिव होउन भासत असते... गंध जसा फिरतो वाऱ्यावर मूकपणे दरवळतो घरभर मूक कहाणी तुला समजते , मला

मिमीक्री करुनी भाषण देतो कुणी

लेखक बाजीगर यांनी रविवार, 25/10/2015 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
म ssss नसे... (चाल : फूल ते संपले ,गंध ना राहिला) खुळ ते संपले, धंदा ना राहिला हाक तू ऐकली, प्रसाद नाही दिला मार्ग माझा अता चालतो एकला राजीनामे आले, ना चाले नकला शून्य का स्कोर हा? एक ही चालला मिमीक्री करुनी भाषण देतो कुणी हासूनी त्यावरी ही, मते नादेतो कुणी मीहि स्टेजवरी वेळ ना पाहिला भेट झाली 'त्या'ची याद ठेवू नये आणि फोनवरही भेट घेऊ नये व्हा सुखी भाजपी, शाप माझा मला

मिसळगावाच्या कवीश्वर बाजारात भानगड

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 25/10/2015 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
चटपटीत चांगलचुंगलं खाण्याचा शौक होताच. मिसळगावाच्या कवीश्वर बाजारात एक छोटीशी टपरी टाकली. आपल्याला धंद्याची काय येवढी पडलेली नाही. जनशेवा महत्वाची. म्हणून टपरीवर पोटाला सोसेल एवढेच खा असा संदेश देणारी कार्टून्स पण लावून ठेवली. धंदा कमी झाला तरी चालेल, पण निदान लोकांनी आपल्या मालाचे निदान कौतुक तरी करावे अशी माफक अपेक्षा होती. टपरीवर केळी, शेंगादाणे, असे हौसेने मांडून ठेवले. चटमटीत मिसळ होती. म्हटले चार लोक खाऊन नाही, तरी निदान वास घेऊन कौतुक करतील. पण झाले भलतेच. टपरी उघडल्या उघडल्याच एक उनाड मुलांची टोळी समोर येऊन थडकली. म्हटले पाहुया, निदान काही घेतील.

एक प्रेम कहाणी....

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 25/10/2015 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रेम कहाणी........... ती असेल ८-९ वर्षाची... बागेत खेळताना तिचे लक्ष त्याच्या कडे गेले ..तो पण असेल १२-१३ वर्षाचा.. तो पण तिच्या कडे अधून मधून बघत होता.... तिन्र त्याच्या नकळत त्याचा फोटो काढला...... व त्याने पण... बाबांच्या बदली मुळे तिने शहर बदलले...काळ पुढे सरकत गेला व ति हा प्रसंग विसरली..... पुढे तिचे लग्न झाले...व संसाराला लागली... एकदा पर्स आवरत असताना तिला जुना फोटो सापडला... पती जवळच उभा होता .. त्याने विचारले "कोण आहे हा छोटा मुलगा?" ति हसली अन म्हणाली "माझे पहिले प्रेम..पहिला क्रश"..... असे म्हणताचे त्याने खिशांतून पाकीट काढले... त्यात एका छोट्या मुलीचा फोटो होता.. तो दाखवत तो म

साहेब (विडंबन)

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 25/10/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहेब साहेबच आहेत. साहेब असे तसे नाहीत. साहेब म्हणजे साखरेचा लाडू. साहेब म्हणजे बर्फाचा गोळा. साहेबांचे धिप्पाड व्यक्तिमत्व, साहेबांचा बाणेदारपणा, साहेबांचा दरारा, साहेबांचा आवाज. साहेबांचे येणे. साहेबांचे जाने. सामान्यांच्या खांद्यावर प्रेमाने हात टाकने. हात उंचावणे. हातजोड़ने. चार लोकांत कार्यकर्त्यांना नावानीशि ओलखने. दरवर्षी गावच्या मंदिराला भेट देने. साहेब एक नंबर आहेत. साहेब म्हणजे फ़क्त साहेब, साहेबांना तोड़ नाही. ऐतेहासिक पुरुषांचे अंगावर काटे उभे करणारे प्रसंग ऐकावेत तर फ़क्त साहेबांच्या तोंडुन. ते रक्ताला सळसळायाला लावतात, मरगळलेल्या जनतेत स्वाभिमान भरतात.